Strangers in Israel बद्दल बायबलमधील वचने: To have the gleaning of the harvest
To have the gleaning of the harvest बद्दल वचने
तुमच्या द्राक्षमळ्यावर दुसर्यांदा जाऊ नका अथवा पडलेली द्राक्षे गोळा करू नका. गोरगरिबांसाठी आणि परदेशीयांसाठी ती तिथेच राहू द्यावी. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
“ ‘तुम्ही आपल्या जमिनीतील पिकांची कापणी कराल, तेव्हा शेताच्या कानाकोपर्यातील पिकांची कापणी करू नये किंवा खाली पडलेले धान्य गोळा करू नये. हे गरिबांसाठी व तुम्हामध्ये राहणार्या परदेशीयांसाठी ते तसेच राहू द्यावे. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ”
पिकांची कापणी करीत असताना तुम्ही बांधून ठेवलेली एखादी पेंढी शेतातून आणावयाचे विसरलात, तर ती आणण्यासाठी तुम्ही माघारी जाऊ नये, तर परदेशी, अनाथ व विधवा यांच्यासाठी ती तिथेच राहू द्यावी, म्हणजे याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या हाताच्या सर्व कार्यात आशीर्वाद देतील.
तुम्ही तुमच्या जैतून वृक्षांवरील फळे काढण्याकरिता झोडपणी कराल, तेव्हा तुम्ही एकाच फांदीवर दोनदा प्रहार करू नये. त्या फांदीवर जी काही फळे राहतील ती परदेशी, अनाथ व विधवा यांच्यासाठी राहू द्यावी.
जेव्हा तुम्ही तुमच्या द्राक्षमळ्यातील द्राक्षे काढता तेव्हा परत वेलींवर जाऊ नका. तर राहिलेली द्राक्षे परदेशी, अनाथ व विधवा यांच्यासाठी तशीच राहू द्यावीत.
इजिप्त देशामध्ये तुम्ही गुलाम होता याची आठवण ठेवावी म्हणून मी तुम्हाला हे करण्याची आज्ञा देत आहे.