Skip to content

Spoils बद्दल बायबलमधील वचने

39 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि 16,000 लोक.

  2. याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे इस्राएली लोकांच्या वाट्यातील पन्नासापैकी एक, लोक आणि जनावरे असे मोशेने निवडून ते लेवी लोकांना दिले, जे याहवेहच्या निवासमंडपाच्या देखरेखीसाठी जबाबदार होते.

  3. नंतर सेनेच्या तुकड्यांवर जे अधिकारी होते—जे हजारांचे व शंभरांचे सेनापती होते ते मोशेकडे गेले

  4. आणि मोशेला म्हणाले, “तुझ्या सेवकांनी आमच्या हाताखाली असलेल्या सैनिकांची मोजणी केली आणि त्यातून एकही व्यक्ती कमी झालेला नाही.

  5. म्हणून आम्ही आम्हाला लुटीतून जे सोन्याचे दागिने मिळाले त्यातून तोडे, कड्या, अंगठ्या, कुंडले व माळा; आमच्यासाठी प्रायश्चिताचे अर्पण म्हणून याहवेहसमोर आणले आहेत.”

  6. मोशे व एलअज़ार याजक यांनी ते सोने; घडीव दागिने त्यांच्यापासून स्वीकारले.

  7. हजारांचे सरदार व शंभरांचे सरदार यांच्याकडून स्वीकारलेले सोने जे मोशे व एलअज़ार याजकाने याहवेहला भेट म्हणून सादर केले, त्याचे वजन 16,750 शेकेल इतके भरले.

  8. प्रत्येक सैनिकाने स्वतःसाठी लूट घेतली होती.

  9. मोशे आणि एलअज़ार याजकाने हजारांच्या व शंभरांच्या सरदारांकडून जे सोने स्वीकारले, ते त्यांनी इस्राएली लोकांसाठी याहवेहसमोर स्मारक म्हणून सभामंडपात आणले.

  10. फक्त त्यांची गुरे जिवंत ठेवली. त्यांची नगरे काबीज करून ती सर्व संपत्ती आम्ही घेतली.

  11. शौलाने उत्तर दिले, “सैन्याच्या लोकांनी ती अमालेक्यांपासून आणली आहेत; त्यांनी उत्तम मेंढरे व गुरे याहवेह तुमचा परमेश्वर यांच्या यज्ञासाठी राखून ठेवले आहेत, परंतु बाकीच्या सर्वांचा आम्ही पूर्णपणे नाश केला आहे.”

  12. याबाबत तुमचे कोण ऐकणार? जो मनुष्य सामानाजवळ राहतो त्याचा वाटा तेवढाच असणार जेवढा लढाईवर गेलेल्या व्यक्तीचा असणार. सर्वांना सारखाच वाटा मिळणार.”

  13. लढाईतील काही लूट याहवेहच्या मंदिराच्या दुरुस्तीच्या खर्चासाठी अर्पण करीत.

  14. त्यावेळेस त्यांनी परत आणलेल्या लुटीतून याहवेहसाठी सातशे गुरे आणि सात हजार मेंढ्या व शेळ्यांचे बलिदान केले.