Skip to content

Silas बद्दल बायबलमधील वचने

51 वचने · 7 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुरुंगाच्या नायकाने दिवे मागविले व तो धावत आला आणि पौल आणि सीला यांच्यापुढे थरथर कापत पालथा पडला.

  2. त्याने त्यांना बाहेर आणले आणि विचारले, “महाराज, माझे तारण व्हावे, म्हणून मी काय करावे?”

  3. त्यांनी सांगितले, “प्रभू येशूंवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.”

  4. तेव्हा त्यांनी त्याला व त्याच्या घराण्यातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले.

  5. मग रात्रीच्या त्याच घटकेस तुरुंगाच्या नायकाने त्यांच्या जखमा धुतल्या आणि लगेच त्याने व त्याच्या सर्व कुटुंबाने बाप्तिस्मा घेतला.

  6. त्या नायकाने त्यांना आपल्या घरी आणले व त्यांच्यापुढे भोजन वाढले; तो व त्याच्या कुटुंबातील सर्व लोक परमेश्वरावरील विश्वासात आल्यामुळे अत्यंत आनंदित झाले होते.

  7. पहाट झाल्यानंतर, न्यायाधीशांनी त्यांच्या अधिकार्‍यांना त्या तुरुंगाच्या नायकाकडे पाठवून त्यांना हुकूम दिला: “त्या माणसांना सोडून द्या.”

  8. तेव्हा तुरुंगाच्या नायकाने पौलाला सांगितले, “न्यायाधीशांनी हुकूम दिला आहे की, पौल व सीला यांना जाऊ द्यावे, आता तुम्ही जाऊ शकता. शांतीने जा.”

  9. परंतु पौल अधिकार्‍यांना म्हणाला: “त्यांनी आमची चौकशी न करता आम्हाला जाहीरपणे फटके मारले आणि आम्ही रोमी नागरिक असतानाही आम्हास तुरुंगात डांबले. आता आम्ही गुपचूप निघून जावे, अशी त्यांची इच्छा आहे काय? त्यांनी स्वतः येऊन आम्हास मुक्त करावे.”

  10. अधिकार्‍यांनी जाऊन हे शब्द न्यायाधीशांना कळविले, पौल व सीला हे रोमी नागरिक आहेत, हे त्यांना समजले तेव्हा ते घाबरले.

  11. आणि त्यांना शांत करण्यासाठी ते स्वतः तुरुंगात आले आणि तुरुंगाच्या बाहेर आणून, ते शहर सोडून जावे अशी त्यांना विनंती केली.

  12. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पौल व सीला हे लुदियेच्या घरी गेले आणि बंधू भगिनींना भेटून त्यांना उत्तेजित केले. नंतर ते तिथून निघाले.

  13. ऐकणार्‍यांपैकी काही यहूदीयांची खात्री झाली आणि ती माणसे पौल व सीला यांना येऊन मिळाली. यामध्ये परमेश्वराचे भय धरणार्‍या ग्रीक लोकांची संख्या मोठी होती आणि त्यात काही प्रमुख स्त्रियाही समाविष्ट होत्या.

  14. परंतु इतर यहूदीयांना मत्सर वाटला; म्हणून त्यांनी रस्त्यावरील काही गुंड लोकांना घेऊन शहरात त्यांना दंगल करण्यास चिथावणी दिली. पौल व सीला यांना बाहेर काढून लोकांकडे आणण्यासाठी ते त्यांना शोधीत यासोनाच्या घराकडे धावले.

  15. पण ते तिथे नाहीत, असे पाहून त्यांनी यासोन व इतर काही विश्वासणार्‍यांना ओढून काढले व त्यांना शहर न्यायाधीशांपुढे नेऊन आरडाओरड करून म्हणाले, “या माणसांनी सर्व जगात उलथापालथ केली आहे आणि आता ते येथेही आलेले आहेत;

  16. आणि यासोनाने त्यांचे आपल्या घरामध्ये स्वागत केले आहे. हे सर्व कैसराच्या हुकुमाविरुद्ध वागतात आणि म्हणतात की येशू म्हणून कोणी एक दुसरा राजा आहे.”

  17. शहरातील अधिकारी व लोकसमुदाय यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांची धांदल उडाली.

  18. मग यासोन व इतरांकडून जामीन घेतल्यानंतरच त्यांना जाऊ दिले.

  19. रात्र झाल्याबरोबर विश्वासणार्‍यांनी पौल व सीला यांना बिरुयास पाठविले. तिथे पोहोचल्यावर ते यहूदी सभागृहामध्ये गेले.

  20. विश्वासणार्‍यांनी पौलाला ताबडतोब समुद्रकिनारी पाठविले, परंतु सीला व तीमथ्य हे बिरुया येथे राहिले.

  21. पौलाबरोबर जे गेले होते त्यांनी त्याला ॲथेन्सला पोहोचविले आणि सीला व तीमथ्य यांनी त्वरा करून त्याला येऊन मिळावे अशी आज्ञा त्यांना केली.

  22. जेव्हा मासेदोनियाहून सीला व तीमथ्य आले, तेव्हा येशू हेच ख्रिस्त आहेत असा प्रचार आणि साक्ष केवळ यहूदीयांनाच सांगण्यासाठी पौलाने स्वतःचे समर्पण केले होते.

  23. तीमथ्य, सीला व मी, तुम्हाला परमेश्वराचे पुत्र येशू ख्रिस्त यांच्याबद्दल संदेश सांगत आलो तो “नाही” आणि “होय” असा नाही, परंतु त्यांच्यामध्ये नेहमीच “होय” आहे.

  24. आपले परमेश्वर पिता व प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असलेल्या थेस्सलनीका येथील मंडळीस,

  25. परमेश्वर आपले पिता व प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असलेल्या थेस्सलनीका येथील मंडळीस,