Skip to content

Serpent बद्दल बायबलमधील वचने

49 वचने · 16 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तो सापाचे विष चोखून घेईल; विषारी सापाचा दंश त्याला जिवे मारेल.

  2. त्यांचे विष सर्पाच्या विषासारखे आहे, ते कान बंद ठेवणार्‍या नागसर्पांसारखे आहेत,

  3. की गारुडी कितीही कुशल असला, तरी तो गारुड्याचा सूर ऐकणार नाही.

  4. त्यांनी त्यांच्या जिभा सर्पाच्या जिभेप्रमाणे तीक्ष्ण केली आहे; नागाचे विष त्यांच्या ओठांवर असते. सेला

  5. जेव्हा द्राक्षारस लाल आहे, तेव्हा त्याकडे टक लावून पाहू नको, जेव्हा ते कपामध्ये चमकते, जेव्हा ते सहजपणे खाली उतरते!

  6. शेवटी ते विषारी सर्पाप्रमाणे दंश करते आणि ते विष फुरसे सर्पाप्रमाणे विषारी असते.

  7. गरुडाचा आकाशातील मार्ग, खडकावरून सरपटणारा साप, खवळलेल्या समुद्रात तरंगणारे जहाज, पुरुषाचा तरुणीशी संबंध?

  8. जो खड्डा खणतो तोच तिच्यात पडेल. जो कुंपण मोडतो त्याला सर्प चावेल.

  9. साप वश होण्यापूर्वी जर गारुड्याला चावला, तर गारुड्याला त्याचा काही उपयोग नाही.

  10. अहो पलिष्टी लोकांनो, ज्या दांडक्याने तुम्हाला मारले तो मोडला आहे म्हणून आनंद करू नका. तरी त्या सापापासून फुरसे निपजेल त्याचे फळ तुमचा वेध घेणारे विषारी नाग असतील.

  11. नेगेवच्या प्राण्यांबद्दलची भविष्यवाणी: कठीण परिश्रम आणि संकटाच्या भूमीतून, सिंह आणि सिंहीण, फुरसे आणि उडणारे साप, दूत आपली संपत्ती गाढवांच्या पाठीवर, त्यांचे खजिने उंटांच्या कुबड्यांवर लादून, त्या लाभहीन राष्ट्राकडे घेऊन जातात,

  12. लांडगा व कोकरू एकत्र चरतील. सिंहदेखील बैलाप्रमाणे कडबा खाईल आणि यापुढे धूळ हेच सर्पाचे अन्न असेल. माझ्या कोणत्याही पवित्र पर्वतांवर ते इजा पोहोचविणार नाही किंवा नाश करणार नाहीत,” असे याहवेह म्हणतात.

  13. “पाहा, मी तुमच्यामध्ये विषारी फुरसे सर्प पाठवेन, असे सर्प ज्यांना तुम्ही मंत्रमुग्ध करू शकणार नाही. आणि ते तुम्हाला दंश करतील,” याहवेह असे घोषित करतात.

  14. कर्मेल पर्वताच्या शिखरावर ते लपून राहिले, तरी मी त्यांची शिकार करून त्यांना पकडेन. ते महासागराच्या तळाशी माझ्या दृष्टिआड लपून बसले तरी, मी सर्पाला त्यांना चावा घेण्याची आज्ञा देईन.

  15. ते सर्पाप्रमाणे, भूमीवर सरपटणार्‍या प्राण्यांप्रमाणे धूळ चाटतील. ते आपल्या बिळातून थरथर कापत बाहेर पडतील; भयभीत होऊन ते याहवेह आमच्या परमेश्वराकडे वळतील आणि तुमचे भय बाळगतील.

  16. किंवा मासा मागितला, तर साप देईल?

  17. “मेंढरांनी लांडग्यांमध्ये जावे त्याप्रमाणे मी तुम्हाला पाठवित आहे म्हणून तुम्ही सर्पासारखे चतुर आणि कबुतरांसारखे निर्दोष असा.

  18. ते सापांना आपल्या हातांनी उचलून धरतील; ते कुठलेही प्राणघातक विष प्याले तरी त्यांच्यावर कसलाही दुष्परिणाम होणार नाही; ते आजार्‍यांवर हात ठेवतील व ते बरे होतील.”

  19. मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवून टाकण्याचे आणि शत्रूवर विजयी होण्याचे सामर्थ्य दिले आहे; तुम्हाला इजा होणार नाही.

  20. परंतु पौलाने तो साप झटकून अग्नीत टाकला आणि त्याला काहीच इजा झाली नाही.

  21. आता पौल सुजेल किंवा तत्काळ मरून पडेल अशी लोकांची अपेक्षा होती; परंतु पुष्कळ वेळ वाट पाहिल्यानंतर, काही विशेष झाले नाही हे दिसल्यावर, त्यांनी आपले मन बदलले आणि तो परमेश्वर असावा असे म्हणाले.

  22. आपण ख्रिस्ताची परीक्षा पाहू नये, जशी त्यांच्यातील काहीजणांनी पाहिली आणि ते सर्पदंशाद्वारे मरण पावले.

  23. परंतु हव्वा जशी सापाकडून धूर्ततेने फसविली गेली, तसेच तुमची मने कशाने का होईना ख्रिस्तावरील तुमच्या शुद्ध व प्रामणिक भक्तीपासून भटकून जातील, अशी मला भीती वाटते.

  24. त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडात व शेपटांत आहे. त्यांच्या शेपट्या सापांसारख्या असून त्यांनाही डोकी आहेत आणि त्यांच्या साहाय्याने ते जखमा करतात.