मुख्य मजकुरावर जा

Reuben बद्दल बायबलमधील वचने

26 वचने · 7 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लेआ गर्भवती झाली व तिला एक पुत्र झाला आणि तिने त्याचे नाव रऊबेन असे ठेवले. कारण लेआ म्हणाली, “याहवेहने माझे दुःख पाहिले आहे. आता माझे पती माझ्यावर प्रेम करतील.”

  2. गव्हाच्या हंगामात रऊबेन शेतात काम करताना एके दिवशी त्याला पुत्रदात्रीची फळे सापडली. त्याने ती आपली आई लेआ हिला नेऊन दिली. तेव्हा राहेलने लेआजवळ विनंती केली, “तुझ्या मुलाने पुत्रदात्रीची फळे आणली आहेत, त्यातील काही मला दे.”

  3. तो त्या प्रदेशात राहत असताना रऊबेन हा आपल्या पित्याची उपपत्नी बिल्हा हिच्याजवळ जाऊन निजला, हे वृत्त इस्राएलला सांगण्यात आले.

  4. जेव्हा रऊबेनने हे ऐकले तेव्हा त्याने योसेफाचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला; तो म्हणाला, “आपण त्याला जिवे मारणार नाही;

  5. आपण रक्तपात करणार नाही; तर आपण त्याला या रानातल्या विहिरीत फेकून देऊ; परंतु त्याला हात लावू नका.” रऊबेनने असा बेत केला होता की नंतर योसेफाला विहिरीतून काढावे आणि आपल्या वडिलांकडे परत पाठवून द्यावे.

  6. योसेफ त्यांच्याजवळ आला तेव्हा त्यांनी त्याचा झगा—जो गडद रंगाचा, सुशोभित होता—ओढून काढला,

  7. आणि त्याला एका कोरड्या विहिरीत फेकून दिले, ती विहीर रिकामी होती, तिच्यात पाणी नव्हते.

  8. मग ते भोजन करण्यास बसले असता त्यांना दूर अंतरावरून उंटांचा एक काफिला त्यांच्याकडे येताना दिसला. ते इश्माएली व्यापारी असून गिलआदहून इजिप्तला डिंक, मसाले व गंधरस घेऊन चालले होते.

  9. तेव्हा यहूदाह आपल्या भावांना म्हणाला, “आपल्या भावाला मारून त्याचा रक्तपात झाकून आपल्याला काय फायदा?

  10. चला आपण योसेफाला इश्माएली लोकांना विकून टाकू या, त्याला हात लावू नका, तो आपला भाऊच आहे, आपल्याच रक्तमांसाचा आहे.” त्या सर्व भावांना त्याचे म्हणणे पटले.

  11. मिद्यानी व्यापार्‍यांचा काफिला म्हणजे इश्माएली लोक जवळ आले, तेव्हा त्यांनी योसेफाला त्या विहिरीतून बाहेर काढले आणि वीस शेकेल चांदी घेऊन भावांनी योसेफाला विकून टाकले; आणि व्यापार्‍यांनी योसेफाला आपल्याबरोबर इजिप्त देशाला नेले.

  12. जेव्हा रऊबेन त्या विहिरीजवळ परत आला आणि योसेफ विहिरीत नाही हे पाहून त्याने आपली वस्त्रे फाडली.

  13. तो रडत आपल्या भावांना म्हणाला, “मुलगा विहिरीत नाही; आता मी कुठे जाऊ?”

  14. रऊबेन म्हणाला, “त्या मुलाविरुद्ध असे पाप करू नका, हे मी तुम्हाला सांगत नव्हतो का? पण तुम्ही माझे ऐकले नाही! आम्हाला त्याच्या रक्तपाताचा हिशोब द्यावा लागेल.”

  15. तेव्हा रऊबेन आपल्या वडिलांस म्हणाला, “मी बिन्यामीनाला तुमच्याकडे परत आणले नाही तर तुम्ही माझ्या दोन मुलांना मारून टाका; बिन्यामीनाला माझ्या हवाली करा, मी त्याला परत तुमच्याकडे आणेन.”

  16. रऊबेनाचे पुत्र: हनोख, पल्लू, हेस्रोन व कर्मी.

  17. “रऊबेना, तू माझा प्रथमपुत्र आहेस, माझे बळ, पौरुषाचे प्रथमफळ असा आहेस. प्रतिष्ठा आणि शक्तीत उत्कृष्ट असा तू आहेस.

  18. तू अशांत पाण्यासारखा उग्र आहे, तू अजून उत्कृष्ट होणार नाही, कारण तू तुझ्या वडिलांच्या खाटेवर, माझ्या खाटेवर चढला आणि ते अशुद्ध केले.

  19. त्यांच्या कुटुंब प्रमुखांची नावे ही: इस्राएलाचा प्रथमपुत्र रऊबेन याचे पुत्र: हनोख व पल्लू, हेस्रोन व कर्मी.

  20. लेवीचा पुत्र कोहाथ, त्याचा पुत्र इसहार, त्याचा पुत्र कोरह, आणि रऊबेन गोत्रातील काही लोक म्हणजे एलियाबाचे पुत्र दाथान व अबीराम व पेलेथाचा पुत्र ओन हे उन्मत्त झाले

  21. इस्राएलचे पुत्र: रऊबेन, शिमओन, लेवी, यहूदाह, इस्साखार व जबुलून,

  22. रऊबेन हा ज्येष्ठपुत्र होता खरा, पण त्याने आपल्या पित्याचा पलंग भ्रष्ट केला म्हणून त्याचा ज्येष्ठत्वाचा हक्क इस्राएलपुत्र योसेफच्या संततीस देण्यात आला, म्हणून वंशावळीत रऊबेनचे नाव ज्येष्ठत्वाच्या हक्काप्रमाणे नमूद करण्यात आले नाही.

  23. इस्राएलचा ज्येष्ठपुत्र रऊबेनचे पुत्र: हनोख, पल्लू, हेस्रोन व कर्मी.

  24. योएलाचे वंशज: त्याचा पुत्र शमायाह, त्याचा पुत्र गोग, त्याचा पुत्र शिमी,

  25. शिमीचा पुत्र मीखाह, त्याचा पुत्र रेआयाह, त्याचा पुत्र बाल,