Skip to content

Redemption बद्दल बायबलमधील वचने

144 वचने · 59 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तर याजक योबेल वर्षापर्यंतची त्या शेताची किंमत ठरवेल, आणि त्याने त्याच दिवशी याजकाने ठरविलेले मूल्य याहवेहसाठी पवित्र समजून द्यावे.

  2. योबेल वर्षी, ज्याच्याकडून शेत विकत घेतले आहे त्या व्यक्तीकडे, म्हणजेच त्या शेताचे खरे वतन असलेल्या व्यक्तीच्या ताब्यात परत जावे.

  3. तुम्ही विकता त्या प्रत्येकाचे मूल्य पवित्रस्थानाच्या शेकेलनुसार असावे आणि एक शेकेल म्हणजे वीस गेरा.

  4. “ ‘तथापि, कोणीही प्राण्याचे प्रथम जन्मलेले समर्पित करू शकत नाही, कारण प्रथम जन्मलेले मुळातच याहवेहचे आहेत; बैल असो वा मेंढरे, ते याहवेहचेच आहे.

  5. जर ते अशुद्ध पशूंपैकी असेल, तर त्याची ठरवून दिलेले मूल्य द्यावे व त्या शिवाय ठरविलेल्या किमतीचा पाचवा भाग अधिक किंमत भरावी. जर तो पशू सोडवून घेतला जात नसेल, तर तो त्याच्या ठरविलेल्या किमतीत विकता येईल.

  6. “ ‘एखादा मनुष्य आपल्याजवळ असलेले काहीही याहवेहला समर्पित करेल—मग ते एखादी व्यक्ती असो, पशू असो वा वतनाची जमीन असो—ते विकू नये किंवा खंडणी भरून सोडवूनही घेऊ नये; कारण समर्पित ते सर्व याहवेहसाठी परमपवित्र आहे.

  7. “ ‘मरणदंडाची शिक्षा झालेल्या मनुष्याला खंडणी भरून सोडविता येणार नाही. त्याचा अवश्य वध करावा.

  8. “ ‘भूमीचा दशांश, मग ते शेतातील उत्पादन असो किंवा झाडांची फळे, याहवेहचे आहेत; ते याहवेहसाठी पवित्र आहेत.

  9. ज्या कोणाला त्यांचा कोणताही दशांश भाग सोडावयाचा असेल त्यांनी त्या वस्तूंच्या किमतीचा पाचवा भाग अधिक रक्कम भरावी.

  10. गुरे आणि शेरडेमेंढरांचा प्रत्येक दशांश—मेंढपाळाच्या काठीखालून जाणारा प्रत्येक दहावा प्राणी—याहवेहसाठी पवित्र असेल.

  11. कोणीही वाईटामधून चांगल्याची निवड करू नये किंवा अदलाबदल करू नये; तशी अदलाबदल केल्यास दोन्हीही प्राणी आणि बदली केलेला पवित्र होतील आणि त्यांना खंडणी भरून सोडवू शकणार नाहीत.’ ”

  12. 273 इस्राएली लोकांचे प्रथम जन्मलेले जे लेव्यांपेक्षा अधिक आहेत त्यांची खंडणी भरण्यासाठी,

  13. प्रत्येकामागे पवित्रस्थानाच्या शेकेलाप्रमाणे पाच शेकेल घे; म्हणजेच वीस गेरा.

  14. आणि इस्राएली लोकांतील जे अधिक होते त्यांच्या खंडणीचे पैसे अहरोन आणि त्याच्या पुत्रांना द्यावे.”

  15. मोशेने लेव्यांपेक्षा जे अधिक होते त्यांच्याकडून त्यांच्या खंडणीचे पैसे गोळा केले.

  16. इस्राएली लोकांच्या प्रथम जन्मलेल्यांकडून त्याने पवित्रस्थानाच्या शेकेलनुसार 1,365 गोळा केले.

  17. याहवेहच्या वचनाप्रमाणे झालेल्या आज्ञेनुसार मोशेने ते खंडणीचे पैसे अहरोन व त्याच्या पुत्रांना दिले.

  18. उदरातून जन्मलेले प्रत्येक प्रथम जन्मलेले संतान, जे याहवेहला अर्पिलेले आहेत, मग ते मनुष्याचे असो किंवा जनावरांचे, ते तुझे होतील. परंतु प्रत्येक प्रथम जन्मलेल्या पुत्राला व प्रत्येक अशुद्ध जनावराच्या नर वत्साला तू खंडणी भरून सोडवावे.

  19. तेव्हा तो जबाबदारी घेऊन सोडवणूक करणाऱ्या मनुष्यास म्हणाला, “नाओमी मोआब देशातून परत आली आहे. ती आता ज्या जमिनीचा भाग विकत आहे, ती आपला नातेवाईक एलीमेलेखच्या मालकीची आहे.

  20. मला असे वाटले की, ही गोष्ट तुझ्या लक्षात आणून द्यावी आणि मी असे सुचवितो की, येथे बसलेल्या लोकांच्या उपस्थितीत आणि माझ्या वडीलजनांच्या उपस्थितीत तू ती विकत घे. जर तू ती सोडवशील, तर तसे कर. परंतु जर तू तसे करणार नाहीस, मला सांग, म्हणजे मला ते कळेल. कारण तुझ्याशिवाय तसे करण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि तुझ्यानंतर मला तो अधिकार आहे.” तो म्हणाला, “मी तो सोडवून घेईन,”

  21. तेव्हा बवाज म्हणाला, “ज्या दिवशी तू नाओमीकडून ही जमीन विकत घेशील तेव्हा त्याच्या कुटुंबाचे नाव त्याची मालमत्ता चालू ठेवण्यासाठी त्या मृत माणसाची विधवा मोआबी रूथसुद्धा तुला स्वीकारावी लागेल.”

  22. यावरून तो जबाबदारी घेऊन सोडविणारा मनुष्य म्हणाला, “असे असेल, तर मग मी ती सोडवू शकत नाही. कारण त्यामुळे माझी स्वतःची मालमत्ता धोक्यात येईल. तू स्वतःच ती सोडवून घे. मी हे करू शकत नाही.”

  23. (इस्राएलमध्ये पूर्वीच्या काळात, मालमत्तेची सोडवणूक करणे आणि तिचे हस्तांतरण पक्के होण्यासाठी, एका पक्षाने त्याची चप्पल काढून ती दुसऱ्याला देणे ही इस्राएलमधील व्यवहार कायदेशीर करण्याची पद्धत होती.)

  24. म्हणून तो जबाबदारी घेऊन सोडविणारा मनुष्य बवाजला म्हणाला, “तू स्वतःच ती विकत घे.” आणि त्यावेळी त्याने त्याची चप्पल काढली.

  25. तेव्हा बवाजने वडीलजनांना आणि सर्व लोकांना जाहीरपणे सांगितले, “आज तुम्ही साक्षीदार आहात की मी एलीमेलेख, किलिओन आणि महलोन यांची सर्व मालमत्ता नाओमीकडून विकत घेतली आहे.