Redemption बद्दल बायबलमधील वचने: Wait for the completion of
Wait for the completion of बद्दल वचने
ज्या आपणाला आत्म्याचे प्रथमफळ मिळाले आहे, ते आपणही कण्हत आहोत, आपण देखील त्या परमेश्वराची दत्तक मुले म्हणून आपल्या शरीराचा उद्धार होईल त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहोत,
परंतु आपले नागरिकत्व तर स्वर्गीय आहे आणि तिथून आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त यांच्या परतण्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत.
जे त्या सामर्थ्याद्वारे सर्वकाही त्यांच्या नियंत्रणात ठेवण्यास समर्थ आहे, ते आपली अशक्त शरीरे घेऊन व त्यांचे रूपांतर करून ती स्वतःच्या शरीरासारखी गौरवशाली शरीरे करतील.
कारण आता सर्वांना तारण देणारी परमेश्वराची कृपा प्रकट झाली आहे.
ती कृपा आपल्याला असे शिकविते की, आम्ही अभक्ती व ऐहिक वासनांना “नाही” म्हणून, आताच्या युगात आत्मसंयमाने, नीतीने व सुभक्तीने जगावे;
आणि धन्य आशेची, म्हणजे येशू ख्रिस्त आपले महान परमेश्वर आणि तारणाऱ्यांचे गौरव प्रकट होण्याची वाट पाहावी.