- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Redemption बद्दल बायबलमधील वचने: Of persons or property
Of persons or property बद्दल वचने
“ ‘तुमचा इस्राएली सहकारी गरीब झाला आणि त्याने त्यांची काही मालमत्ता विकली, तर त्यांच्या जवळच्या नातलगाने ती खंडणी भरून सोडवून घ्यावी.
जर सोडवून घेणारा त्याला कोणी नातलग नसला आणि त्याला स्वतःलाच ती खंडणी भरून सोडवून घेण्याची ऐपत वाढली,
तर योबेल वर्षापर्यंत जमीन आणखी किती वर्षे पीक देऊ शकेल हे पाहून त्या प्रमाणात तिची किंमत भरावी. जमिनीच्या सध्याच्या मालकाने तितके पैसे घेऊन तिच्या मूळ मालकाला ती परत करावी.
पण मूळ मालक ती सोडवून घ्यावयाला समर्थ नसेल तर योबेल वर्षापर्यंत ती हल्लीच्या मालकाकडेच रहावी. पण योबेल वर्षी ती मूळ मालकाला परत केलीच पाहिजे.
“ ‘एखाद्याने तटबंदीच्या शहरातील आपले घर विकले असेल, तर त्याला एक वर्षाच्या काळात खंडणी भरून ते परत सोडवून घेता येईल. ते सोडविण्याचा हक्क त्याला पूर्ण एक वर्ष राहील.
नगर तटबंदीच्या आत असलेले घर जर त्याने ते एक वर्षाच्या आत खंडणी भरून सोडवून घेतले नाही, तर ते नव्या मालकाच्या कायमचेच मालकीचे होईल. योबेल वर्षीही ते त्याच्या मूळ मालकाला परत करावे लागणार नाही.
पण गावातील घर म्हणजे ज्या वस्तीला तटबंदी नाही अशा मोकळ्या वस्तीत असलेले घर मात्र केव्हाही खंडणी भरून सोडविता येईल आणि योबेल वर्षी ते घर मालकाला परत केलेच पाहिजे.
“ ‘लेवी वंशातील मनुष्याचे घर तटबंदी असलेल्या शहरात असले तरी ते त्याला केव्हाही खंडणी भरून सोडवून घेता येईल.
म्हणून लेव्यांच्या मालकीचे जे काही आहे ते सोडविता येईल, आणि शहरातील त्यांच्या मालमत्तेतून विकले गेलेले घर योबेल वर्षात सोडविले जाईल, कारण लेवींच्या नगरातील घरेही इस्राएलच्या घराण्यात त्यांची मालमत्ता आहे.
लेव्यांना त्यांच्या शहराभोवती असलेली कुरणे विकण्यास परवानगी नाही, कारण ती त्यांची कायमचीच मालमत्ता आहे.
“इस्राएली लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग: ‘जेव्हा एखादा मनुष्य याहवेहला समर्पणाचे विशेष नवस करेल, तेव्हा त्या व्यक्तीचे मूल्य पुढीलप्रमाणे ठरवावे.
वीस ते साठ वर्षे वयाच्या पुरुषाचे मूल्य पवित्रस्थानाच्या वजनानुसार चांदीचे पन्नास शेकेल असावे,
स्त्रीसाठी तिचे मूल्य चांदीचे तीस शेकेल असावे;
पाच ते वीस वर्षे वयोगटातील व्यक्तीसाठी, पुरुषाचे मूल्य वीस शेकेल असावे आणि स्त्रीसाठी दहा शेकेल असावे;
एक महिना ते पाच वर्षे वयाच्या पुरुषाला चांदीचे पाच शेकेल आणि स्त्रीसाठी चांदीचे तीन शेकेल असावे;
साठ वर्ष आणि अधिक वर्षाच्या पुरुषाचे मूल्य चांदीचे पंधरा शेकेल असावे आणि स्त्रीसाठी दहा चांदीचे शेकेल असावे.
फारच गरिबीमुळे नवस फेडण्यासाठी मनुष्याला इतके शेकेल भरणे शक्य नसेल, तर ज्याचे समर्पण होत आहे त्याला याजकापुढे उभे करावे. मग नवस फेडण्यासाठी याजक ठरवेल तितके शेकेल त्याने द्यावे.
“ ‘जर त्याने एखादा पशू याहवेहला अर्पण करण्याचा नवस केला असेल, तर हे अर्पण याहवेहला पवित्र असे होईल.
त्यांनी त्याची अदलाबदल करू नये किंवा वाईटाच्या बदल्यात चांगला किंवा चांगल्याच्या बदल्यात वाईट असे करू नये; जर ते एका पशूबद्दल दुसरा पशू अशी अदलाबदल करतील, तर दोन्ही पशू आणि बदललेला पशू पवित्र होतील.
जर नवस दिलेला पशू विधिनियमानुसार अशुद्ध असेल—जे याहवेहला अर्पण करण्यास योग्य नाही—तर त्या पशूला याजकाकडे घेऊन यावे.
तो त्याचा दर्जा चांगला किंवा वाईट हे ठरवेल. मग याजक त्याचे जे काही मूल्य ठरवेल, तेवढेच त्याचे मूल्य असेल.
परंतु जर त्या मालकाला तो पशू सोडवून घ्यावयाचा असेल, तर त्याच्या किमतीचा पाचवा भाग अधिक द्यावा.
“ ‘जर एखाद्याने याहवेहला आपले घर पवित्र म्हणून समर्पित केले आणि नंतर त्याची इच्छा असेल की, ते सोडवून घ्यावे, तर याजक त्या घराची चांगलीवाईट स्थिती पाहून त्याचे मूल्य ठरवेल, आणि घरमालक याजकाने ठरविलेली किंमत अधिक वीस टक्के भरून ते घर आपल्या ताब्यात घेईल.
And if he that sanctified it will redeem his house, then he shall add the fifth part of the money of thy estimation unto it, and it shall be his.
“ ‘जर कोणी त्यांच्या वतनाच्या शेताचा काही भाग याहवेहला समर्पित करीत असतील तर त्या शेतामध्ये किती बी पेरले जाऊ शकेल त्याप्रमाणे त्या शेताची किंमत ठरविली जाईल, एक होमेर जव पेरता येईल तेवढ्या भागाचे मूल्य चांदीचे पन्नास शेकेल होतील.