- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Purification बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
नंतर त्याने पवित्रस्थानी पाण्याने स्नान करावे, आपली नियमित वस्त्रे घालावी. मग त्याने बाहेर यावे व स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्चित्ताचे होमार्पण करावे म्हणून स्वतःसाठी होमार्पण व लोकांसाठीही होमार्पण करावे.
“ज्या मनुष्याने पाप वाहून नेण्यासाठी निवडलेला बोकड अरण्यात सोडून दिला, त्याने आपली वस्त्रे धुवावी, पाण्याने स्नान करावे आणि त्यानंतर छावणीत परत यावे.
ज्या मनुष्याने ते जाळून टाकले, त्याने आपली वस्त्रे धुवावीत, स्नान करावे; त्यानंतर छावणीत परत यावे.
“ ‘जर कोणत्या व्यक्तीने, मग तो देशात जन्मलेला किंवा विदेशी असो, यापैकी जो कोणी मेलेल्या किंवा जंगली जनावराने फाडलेल्या मृत प्राण्याचे मांस खाईल, त्याने आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने स्नान करावे आणि तो संध्याकाळपर्यंत विधिनियमानुसार अशुद्ध राहील आणि त्यानंतर तो शुद्ध होईल.
“त्यांना सांग: ‘आतापासून पुढे पिढ्यान् पिढ्या जो कोणी विधिनियमानुसार अशुद्ध असताना इस्राएल लोकांनी याहवेहसाठी आणलेल्या पवित्र अर्पणांना स्पर्श करेल, त्याचा माझ्या समक्षतेपासून उच्छेद करावा; मी याहवेह आहे.
“लेव्यांना सर्व इस्राएली लोकांमधून घेऊन त्यांना विधीनुसार शुद्ध कर.
त्यांना शुद्ध करण्यासाठी तू असे कर: त्यांच्यावर शुद्धीकरणाचे पाणी शिंपडावे; मग त्यांनी आपल्या संपूर्ण अंगावरून वस्तरा फिरवावा व आपले कपडे धुवावे. अशाप्रकारे ते स्वतःला शुद्ध करतील.
लेवी लोकांनी स्वतःला शुद्ध केले आणि आपली वस्त्रे धुतली. मग अहरोनाने त्यांना हेलावणीचे अर्पण म्हणून याहवेहसमोर सादर केले व त्यांच्या शुद्धीकरणासाठी प्रायश्चित्त केले.
त्यानंतर याजकाने आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने आंघोळ करावी. मग त्याने छावणीत यावे, परंतु विधीनुसार संध्याकाळपर्यंत त्याने अशुद्ध राहावे.
जो पुरुष ती कालवड जाळतो त्यानेही आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने आंघोळ करावी आणि त्यानेही संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
मानवी मृतदेहाला स्पर्श केल्यानंतरही जर त्यांनी स्वतःला शुद्ध केले नाही, तर ते याहवेहचा निवासमंडप विटाळवितात. इस्राएली लोकांमधून त्यांना काढून टाकले जावे. कारण शुद्ध करणारे पाणी त्याच्यावर शिंपडले गेले नाही, ते अशुद्ध आहेत; त्यांचा अशुध्दपणा त्यांच्यावर तसाच राहतो.
“अशुद्ध व्यक्तीसाठी, जाळलेल्या शुद्धतेच्या अर्पणातून थोडी राख घेऊन ती एका पात्रात घेऊन त्यांच्यावर स्वच्छ पाणी ओतावे.
आणि जो मनुष्य विधीनुसार शुद्ध आहे, त्याने एजोबाची फांदी घेऊन ती पाण्यात बुचकळावी व ते तंबू व त्याची पात्रे आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांवर शिंपडावे. त्याचप्रमाणे ज्यांनी मानवी हाड किंवा कबर किंवा ज्याचा वध झाला किंवा नैसर्गिकरित्या मरण पावलेल्याला स्पर्श केला त्यांच्यावरही ते पाणी शिंपडावे.
जो मनुष्य शुद्ध आहे, त्याने अशुद्ध झालेल्या व्यक्तींवर तिसर्या व सातव्या दिवशी हे पाणी शिंपडावे आणि सातव्या दिवशी त्याने त्यांना शुद्ध करावे. ज्यांचे शुद्धीकरण होत आहे त्यांनी आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने आंघोळ करावी आणि त्या संध्याकाळी ते शुद्ध होतील.
पण जे अशुद्ध आहेत आणि स्वतःला शुद्ध करीत नाहीत, त्यांना समाजातून काढून टाकले जावे, कारण त्यांनी याहवेहचे पवित्रस्थान विटाळविले आहे. शुद्धतेचे पाणी त्यांच्यावर शिंपडले गेले नाही आणि ते अशुद्ध आहेत.
हा त्यांच्यासाठी कायमचा नियम आहे. “जो मनुष्य शुद्धतेचे पाणी शिंपडतो त्यानेही आपली वस्त्रे धुवावीत आणि जो कोणी शुद्धतेच्या पाण्याला स्पर्श करतो तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.
“जर कोणी एखाद्याला जिवे मारले किंवा जो जिवे मारला गेला त्याला स्पर्श केला त्यांनी सात दिवस छावणीबाहेर राहावे. तिसर्या दिवशी व सातव्या दिवशी तुम्ही स्वतःस व आपल्या बंदिवानांना शुद्ध करावे.
चामडे, बोकडाचे केस किंवा लाकूड या सर्व वस्तूंसह प्रत्येक वस्त्र शुद्ध करावे.”
यानंतर एलअज़ार याजक युद्धास गेलेल्या सैनिकांना म्हणाला, “याहवेहने मोशेला दिलेल्या नियमानुसार ही आज्ञा आहे:
सोने, चांदी, तांबे लोखंड, कथील, शिसे
आणि त्या प्रत्येक वस्तू ज्या अग्नीत टिकतात त्या अग्नीत टाकाव्या, मग त्या शुद्ध होतील. परंतु त्या शुद्धीकरणाच्या पाण्यानेही शुद्ध कराव्या. ज्या वस्तू अग्नीत टिकत नाहीत, त्या शुद्धीकरणाच्या पाण्यात घालून काढाव्या.
सातव्या दिवशी तुम्ही आपली वस्त्रे धुवावीत म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल, मग तुम्ही छावणीत परत यावे.”
मग मृत माणसाच्या देहाच्या सर्वात जवळ असलेल्या नगरातील सगळे वडीलजन आपले हात खोर्यात मान मोडून टाकलेल्या त्या कालवडीवर धुतील,
होमबलींची अर्पणे धुण्यासाठी त्याने दहा गंगाळे तयार करून टाकीच्या उजवीकडे पाच व डावीकडे पाच अशी ठेवली. फक्त याजकवर्गाला धुण्यासाठी हौदाचे पाणी वापरता येत असे.
मी माझे हात धुऊन निर्दोषत्व सिद्ध करेन आणि याहवेह, मी तुमच्या वेदीला परिक्रमा घालेन,