मुख्य मजकुरावर जा

Psalms बद्दल बायबलमधील वचने

896 वचने · 16 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तेव्हा प्रभू वाटेवरील ओहोळातील पाणी पितील, आणि आपले मस्तक उंचावतील.

  2. याहवेहचे स्तवन होवो. जिथे नीतिमान एकत्र येऊन सभा आयोजित करतात, तिथे मी संपूर्ण अंतःकरणापासून याहवेहचे स्तवन करेन.

  3. याहवेहचे कार्य किती उदात्त आहेत, ते त्या अतिमहान कृत्यांचे मनन करतील.

  4. गौरवशाली व वैभवशाली आहेत याहवेहची कृत्ये, आणि त्यांची नीतिमत्ता सर्वकाळ टिकते.

  5. याहवेहनी आपल्या या कृत्यांना अविस्मरणीय केले आहे; ते कृपाळू व दयाळू आहेत.

  6. जे त्यांचे भय धरतात त्यांना ते अन्नाचा पुरवठा करतात; ते आपला करार नेहमी स्मरणात ठेवतात.

  7. त्यांच्या कृत्यांचे सामर्थ्य त्यांच्या लोकांना प्रकट होण्यास, त्यांनी अन्य राष्ट्रांची भूमी त्यांना वतनादाखल दिली.

  8. त्यांच्या हाताने केलेली सर्व कृत्ये न्याय्य आणि विश्वसनीय असतात; त्यांचे सर्व नियम विश्वासयोग्य असतात.

  9. ते नियम सदासर्वकाळ अटळ आहेत, सत्य आणि सात्विकतेला अनुसरून तयार केलेले आहेत.

  10. त्यांनी आपल्या लोकांना मुक्तता दिली आहे; त्यांनी आपला करार अनंतकाळासाठी स्थापित केला आहे— त्यांचे नाव पवित्र व भयावह आहे.

  11. याहवेहचे भय सुज्ञानाचा प्रारंभ होय; त्यांच्या नियमाचे पालन करणार्‍यांना उत्तम आकलन शक्ती प्राप्त होते. याहवेहची सदासर्वकाळ स्तुती होवो.

  12. याहवेहचे स्तवन करा. याहवेहचे भय बाळगणारे, आणि त्यांच्या आज्ञापालनामध्ये आनंद मानणारे आशीर्वादित आहेत.

  13. त्यांची संतती पृथ्वीवर अतिथोर होईल; नीतिमानाची पिढी आशीर्वादित होईल.

  14. संपत्ती व समृद्धी त्यांच्या घरात वास करतील, आणि त्यांची धार्मिकता चिरकाल टिकून राहील.

  15. सात्विकासाठी अंधकारातही प्रकाश उदय पावतो; ते कृपावान, दयाळू व नीतिमान असतात.

  16. ज्यांचे अंतःकरण उदार असून ते मुक्तपणे उसने देतात त्यांचे भले होते, जे आपला व्यवहार न्यायाने करतात.

  17. निश्चितच, नीतिमान कधीही पथभ्रष्ट होणार नाही; त्यांना सर्वकाळ स्मरणात ठेवले जाईल.

  18. वाईट बातमी त्यांना भयभीत करणार नाही; याहवेहवर पूर्ण भरवसा असल्याने त्यांचे मन स्थिर असते.

  19. यामुळेच त्यांचे अंतःकरण सुरक्षित असते, ते भयग्रस्त होत नाहीत; शेवटी तेच आपल्या शत्रूंवर विजयान्वित दृष्टी टाकतील.

  20. गरजवंतांना ते उदारहस्ते दानधर्म करतात, त्यांची नीतिमत्ता चिरकाळ टिकते; गौरवाने त्यांचे शिंग उंचावले जाईल.

  21. दुष्ट मनाची माणसे हे सर्व पाहून क्रुद्ध होतील; ती संतापाने दातओठ खातील व दुर्बल होतील, आणि त्यांच्या सर्व अभिलाषा नष्ट होतील.

  22. याहवेहचे स्तवन करा. हे याहवेहच्या सेवकांनो, याहवेहचे स्तवन करा; याहवेहच्या नावाची स्तुती करा.

  23. याहवेहच्या नामाचे स्तवन होत राहो, आता आणि सदासर्वकाळ.

  24. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत, याहवेहच्या नामाचे स्तवन होवो.

  25. याहवेह सर्व राष्ट्रांहून उच्च आहेत; त्यांचे गौरव गगनमंडळाहून उंच आहे.