मुख्य मजकुरावर जा

Money बद्दल बायबलमधील वचने

192 वचने · 40 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याप्रकारे मी त्यांचे वजन केले, 650 तालंत चांदी, 100 तालंत चांदीची पात्रे, 100 तालंत सोने,

  2. 1,000 दारिक वजनाचे वीस सोन्याचे कटोरे व उज्वल कास्याचे, सोन्याइतकेच मोलाचे दोन सुंदर कटोरेही होते.

  3. आणखी दुसरे काही म्हणाले, “आमची शेते आणि द्राक्षमळे यावरील राजाचा कर भरता यावा म्हणून आम्हाला कर्जाऊ पैसे काढावे लागले आहेत.

  4. मी व माझे बंधू, आणि माझे लोक कोणतेही व्याज न घेता पैसे आणि धान्य उसने देत आहोत. आपण हे व्याज घेणे बंद केले पाहिजे!

  5. त्यांची शेते, द्राक्षमळे, जैतुनाचे मळे आणि घरे त्यांना लगेच परत करा व पैसे, धान्य, नवा द्राक्षारस व जैतुनाचे तेल यावरील एक टक्का जे व्याज म्हणून तुम्ही त्यांच्याकडून घेता ते सोडून द्या.”

  6. “प्रत्येक वर्षी परमेश्वराच्या भवनाच्या सेवेकरिता: प्रत्येकी एक शेकेलचा तिसरा भाग चांदी देण्याची आज्ञा पाळण्याची;

  7. मर्दखयाने त्याला त्याच्या बाबत घडलेले सर्वकाही सांगितले. यहूदी लोकांचा नाश करण्यासाठी जी धनराशी शाही खजिन्यात देण्याचे वचन हामानाने दिले होते त्यासंबंधीही सांगितले.

  8. अतिशुद्ध सोन्याने ते विकत घेता येत नाही, किंवा चांदीच्या मापातही त्याचे मोल करता येत नाही.

  9. मोल चुकते न करताच जर मी त्याचा उपज खाल्ला असेल किंवा भाडेकरूंचे मन मोडले असेल,

  10. त्याचे सर्व भाऊ, बहिणी व ते सर्वजण जे त्याला पूर्वी ओळखत होते त्यांनी त्याच्या घरी येऊन त्याच्याबरोबर भोजन केले. त्यांनी त्याचे सांत्वन केले आणि याहवेहने त्याच्यावर आणलेल्या प्रत्येक संकटाविषयी सहानुभूती दाखविली, आणि प्रत्येकाने त्याला चांदीचे नाणे व सोन्याची अंगठी दिली.

  11. जो व्याज न आकारता पैसे उसने देतो; जो निष्पाप लोकांविरुद्ध साक्ष देण्यासाठी लाच घेत नाही, जो कोणी या गोष्टी करतो तो कधीही ढळणार नाही.

  12. त्याने त्याची पैशाची थैली भरून घेतली आहे, आणि पौर्णिमेपर्यंत ते घरी परत येणार नाहीत.

  13. जसे धन तसेच सुज्ञान हे एक आश्रयस्थान आहे, परंतु सुज्ञानाचा फायदा हा आहे: ज्ञान ज्यांच्या मालकीचे आहे, त्यांचे रक्षण करते.

  14. मनोरंजनासाठी मेजवानी असते, द्राक्षारस जीवनाला आनंदित बनविते, आणि पैशाने सर्व समस्याचे समाधान होते.

  15. पाहा, ज्यांना चांदीची पर्वा नाही, आणि जे सोन्यामध्ये आनंद मानत नाहीत त्या मेदिया लोकांना मी त्यांच्याविरुद्ध चिथावणी देईन.

  16. तुम्ही माझ्यासाठी कधी सुगंधी दालचिनी विकत आणली नाही, किंवा भरगच्च चरबीचे यज्ञार्पण केले नाही. उलट, केवळ तुमच्या पातकांचे ओझे मला दिले व तुमच्या अपराधांनी मला शिणविले.

  17. काहीजण त्यांच्या पिशवीतून सोने काढून ते ओततात व चांदी तराजूत तोलतात; ते एखाद्या सोनाराला दैवत घडविण्यासाठी मजुरीने कामाला लावतात, आणि मग ते त्याच्यापुढे नमन करून त्याची पूजा करतात.

  18. कारण याहवेह म्हणतात: “तुम्हाला विनामूल्य बंदिवासात विकले, आणि आता पैशावाचून तुम्हाला सोडविण्यात येईल.”

  19. “तुमच्यातील सर्व तान्हेल्यांनो, पाण्याजवळ या; आणि तुम्ही, ज्यांच्याकडे पैसे नाहीत, या, घ्या व खा! या, द्राक्षारस अथवा दूध घ्या पैसे न देता, विनामूल्य घ्या.

  20. जी भाकर नाही त्या अन्नपदार्थांवर व्यर्थ पैसे का खर्च करावे, आणि ज्याने समाधान होत नाही त्यासाठी कष्ट का करावे? ऐका, माझे ऐकून घ्या आणि जे चांगले आहे ते खा, आणि हे उत्तम अन्नपदार्थ खाऊन तुम्ही अत्यंत आनंदित व्हाल.

  21. निश्चितच द्वीप माझ्याकडे बघतात; सर्वात पुढे तार्शीशची गलबते आहेत, तुझी लेकरे दूरवरून तुझ्याकडे आणत आहेत, त्यांनी आपले चांदी व सोनेही बरोबर आणले आहे, इस्राएलचे पवित्र परमेश्वर याहवेह, आमच्या परमेश्वराला गौरविण्यासाठी त्यांनी तुला ईश्वरदत्त तेजस्विता बहाल केली आहे.

  22. मग मी माझा चुलतभाऊ हानामेलला सतरा शेकेल चांदी देऊन अनाथोथ येथील ते शेत विकत घेतले.

  23. साक्षीदारांच्या सहीसमेत मी खरेदीखतावर सही केली, त्यावर शिक्का मारला व चांदी तोलून त्याला दिली.

  24. सार्वभौम याहवेह, खास्द्यांच्या हाती हे नगर दिले जाणार असूनही तुम्ही मला म्हणता, ‘चांदीची नाणी देऊन शेत विकत घे आणि साक्षीदारांच्या सहीने खरेदीखत तयार कर.’ ”

  25. बिन्यामीन प्रांतात, येथे यरुशलेममध्ये, तसेच यहूदीयाच्या शहरात, डोंगराळ प्रदेशातील नगरात, पश्चिमेच्या तळवटीच्या प्रदेशात व नेगेवमध्ये देखील चांदीची नाणी देऊन खरेदीखतांवर सह्या होतील, त्यावर शिक्का मारला जाईल, साक्षीदारांच्या सह्या होतील, कारण मी त्यांची पूर्वीची समृद्धी निश्चित परत देईन, असे याहवेह जाहीर करतात.”