मुख्य मजकुरावर जा

Money बद्दल बायबलमधील वचने

192 वचने · 40 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पण तू मोल देऊन विकत घेतलेला गुलाम व ज्याची सुंता तू करून घेतली आहे त्याने ते खावे.

  2. जर तो या तीन गोष्टी तिला पुरवित नाही तर ती पैसे न देताच मोकळी जाऊ शकते.

  3. पण जर गुलाम एक किंवा दोन दिवसात बरा झाला तर त्यांना पैशाची शिक्षा होणार नाही, कारण गुलाम त्यांच्या मालकीचा आहे.

  4. तर ज्याने तो खड्डा उघडला त्याने जनावराच्या मालकाला त्याची किंमत मोजून द्यावी व त्याबदल्यात ते मेलेले जनावर घ्यावे.

  5. “जर कोणाच्या बैलाने दुसर्‍याच्या बैलाला हुंदडून मारले, तर त्या दोघांनी जिवंत असलेला बैल विकून आलेली रक्कम व मेलेला बैल यांचा सारखा वाटा करून घ्यावा.

  6. “जर कोणी चांदी किंवा सामान सुरक्षित राहावे म्हणून आपल्या शेजार्‍याकडे ठेवले आणि त्याची चोरी झाली, जर चोराला पकडले तर त्या चोराने त्या सामानाची दुप्पट भरपाई करून द्यावी.

  7. पण जर तिच्या वडिलांनी ती त्याला देण्यास नाकारले, तरीही त्याने कुमारिकेची वधूकिंमत द्यावी.

  8. “तुमच्यामध्ये असलेल्या माझ्या गरजवंत लोकांना जर तुम्ही उसने पैसे दिले, तर त्यांच्याशी सावकारी व्यवहार करू नका; व व्याज लावू नका.

  9. “तू इस्राएली लोकांना मोजण्यासाठी त्यांची जनगणना करशील, तेव्हा प्रत्येकाने आपली मोजणी झाल्यावर आपल्या जिवासाठी याहवेहस खंडणी द्यावी, म्हणजे तू त्यांची मोजणी करीत असताना त्यांच्यावर कोणतीही पीडा येणार नाही.

  10. प्रत्येकजण ज्यांची मोजणी होईल, त्यांनी पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार अर्धा शेकेल द्यावा, ज्याचे मोल वीस गेरे आहे. हा अर्धा शेकेल याहवेहसाठी अर्पण आहे.

  11. जे वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे आहेत त्या सर्वांनी याहवेहसाठी हे अर्पण द्यावे.

  12. जेव्हा आपल्या जिवासाठी खंडणी म्हणून तुम्ही याहवेहस अर्पण देता, तेव्हा श्रीमंताने अर्ध्या शेकेलापेक्षा अधिक देऊ नये व गरिबानेही कमी देऊ नये.

  13. इस्राएली लोकांकडून प्रायश्चिताचा पैसा घेऊन तो सभामंडपाच्या सेवेकरिता लावावा. तुमच्या जिवासाठी केलेले प्रायश्चित इस्राएली लोकांसाठी याहवेहसमोर स्मारक म्हणून राहील.”

  14. “याहवेहशी अविश्वासूपणा करून त्यांची कोणतीही पवित्र वस्तू चुकून दूषित करून कोणी पापी ठरला, तर त्याने दोषार्पण म्हणून, तू ठरवशील तितक्या निवासमंडपातील चांदीच्या शेकेलांच्या ठरलेल्या किमतीचा एक निर्दोष मेंढा आणावा.

  15. पवित्र वस्तू दूषित करून त्यांनी जे पाप केले त्याची ते भरपाई करतील. त्यांनी भरपाईची रक्कम देऊन वर वीस टक्के अधिक दंड द्यावा. त्यांनी दोषार्पणाचा एक मेंढा याजकाकडे आणावा आणि याजक त्यांच्यासाठी तो मेंढा अर्पून प्रायश्चित्त करेल व त्यांची क्षमा होईल.

  16. पण याजकाने स्वतःच्या पैशाने गुलाम विकत घेतला असेल किंवा जर त्या गुलामांनी याजकाच्या घरात जन्म घेतला असेल, ते त्याचे अन्न खाऊ शकतील.

  17. तुम्ही त्यांना व्याजाने पैसे देऊ नयेत किंवा जे खाद्यपदार्थ तुम्ही त्यांना विकाल त्यावर नफा घेऊ नये.

  18. जर त्याला पुष्कळ वर्षे लागत असतील, तर त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी दिलेल्या किमतीचा मोठा भाग त्यांच्यासाठी द्यावा.

  19. And if he that sanctified it will redeem his house, then he shall add the fifth part of the money of thy estimation unto it, and it shall be his.

  20. तरी, त्याने योबेल वर्षानंतर जर आपले शेत अर्पण केले असेल, तर दुसर्‍या योबेल वर्षाला जितकी वर्षे असतील त्या मानाने याजकाने त्या शेताचे मोल कमी करून मूल्य ठरवावे.

  21. प्रत्येकामागे पवित्रस्थानाच्या शेकेलाप्रमाणे पाच शेकेल घे; म्हणजेच वीस गेरा.

  22. आणि इस्राएली लोकांतील जे अधिक होते त्यांच्या खंडणीचे पैसे अहरोन आणि त्याच्या पुत्रांना द्यावे.”

  23. मोशेने लेव्यांपेक्षा जे अधिक होते त्यांच्याकडून त्यांच्या खंडणीचे पैसे गोळा केले.

  24. इस्राएली लोकांच्या प्रथम जन्मलेल्यांकडून त्याने पवित्रस्थानाच्या शेकेलनुसार 1,365 गोळा केले.

  25. याहवेहच्या वचनाप्रमाणे झालेल्या आज्ञेनुसार मोशेने ते खंडणीचे पैसे अहरोन व त्याच्या पुत्रांना दिले.