मुख्य मजकुरावर जा

Missionary Work By Ministers बद्दल बायबलमधील वचने

93 वचने · 32 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पण मोशे परमेश्वराला म्हणाला, “मी कोण आहे की मी फारोहकडे जावे आणि इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणावे?”

  2. “इस्राएलचे वडीलजन तुझा शब्द मानतील. मग तू आणि वडीलजन इजिप्तच्या राजाकडे जाऊन त्याला सांगा, याहवेह, इब्रींचे परमेश्वर, यांनी आम्हाला दर्शन देऊन सांगितले आहे की आम्ही तीन दिवसांच्या प्रवासाच्या अंतरावर रानात जाऊन याहवेह आमचे परमेश्वर यास यज्ञ अर्पण करावा म्हणून तू आम्हाला जाऊ दे.

  3. याहवेह त्याला म्हणाले, “मनुष्यांना मुख कोणी दिले? त्यांना बहिरा किंवा मुका कोण करतो? त्याला कोण दृष्टी देतो? किंवा कोण आंधळे करतो? तो मी याहवेह नाही का?

  4. आता जा; मी तुला बोलण्यास मदत करेन आणि काय बोलावे ते तुला शिकवेन.”

  5. तू त्याच्याशी बोलून त्याच्या मुखात शब्द घाल; मी तुम्हा दोघांना बोलण्यास मदत करेन, आणि काय करावे हे शिकवेन.

  6. त्यांच्याबरोबर काही विशिष्ट लेवी; शमायाह, नथन्याह, जबद्याह, असाहेल, शमिरामोथ, योनाथान, अदोनियाह, तोबीयाह आणि तोब-अदोनियाह आणि एलीशामा व यहोराम हे याजक होते.

  7. त्यांनी त्यांच्याबरोबर याहवेहच्या नियमशास्त्राचे पुस्तक घेतले आणि संपूर्ण यहूदीयामध्ये शिकविले. त्यांनी यहूदीयाच्या सर्व शहरांत जाऊन लोकांना शिक्षण दिले.

  8. “मला धिक्कार असो!” मी ओरडलो. “मी उद्ध्वस्त झालो! कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये राहतो आणि माझ्या डोळ्यांनी महाराज सर्वसमर्थ याहवेह यांचे मुखावलोकन केले आहे!”

  9. नंतर, सराफीम दूतांपैकी एकाने, वेदीवरील एक निखारा चिमट्याने उचलला व तो उडत माझ्याकडे आला.

  10. माझ्या ओठांना निखाऱ्याने स्पर्श करून तो म्हणाला, “हा निखारा तुझ्या ओठाला लागला आहे, म्हणून तुझ्यातील दोष आता नाहीसा झाला आहे. तुझ्या पातकांसाठी प्रायश्चित करण्यात आले आहे.”

  11. नंतर मी प्रभूची वाणी ऐकली, “मी कोणाला पाठवावे? आणि आपल्यासाठी कोण जाईल?” मी उत्तर दिले, “हा मी इथे आहे, मला पाठवा!”

  12. ते म्हणाले, “जा आणि या लोकांना सांग: “ ‘ते नेहमी पाहत राहिले, तरी त्यांना दिसत नाही, ते नेहमी कानांनी ऐकत असले, तरी त्यांना ऐकू येत नाही व ते ग्रहण करत नाहीत.’

  13. माझ्या पवित्र पर्वतावर सर्वठिकाणी ते कोणाचेही नुकसान किंवा नाश करणार नाहीत, कारण समुद्र जसा पाण्याने व्यापलेला आहे तशीच पृथ्वी याहवेहच्या ज्ञानाने भरून जाईल.

  14. याहवेहसाठी एक नवे गीत गा, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्याची स्तुतिस्तोत्रे गा, तुम्ही जे सागराच्या खोलात जाऊन राहता आणि त्यात असलेले सर्वकाही, तुम्ही बेटांनो व त्यावर राहणारे सर्वजण गीत गा.

  15. अरण्यात व त्याभोवती असणाऱ्या नगरांचे आवाज उंचावू दे; जिथे केदारचा रहिवास आहे, त्या वस्त्या आनंद करोत. सेलाच्या लोकांनो हर्षगीते गा; त्यांना पर्वतशिखरावरून गर्जना करू दे.

  16. त्यांनी याहवेहला गौरव प्रदान करावे आणि त्यांचा महिमा बेटांना घोषित करावा.

  17. पर्वतावरून शुभवार्ता आणणार्‍याचे पाय किती मनोरम आहेत, जे आनंददायी वार्ता आणतात, जे शांतीची घोषणा करतात, जे शुभ संदेश आणतात, जे तारणाची घोषणा करतात, जे सीयोनास म्हणतात, “तुमचे परमेश्वर राज्य करतात!”

  18. “मी तिथे त्यांच्यामध्ये एक चिन्ह पाठवेन आणि त्यातून जे राष्ट्रांतील अवशिष्ट आहेत, त्यांना मी—तार्शीश, पूल, लूद (धनुर्धारी म्हणून प्रसिद्ध असलेले), तूबाल, यावान या देशांमध्ये व दूरवर असलेल्या द्वीपांवर, जिथे कुठेही माझी किर्ती ज्यांच्या कानी पडली नाही व माझे गौरव ज्यांनी पाहिले नाही, अशा ठिकाणी त्यांना पाठवेन. त्या देशांमध्ये ते माझ्या गौरवाची घोषणा करतील.

  19. परंतु याहवेह मला म्हणाले, “ ‘मी कोवळा तरुण आहे,’ असे म्हणू नकोस. मी तुला जिथे पाठवेन, तिथे तुला जावे लागेल आणि मी जे तुला सांगेन, ते तुला बोलावे लागेल.

  20. त्यांना भिऊ नकोस, मी तुला संकटातून सोडविण्यासाठी तुझ्यासह आहे,” याहवेह असे जाहीर करीत आहेत.

  21. तेव्हा याहवेहने माझ्या मुखाला त्यांच्या हातांनी स्पर्श केला आणि मला म्हटले, “माझे वचन मी तुझ्या मुखात टाकले आहे.

  22. परंतु योनाह याहवेहपासून पळाला आणि तार्शीशला गेला. तो पुढे खाली याफो येथे गेला, तिथे त्याला त्या बंदरात बांधलेले एक जहाज सापडले. भाडे दिल्यानंतर, तो जहाजावर चढला आणि याहवेहपासून पळून जाण्यासाठी तार्शीशकडे जहाजाचा प्रवास प्रारंभ गेला.

  23. मग याहवेहने समुद्रावर एक प्रचंड वारा सोडला आणि इतके भयंकर वादळ उठले की जहाज फुटण्याचे भय उद्भवले.

  24. “ऊठ, त्या महान निनवेह शहरात जा आणि मी जो संदेश तुला देत आहे त्याची घोषणा कर.”

  25. तेव्हापासून येशूंनी उपदेश करण्यास सुरुवात केली, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”