Missionary Work By Ministers बद्दल बायबलमधील वचने: Aid those engaged in
Aid those engaged in बद्दल वचने
किंख्रिया मंडळीतील आपली बहीण फीबी जी सेविका आहे, तिची शिफारस करतो.
मी तुम्हाला सांगतो की प्रभूच्या लोकांना शोभेल असे तिला प्रभूमध्ये स्वीकारा आणि जी काही मदत तिला तुमच्यापासून पाहिजे ती द्या, कारण तिने अनेक लोकांचे व माझेही साहाय्य केले आहे.
आणि मी जेव्हा तुमच्याजवळ होतो आणि मला गरज पडली, मी कोणालाही ओझे झालो नाही, कारण मासेदोनियातून जे बंधू आले त्यांनी माझ्या गरजांची परिपूर्ती केली व माझे ओझे कोणत्याही प्रकारे तुम्हावर पडणार नाही आणि मी असेच पुढेही करेन.
प्रिय मित्रा, जे तुला अनोळखी आहेत, त्या काही भावांसाठी आणि बहिणींसाठी तू जे करीत आहेस त्यामध्ये तू विश्वासू आहेस.
त्यांनी मंडळीला तू दाखविलेल्या प्रीतीविषयी साक्ष दिली आहे. कृपा करून त्यांना अशाप्रकारे निरोप देऊन पाठव की ज्यामुळे परमेश्वराचे गौरव व्हावे.
ते गैरयहूदी लोकांकडून कोणतीही मदत न घेता सेवेसाठी बाहेर निघाले हे परमेश्वराच्या नावाच्या गौरवासाठीच होते.
आपण अशा लोकांचे आदरातिथ्य केले पाहिजे, म्हणजे सत्यासाठी आपण एकत्र कार्य करू शकू.