Skip to content

Miracles बद्दल बायबलमधील वचने

338 वचने · 37 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पलिष्टी लोकांच्या त्या पाच पुढार्‍यांनी हे सर्व पाहिले आणि त्याच दिवशी ते एक्रोनकडे परतले.

  2. पलिष्ट्यांनी याहवेहला दोषार्पण म्हणून ज्या गाठीच्या सोन्याच्या प्रतिमा पाठविल्या त्या या: अश्दोद, गाझा, अष्कलोन, गथ आणि एक्रोन यांच्याकरिता प्रत्येकी एक अशा होत्या.

  3. आणि सोन्याच्या उंदरांच्या प्रतिमांची संख्या त्या पाच पुढार्‍यांच्या मालकीचे असलेले पलिष्टी नगरे; तटबंदीची नगरे व त्यांच्या गावांच्या संख्येनुसार होती. बेथ-शेमेशमधील यहोशुआच्या शेतात ज्या मोठ्या खडकावर लेवी लोकांनी याहवेहचा कोश ठेवला तो आजपर्यंत साक्ष म्हणून आहे.

  4. हा गव्हाचा हंगाम नाही काय? मी आता याहवेहकडे मेघगर्जना आणि पाऊस पाठवावा म्हणून प्रार्थना करेन. आणि तुम्हाला समजून येईल की, तुम्ही आपणासाठी राजा मागून याहवेहच्या दृष्टीने किती वाईट गोष्ट केली आहे.”

  5. तेव्हा शमुवेलने याहवेहकडे प्रार्थना केली आणि त्याच दिवशी याहवेहने मेघगर्जना व पाऊस पाठवला. तेव्हा सर्व लोकांनी याहवेहचे आणि शमुवेलचे भय धरले.

  6. मग तुम्ही तुमच्या देवाचा धावा करा, आणि मी माझ्या याहवेहचा धावा करेन. मग जो देव अग्नीद्वारे उत्तर देईल; तोच खरा परमेश्वर.” मग लोक म्हणाले, “तू जे बोलतो ते बरोबर आहे.”

  7. मला उत्तर द्या, हे याहवेह, मला उत्तर द्या, म्हणजे या लोकांना समजेल, याहवेह, तुम्हीच परमेश्वर आहे आणि आपणच त्यांची मने परत वळवित आहात.”

  8. तेव्हा याहवेहचा अग्नी आला आणि होमार्पण, लाकडे, धोंडे आणि माती भस्म करून टाकली आणि खळग्यातील पाणी चाटून टाकले.

  9. जेव्हा सर्व लोकांनी हे पाहिले, तेव्हा ते पालथे पडून रडू लागले, “याहवेह हेच परमेश्वर आहे! याहवेह हेच परमेश्वर आहे!”

  10. मग तो खाली गेला आणि परमेश्वराच्या मनुष्याने सांगितल्याप्रमाणे यार्देन नदीमध्ये सात वेळा बुड्या मारल्या आणि त्याचे शरीर पूर्ववत् होऊन लहान मुलाच्या शरीरासारखे शुद्ध झाले.

  11. नंतर नामान आणि त्याचे सर्व लोक परमेश्वराच्या मनुष्याकडे परत गेले. तो त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, “शेवटी इस्राएलशिवाय जगामध्ये इतरत्र कुठेही परमेश्वर नाही, हे मला आता पूर्णपणे समजून चुकले आहे. तुमच्या सेवकाद्वारे आणलेल्या नजराण्यांचा कृपया स्वीकार करा.”

  12. परमेश्वराने केलेली अद्भुत कार्ये, त्यांचे चमत्कार, आणि त्यांनी केलेले न्याय यांचे स्मरण करा.

  13. शलोमोनाने जेव्हा प्रार्थना करण्याचे संपविले, तेव्हा आकाशातून अग्नी खाली आला आणि त्याने होमार्पणे आणि बलिदाने भस्मसात करून टाकली आणि याहवेहच्या गौरवाने मंदिर भरून गेले.

  14. याजकगण याहवेहच्या मंदिरात प्रवेश करू शकले नाहीत, कारण याहवेहच्या गौरवाने ते मंदिर भरून गेले होते.

  15. जेव्हा सर्व इस्राएली लोकांनी पाहिले की, अग्नी खाली उतरत आहे आणि याहवेहचे गौरव मंदिराच्या वर आहे तेव्हा त्यांनी पदपथावर गुडघे टेकून त्यांची मुखे जमिनीकडे केली आणि आराधना केली आणि याहवेहना असे म्हणत धन्यवाद दिला, “ते चांगले आहेत; त्यांची प्रीती सर्वकाळ टिकते.”

  16. त्यांनी तुमचे ऐकण्याचे नाकारले आणि तुम्ही त्यांच्यामध्ये केलेल्या चमत्कारांची आठवण ठेवली नाही. उलट त्यांनी बंडखोरी केली आणि परत गुलामगिरीत आपल्याला न्यावे म्हणून एक पुढारी नेमला. पण तुम्ही क्षमाशील परमेश्वर आहात, दयाळू आणि कृपाळू, मंदक्रोध व प्रेमाने ओतप्रोत भरलेले आहात. तुम्ही त्यांचा त्याग केला नाही,

  17. आसाफाचे मासकील. अहो माझ्या लोकांनो, माझे विधिनियम ऐका; माझ्या मुखातून निघणार्‍या वचनाकडे कान द्या.

  18. त्यांनी परमेश्वराचा करार पाळला नाही, आणि त्यांच्या नियमशास्त्राप्रमाणे जगण्यास नकार दिला.

  19. त्यांनी केलेली महत्कार्य, त्यांनी दाखविलेले अद्भुत चमत्कार ते विसरले.

  20. त्यांनी आपल्या पूर्वजांसमोर इजिप्तमधील सोअनाच्या मैदानावर अद्भुत कृत्ये केली.

  21. परमेश्वराने समुद्र दुभागला आणि त्यातून त्यांना पार नेले; त्यांच्या दोन्ही बाजूंना पाणी भिंतीसारखे उभे राहिले.

  22. दिवसा ते त्यांना मेघाच्या साहाय्याने आणि रात्री अग्निस्तंभाच्या प्रकाशाच्या साहाय्याने वाट दाखवित नेत असत.

  23. त्यांनी रानात खडक फोडले आणि समुद्राइतके भरपूर पाणी त्यांना दिले.

  24. त्यांनी खडकाळ सुळक्यातून पाण्याचे झरे काढले आणि नद्यांप्रमाणे पाण्याला वाहविले.

  25. असे असतानाही त्यांनी परमेश्वराविरुद्ध बंड करणे आणि देवाधिदेवाविरुद्ध पाप करणे सुरूच ठेवले.