मुख्य मजकुरावर जा

Minister (1) बद्दल बायबलमधील वचने

256 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जर कोणी या लहानातील एकाला, जो माझा शिष्य आहे, त्याला पेलाभर थंड पाणी प्यावयास दिले, तर तो आपल्या पारितोषिकाला मुकणार नाही.”

  2. एखाद्या ठिकाणी तुमचे स्वागत झाले नाही किंवा तुमचे ऐकले नाही, तर ते ठिकाण सोडून द्या व तुमच्या पायांची धूळ तिथेच झटकून टाका, ही त्यांच्याविरुद्ध साक्ष राहील.”

  3. यानंतर प्रभूने आणखी बाहत्तर शिष्य नेमले आणि त्यांना दोघे दोघे ज्या गावात व ठिकाणात ते जाणार होते तिथे त्यांना आपल्यापुढे पाठविले.

  4. त्यांनी त्यांना सांगितले, “पीक अमाप आहे, पण कामकरी थोडे आहेत. हंगामाच्या प्रभूने पिकासाठी शेतावर कामकरी पाठवावे म्हणून प्रार्थना करा.

  5. जा, कोकरांनी लांडग्यांमध्ये जावे त्याप्रमाणे मी तुम्हाला पाठवित आहे.

  6. पैसे किंवा झोळी किंवा पायतण घेऊ नका आणि रस्त्यात कोणाला सलाम करू नका.

  7. “ज्यावेळी तुम्ही एखाद्या घरामध्ये प्रवेश कराल, प्रथम, ‘या घरास शांती लाभो’ असे म्हणा.

  8. जर एखादी शांतिप्रिय व्यक्ती तिथे असेल तर तुमची शांती त्यांच्यावर राहील; नसेल तर ती तुम्हाकडे परत येईल.

  9. घरोघरी न जाता तिथेच राहा आणि तुम्हाला जे देण्यात येईल, ते खा व प्या. कारण कामकरी आपल्या वेतनास पात्र आहे.

  10. “एखाद्या गावाने तुमचे स्वागत केले, तर तिथे तुमच्यापुढे जे वाढण्यात येईल ते खा,

  11. आजार्‍यांस बरे करा आणि त्यांना सांगा, ‘परमेश्वराचे राज्य आता तुमच्याजवळ आले आहे.’

  12. पण जेव्हा तुम्ही एखाद्या गावात प्रवेश करता आणि त्यांनी तुम्हाला स्वीकारले नाही, तर त्यांच्या रस्त्यांवर जाऊन सांगा,

  13. ‘आमच्या पायांना लागलेली तुमच्या गावाची धूळ इशारा म्हणून झटकून टाकतो. परमेश्वराचे राज्य जवळ आले आहे, याची खात्री बाळगा.’

  14. मी तुम्हाला सांगतो, तो दिवस या नगरांपेक्षा सदोमाला अधिक सुसह्य असेल.

  15. “खोराजिना, तुला धिक्कार असो! बेथसैदा, तुला धिक्कार असो! कारण जे चमत्कार तुमच्यामध्ये केले ते सोर आणि सीदोनात केले असते, तर ते गोणपाट नेसून आणि डोक्यात राख घालून केव्हाच पश्चात्ताप करीत बसले असते.

  16. परंतु न्यायाच्या वेळी ते तुमच्यापेक्षा सोर व सीदोन यांना ते अधिक सुसह्य असेल

  17. हे कफर्णहूमा, तू स्वर्गात घेतला जाशील काय? नाही, तू नरकात खोलवर जाशील.

  18. “जे तुमचे ऐकतात, ते माझे ऐकतात आणि जे तुम्हाला नाकारतात, ते मला नाकारतात. परंतु जे मला नाकारतात, ते ज्यांनी मला पाठविले आहे त्यांना नाकारतात.”

  19. मी ख्रिस्ताच्या उदाहरणाचे अनुसरण करतो, तसे तुम्हीही माझे अनुसरण करा.

  20. सर्व गोष्टीत तुम्ही माझी आठवण करता म्हणून मी तुमची प्रशंसा करतो व ज्या रूढी मी तुम्हाला सोपवून दिल्या, त्या तुम्ही घट्ट धरून ठेवल्या आहेत.

  21. तुम्हाला माहीत आहे की स्तेफन आणि त्याचे कुटुंब हे अखया प्रातांमधील पहिले विश्वासू आहेत आणि प्रभूच्या लोकांसाठी सेवाकार्य करण्यासाठी त्यांनी स्वतःला समर्पित केले आहे. बंधू व भगिनींनो मी तुम्हालाही विनंती करतो,

  22. की जे कोणी साहाय्य आणि श्रम करतात अशा लोकांच्या स्वाधीन राहा.

  23. प्रिय बंधू व भगिनींनो, माझे अनुकरण करणारे व्हा, जसा आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिला त्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या.

  24. माझ्याबरोबर येथे बंदिवान असलेला अरिस्तार्ख, तसेच बर्णबाचा नातेवाईक मार्कही तुम्हाला आपली शुभेच्छा पाठवितात. मी पूर्वी सूचना दिल्याप्रमाणे मार्क कधी तुमच्याकडे आला, तर त्याचे मनापासून स्वागत करा.

  25. बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला सांगतो की जे तुम्हामध्ये परिश्रम करतात, जे प्रभूमध्ये तुमची काळजी घेतात आणि तुम्हाला बोध करतात त्यांचा मान राखा.