मुख्य मजकुरावर जा

Minister (1) बद्दल बायबलमधील वचने: Duties of the church to ministers

15 वचने · 2 पैलू

Duties of the church to ministers बद्दल वचने

  1. पण तुझा मदतनीस, नूनाचा पुत्र यहोशुआ प्रवेश करेल. तू त्याला प्रोत्साहन दे, कारण तो या वतनाचा ताबा घेण्यासाठी इस्राएली लोकांचे मार्गदर्शन करेल.

  2. पण तुझ्या जागी यहोशुआची नेमणूक कर. त्याला उत्तेजन दे, धैर्य दे, कारण तोच आपल्या लोकांना पलीकडे घेऊन जाईल आणि जो प्रदेश तुझ्या दृष्टीस पडेल तो त्यांना वतन करून देईल.”

  3. मग मोशेने यहोशुआला बोलाविले आणि सर्व इस्राएली लोकांसमक्ष त्याला सांगितले, “खंबीर हो आणि हिंमत धर, कारण या लोकांच्या पूर्वजांना याहवेहने वचनपूर्वक देऊ केलेल्या देशात तू त्यांच्यासह जावे आणि ती भूमी त्यांचे वतन म्हणून त्यांना विभागून द्यावी.

  4. “याजकांच्या ओठात याहवेहसंबंधीचे ज्ञान साठविलेले असावे, कारण तो सर्वसमर्थ याहवेहचा संदेष्टा आहे आणि लोक त्याच्या मुखाद्वारे शिकवण शोधतात.

  5. मी ख्रिस्ताच्या उदाहरणाचे अनुसरण करतो, तसे तुम्हीही माझे अनुसरण करा.

  6. सर्व गोष्टीत तुम्ही माझी आठवण करता म्हणून मी तुमची प्रशंसा करतो व ज्या रूढी मी तुम्हाला सोपवून दिल्या, त्या तुम्ही घट्ट धरून ठेवल्या आहेत.

  7. तुम्हाला माहीत आहे की स्तेफन आणि त्याचे कुटुंब हे अखया प्रातांमधील पहिले विश्वासू आहेत आणि प्रभूच्या लोकांसाठी सेवाकार्य करण्यासाठी त्यांनी स्वतःला समर्पित केले आहे. बंधू व भगिनींनो मी तुम्हालाही विनंती करतो,

  8. की जे कोणी साहाय्य आणि श्रम करतात अशा लोकांच्या स्वाधीन राहा.

  9. प्रिय बंधू व भगिनींनो, माझे अनुकरण करणारे व्हा, जसा आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिला त्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या.

  10. माझ्याबरोबर येथे बंदिवान असलेला अरिस्तार्ख, तसेच बर्णबाचा नातेवाईक मार्कही तुम्हाला आपली शुभेच्छा पाठवितात. मी पूर्वी सूचना दिल्याप्रमाणे मार्क कधी तुमच्याकडे आला, तर त्याचे मनापासून स्वागत करा.

  11. बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला सांगतो की जे तुम्हामध्ये परिश्रम करतात, जे प्रभूमध्ये तुमची काळजी घेतात आणि तुम्हाला बोध करतात त्यांचा मान राखा.

  12. त्यांच्या कार्यामुळे त्यांना प्रीतीने सर्वोच्च मान द्या, एकमेकांबरोबर शांतीने राहा.

  13. तुम्हाला परमेश्वराचे वचन शिकविणार्‍या तुमच्या वडीलजनांची आठवण ठेवा. त्यांच्या जीवनचरित्राचा परिणाम बघून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.

  14. आपल्या पुढार्‍यांवर भरवसा ठेवा व त्यांच्या अधीन राहा, कारण ते तुमच्यावर नजर ठेवतात आणि तुमच्याविषयी त्यांना प्रभूला हिशोब द्यावा लागतो. अशाने त्यांचे काम आनंदाचे होईल व त्यांना ते ओझे वाटणार नाही, ज्याचा तुम्हाला काहीही लाभ नाही.

  15. आमच्यासाठी प्रार्थना करा. कारण आमची खात्री आहे की आमची विवेकबुद्धी स्वच्छ आहे व सर्व बाबतीत सन्मानाने जगण्याची आमची इच्छा आहे.