मुख्य मजकुरावर जा

Minister (1) बद्दल बायबलमधील वचने

256 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. कारण मी आता पेयार्पणासारखा ओतला जात असून, माझी जाण्याची वेळ आली आहे.

  2. मी चांगले युद्ध लढलो आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे.

  3. पुढे आता माझ्यासाठी जो नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे, प्रभू, आपले नीतिमान न्यायाधीश, त्या दिवशी मला देतील, आणि केवळ मलाच नाही, तर जे त्यांच्या परत येण्याची आवडीने वाट पाहत आहेत, त्या सर्वांना मिळेल.

  4. तुम्हाला परमेश्वराचे वचन शिकविणार्‍या तुमच्या वडीलजनांची आठवण ठेवा. त्यांच्या जीवनचरित्राचा परिणाम बघून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.

  5. आपल्या पुढार्‍यांवर भरवसा ठेवा व त्यांच्या अधीन राहा, कारण ते तुमच्यावर नजर ठेवतात आणि तुमच्याविषयी त्यांना प्रभूला हिशोब द्यावा लागतो. अशाने त्यांचे काम आनंदाचे होईल व त्यांना ते ओझे वाटणार नाही, ज्याचा तुम्हाला काहीही लाभ नाही.

  6. आमच्यासाठी प्रार्थना करा. कारण आमची खात्री आहे की आमची विवेकबुद्धी स्वच्छ आहे व सर्व बाबतीत सन्मानाने जगण्याची आमची इच्छा आहे.