मुख्य मजकुरावर जा

Liberality बद्दल बायबलमधील वचने

149 वचने · 55 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र. जे दुर्बलांची चिंता करतात, ते धन्य; याहवेह त्यांच्या संकटाच्या वेळी त्यांना मुक्त करतील.

  2. याहवेह त्यांचे रक्षण करून त्यांना सांभाळतील— ते आपल्या राष्ट्रात आशीर्वादित होतील— ते त्यांना शत्रूंच्या इच्छेवर सोडणार नाहीत.

  3. ते रोगशय्येवर असता याहवेह त्यांना सांभाळतात; ते आजारी असता त्यांना आरोग्य देऊन त्यांचे अंथरूण बदलतात.

  4. प्रवाशांचे आराधना गीत. हे याहवेह, दावीदाचे व त्याच्या स्वसुखत्यागाचे स्मरण करा.

  5. त्याने याहवेहची शपथ घेतली, याकोबाच्या सर्वसमर्थास असा नवस केला:

  6. “मी ना माझ्या घरात प्रवेश करेन अथवा ना अंथरुणात पडेन,

  7. माझ्या डोळ्यास झोप लागू देणार नाही, वा डुलकीही घेणार नाही,

  8. जेव्हापर्यंत याहवेहसाठी मी एक जागा उपलब्ध करीत नाही, याकोबाच्या सर्वसमर्थासाठी एक निवासस्थान बांधत नाही.”

  9. तुझ्या संपत्तीने व तुझ्या सर्व पिकातील प्रथमफळांनी याहवेहचा सन्मान कर;

  10. तेव्हा तुझी कोठारे समृद्धीने भरून जातील, आणि तुझी कुंडे नव्या द्राक्षारसाने ओसंडून वाहतील.

  11. एक मनुष्य सढळ हाताने देतो, तरी देखील तो समृद्ध होतो, दुसरा मनुष्य दान देणे उगाच नाकारतो आणि तो दरिद्री बनतो.

  12. उदार मनुष्याची समृद्ध होईल; आणि जो दुसर्‍याला प्रोत्साहित करतो, तो स्वतः प्रोत्साहित होईल.

  13. तू आपल्या धान्याची समुद्रावरून निर्यात कर; पुष्कळ दिवसांनी त्याचा मोबदला तुला लाभेल.

  14. सात उपक्रमांमध्ये, होय, आठांमध्ये गुंतवणूक कर; कारण पृथ्वीवर कोणती दुर्घटना घडेल, हे तुला ठाऊक नाही.

  15. ‘आजपासून म्हणजे नवव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी, ज्या दिवशी याहवेहच्या मंदिराचा पाया घालण्याचे काम पूर्ण झाले, त्या दिवसाचा गंभीरपणे विचार करा. गंभीरपणे विचार करा:

  16. धान्याच्या कणगीत एक तरी धान्यकण उरला आहे का? आतापर्यंत द्राक्षवेल, अंजिराच्या झाडाला, डाळिंबाला आणि जैतुनाच्या झाडाला फळे लागलीच नाहीत. “ ‘आजपासून मी तुम्हाला आशीर्वाद देईन.’ ”

  17. तुमचा सर्व दशांश मंदिराच्या भांडारात आणा म्हणजे माझ्या भवनात पुरेसे अन्न राहील. याबाबत तुम्ही माझी परीक्षा घ्या,” सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. “आणि बघा तुमच्यासाठी मी स्वर्गाची धरणद्वारे उघडेन आणि तुमच्यावर आशीर्वादाचा एवढा वर्षाव करेन की ते साठविण्यास तुमच्याजवळ पुरेशी जागाही असणार नाही.

  18. कीटकांना तुमची पिके नाश करण्यापासून मी रोखेन आणि तुमच्या मळ्यातील द्राक्षे पिकण्यापूर्वी गळणार नाहीत,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

  19. “सर्व राष्ट्रे तुम्हाला धन्य म्हणतील, कारण तुमची भूमी आनंददायी असेल.” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

  20. “तुमच्या नीतिमत्वाचे आचरण लोकांसमोर न करण्याची काळजी घ्या. कारण तसे केल्याने तुमच्या स्वर्गीय पित्यापासून मिळणार्‍या प्रतिफळास तुम्ही मुकाल.

  21. “म्हणून तुम्ही एखाद्या गरजवंताला दान देता, तेव्हा तुतार्‍या वाजवून जाहीर करू नका, जसे ढोंगी रस्त्यांवर किंवा सभागृहांमध्ये लोकांकडून मान करून घेण्यासाठी करतात. मी तुम्हाला खरोखर सांगतो की, त्यांना त्यांचे पूर्ण प्रतिफळ मिळाले आहे.

  22. तुम्ही गरजवंतास देता तेव्हा तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू देऊ नका.

  23. म्हणजे तुमचे दान करणे गुप्त राहील, मग तुमच्या गुप्त गोष्टी पाहणारा पिता तुम्हाला प्रतिफळ देईल.

  24. येशू म्हणाले, “तू परिपूर्ण होऊ इच्छित असल्यास जा, तुझी मालमत्ता विकून टाक आणि गरिबांना वाटून दे आणि तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. मग ये व मला अनुसर.”

  25. पण त्या तरुणाने हे ऐकले, तेव्हा तो खिन्न झाला आणि निघून गेला, कारण त्याच्याजवळ पुष्कळ संपत्ती होती.