Liberality बद्दल बायबलमधील वचने: General references
General references बद्दल वचने
“आपल्या धान्यातून किंवा आपल्या फळातून द्यावयाचे दान देण्यास विलंब करू नये. “आपला प्रथम जन्मलेला पुत्र तुम्ही मला समर्पण करावा.
बैल व मेंढे यांच्याविषयी सुद्धा असेच करावे. त्यांना सात दिवस त्यांच्या आईजवळ राहू द्यावे, परंतु आठव्या दिवशी ते मला द्यावे.
मग याहवेह मोशेला म्हणाले,
“इस्राएली लोकांना सांग की, त्यांनी मला अर्पण आणावे. ज्यांना मनापासून देण्याची इच्छा आहे त्यांच्याकडून ते तू माझ्यावतीने स्वीकारावे.
“त्यांच्यापासून तू जी अर्पणे स्वीकारावी ती ही आहेत: “सोने, चांदी आणि कास्य;
निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत आणि रेशमी ताग, बोकडाचे केस;
लाल रंगाने रंगविलेली मेंढ्याची कातडी व टिकाऊ चर्म; बाभळीचे लाकूड;
दिव्यासाठी जैतुनाचे तेल; अभिषेकाचे तेल व सुगंधी धूप यासाठी सुवासिक मसाले;
एफोदाच्या ऊरस्त्राणावर चढविण्यासाठी गोमेद खडे व इतर रत्ने.
“मग मी त्यांच्यामध्ये वस्ती करावी, म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्रस्थान बनवावे.
मोशे सर्व इस्राएल समुदायाला म्हणाला, “याहवेहने जे आज्ञापिले आहे ते हे:
तुमच्याजवळ जे काही आहे, त्यातून याहवेहसाठी अर्पण घ्या. ज्या कोणास याहवेहसाठी अर्पण आणावे अशी इच्छा आहे, त्यांनी हे अर्पण आणावे: “सोने चांदी आणि कास्य,
निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत आणि रेशमी ताग; बोकडाचे केस;
लाल रंगाने रंगविलेली मेंढ्याची कातडी व टिकाऊ चर्म; बाभळीचे लाकूड;
दिव्यासाठी जैतुनाचे तेल; अभिषेकाचे तेल व सुगंधी धूप यासाठी सुवासिक मसाले;
एफोदाच्या ऊरस्त्राणावर चढविण्यासाठी गोमेद खडे व इतर रत्ने.
“तुमच्यामध्ये जे सर्व कुशल कारागीर आहेत, त्यांनी येऊन जे सर्वकाही याहवेहने आज्ञापिले आहे ते तयार करावे:
“निवासमंडप, त्याचा तंबू आणि त्याचे आच्छादन, आकडे, फळ्या, अडसर, खांब व बैठका;
कोश व त्याचे दांडे आणि प्रायश्चिताचे झाकण व त्याचा पडदा;
मेज व त्याचे दांडे आणि त्याचे सर्व सामान आणि समक्षतेची भाकर;
प्रकाशासाठी दीपस्तंभ व त्याची सर्व उपकरणे, दिवे आणि प्रकाशासाठी तेल;
धूपवेदी व तिचे दांडे, अभिषेकाचे तेल व सुगंधी धूप; निवासमंडपाच्या प्रवेशद्वारासाठी पडदा;
होमार्पणाची वेदी, तिची कास्याची जाळी, तिचे दांडे व तिचे सर्व साहित्य; कास्याचे गंगाळ व त्याची बैठक;
अंगणाचे पडदे, त्यांच्या खुंट्या व बैठका आणि अंगणाच्या दाराचा पडदा;
निवासमंडप, त्याचे अंगण व त्यांच्या मेखा व त्यांच्या दोर्या;