Skip to content

Joy बद्दल बायबलमधील वचने

75 वचने · 91 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तारणाच्या विहिरींतून तुम्ही आनंदाने पाणी काढाल.

  2. त्या दिवशी तुम्ही म्हणाल: “याहवेहची स्तुती करा, त्यांच्या नावाची घोषणा करा; त्यांनी जे काही केले आहे ते राष्ट्रांमध्ये माहीत होऊ द्या, आणि असे घोषित करा की, त्यांचे नाव गौरवान्वित आहे.

  3. याहवेहसाठी गीत गा, कारण त्यांनी गौरवशाली कार्ये केली आहेत; हे सर्व जगाला माहीत करून द्या.

  4. सीयोनच्या लोकांनो, मोठ्याने गर्जना करा आणि आनंद गीते गा, कारण इस्राएलचे महान पवित्र परमेश्वर तुमच्यामध्ये आहेत.”

  5. वाळवंट आणि शुष्क भूमी आनंदित होईल; अरण्य हर्षोल्हास करेल आणि बहरून येईल. केशराच्या फुलाप्रमाणे,

  6. त्याच्या फुलोऱ्याचा स्फोट होईल; तो मोठा आनंद करेल आणि उल्हासाने ओरडेल. लबानोनचे गौरव, कर्मेल आणि शारोन यांचे वैभव त्याला दिले जाईल; ते याहवेहचे गौरव, आमच्या परमेश्वराची भव्यता पाहतील.

  7. परंतु मी जी निर्मिती करेन त्यामध्ये आनंद करा व सदोदित हर्ष करा. कारण मी यरुशलेम नगरी संतोषमय व तिचे लोक आनंदी असे निर्माण करेन.

  8. मी यरुशलेमसाठी आनंद करेन आणि माझे लोक मला आनंददायी होतील; यापुढे तिथे रडण्याचा व विलापाचा ध्वनी कधीही कानांवर पडणार नाही.

  9. “यरुशलेमवर प्रीती करणार्‍यांनो, तिच्याबरोबर हर्ष करा व तिच्यासाठी आनंद साजरा करा; तिच्यासाठी शोक करणार्‍या सर्व लोकांनो, तिच्याबरोबर मोठा उल्हास करा.

  10. कारण तिच्या सांत्वन करणाऱ्या स्तनाने तुमचे संगोपन होऊन तुम्ही तृप्त व्हाल; तान्हेबाळ मनमुरादपणे मातेचे स्तनपान करते, तसे तुम्हीही तिच्या ओसंडून वाहणाऱ्या विपुलतेत आनंद कराल.”

  11. कारण याहवेह असे म्हणतात: “मी तिच्या शांततेस नदीप्रमाणे वाढवेन, आणि राष्ट्रांची समृद्धी ओसंडून वाहणाऱ्या झऱ्यांसारखी करेन; तुमचे संगोपन होईल व तुम्ही तिच्या कडेवर बसून फिराल, आणि तिच्या मांडीवर जोजवले जाल.

  12. “अहो राष्ट्रांनो, याहवेहचे वचन ऐका, आणि दूरवरील सर्व सागरतीरांवर ते जाहीर करा: ‘ज्यांनी इस्राएली लोकांना विखरले, तेच त्यांना एकत्र करतील. मेंढपाळाप्रमाणे आपल्या कळपांची निगा राखतील.’

  13. याहवेह याकोबाची सुटका करतील आणि त्यांच्यापेक्षा बलाढ्य राष्ट्रांपासून त्यांना सोडवितील.

  14. ते येतील आणि सीयोनाच्या टेकड्यांवर हर्षगीते गातील; याहवेहच्या विपुल पुरवठ्यासाठी— धान्य, नवा द्राक्षारस, आणि जैतुनाचे तेल, गुरातील व कळपातील पिल्लांसाठी आनंद करतील. भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे ते होतील आणि त्यांची सर्व दुःखे नाहीशी होतील.

  15. त्या समयी तरुण कुमारिका नृत्य करून हर्षावतील, तरुण व ज्येष्ठ लोकही त्यात सहभागी होतील. कारण मी त्यांच्या विलापाचे आनंदात रूपांतर करेन; मी त्यांचे सांत्वन करेन आणि दुःखाऐवजी त्यांना हर्ष प्रदान करेन.

  16. मी मंदिरातील याजकांना विपुल पुरवठ्याने समाधानी करेन, आणि माझे लोक भरघोस साठ्याने तृप्त होतील.” असे याहवेह जाहीर करतात.

  17. मी थकलेल्यांना व मूर्छित झालेल्यांना ताजेतवाने व संतुष्ट करेन.”

  18. एवढ्यात मी जागा झालो व सभोवती पाहिले. माझी झोप अत्यंत सुखद होती.

  19. मानवपुत्रामुळे जेव्हा लोक तुमचा द्वेष करतात, तुमच्यावर बहिष्कार टाकतात आणि तुमचा अपमान करतात, दुष्ट म्हणून तुमचे नाव नाकारतात, तेव्हा तुम्ही धन्य.

  20. “त्या दिवशी आनंदाने उड्या मारा, कारण स्वर्गामध्ये तुमचे प्रतिफळ मोठे आहे. त्यांच्या पूर्वजांनीही संदेष्ट्यांना असेच वागविले होते.

  21. आणि घरी येईल. आपल्या मित्रांना आणि शेजार्‍यांना बोलावून म्हणेल, ‘मजबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे.’

  22. त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की ज्या नव्याण्णव नीतिमान लोकांना पश्चात्तापाची गरज नाही, त्यांच्यापेक्षा पश्चात्ताप करणार्‍या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होतो.

  23. “एका स्त्री जवळ चांदीची दहा नाणी असून त्यातील एक हरवले, तर ती दिवा लावून, घर झाडून ते सापडेपर्यंत त्याचा शोध करणार नाही काय?

  24. त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, पश्चात्ताप करणार्‍या एका पाप्याबद्दल परमेश्वराच्या दूतांच्या समक्षतेत आनंद केला जातो.”

  25. येशू पुढे म्हणाले, “एका मनुष्याला दोन पुत्र होते.