Joy बद्दल बायबलमधील वचने: For deliverance from bondage
For deliverance from bondage बद्दल वचने
“अहो राष्ट्रांनो, याहवेहचे वचन ऐका, आणि दूरवरील सर्व सागरतीरांवर ते जाहीर करा: ‘ज्यांनी इस्राएली लोकांना विखरले, तेच त्यांना एकत्र करतील. मेंढपाळाप्रमाणे आपल्या कळपांची निगा राखतील.’
याहवेह याकोबाची सुटका करतील आणि त्यांच्यापेक्षा बलाढ्य राष्ट्रांपासून त्यांना सोडवितील.
ते येतील आणि सीयोनाच्या टेकड्यांवर हर्षगीते गातील; याहवेहच्या विपुल पुरवठ्यासाठी— धान्य, नवा द्राक्षारस, आणि जैतुनाचे तेल, गुरातील व कळपातील पिल्लांसाठी आनंद करतील. भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे ते होतील आणि त्यांची सर्व दुःखे नाहीशी होतील.
त्या समयी तरुण कुमारिका नृत्य करून हर्षावतील, तरुण व ज्येष्ठ लोकही त्यात सहभागी होतील. कारण मी त्यांच्या विलापाचे आनंदात रूपांतर करेन; मी त्यांचे सांत्वन करेन आणि दुःखाऐवजी त्यांना हर्ष प्रदान करेन.