Skip to content

Hypocrisy बद्दल बायबलमधील वचने

246 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि त्यातून जे वाचतील, ते रोगाला बळी पडतील, आणि त्यांच्या विधवादेखील त्यांच्यासाठी शोक करणार नाहीत.

  2. दुर्जन धुळीसारखा धनाचा साठा करतो व चिखलाप्रमाणे वस्त्र गोळा करून ठेवतो,

  3. जे काही तो साठवून ठेवतो, तरी न्यायी ती वस्त्रे पांघरतील, आणि निरपराधी त्याचे रुपे आपसात वाटून घेतील.

  4. त्याने बांधलेले घर पतंगाच्‍या कोशाप्रमाणे आहे, पहारेकर्‍याच्या झोपडीप्रमाणे ते आहे.

  5. अथवा इतर लोकांप्रमाणे मी माझे अपराध झाकून ठेवले असते, व आपला दोष हृदयात लपवला असता

  6. मी कधी मोठ्या जनसमूहाचे भय धरले काय, कुळाच्या तिरस्काराने मी भयभीत झालो काय, शांतपणे मी घराबाहेर पडलो नाही काय—

  7. “देवहीन हृदयाचे लोक संताप साठवून ठेवतात; त्यांना बेड्या बांधल्या, तरी ते मदतीसाठी रडत नाही.

  8. त्यांच्या भर तारुण्यातच मंदिरांना जीवन समर्पित असलेल्या पुरुषगामींसह ते मरण पावतात.

  9. परंतु परमेश्वर दुष्ट लोकांना उद्देशून म्हणतात: माझ्या नियमांचे पाठांतर करू नका आणि माझा करार आपल्या ओठांनी उच्चारणारा तू कोण?

  10. कारण माझे नियम झुगारून तुम्ही माझी शिस्त अव्हेरली आहे.

  11. ज्याने माझी निंदा केली, तो काही माझा शत्रू नव्हता; असता तर मी ते सहन केले असते; मी लपून बसलो असतो आणि निसटून गेलो असतो.

  12. परंतु माझी निंदा करणारा तूच होतास, माझ्यासारखाच मनुष्य, माझा सोबती आणि माझा जिवलग मित्र,

  13. जेव्हा आम्ही आराधकांसह चालत होतो, तेव्हा त्याच्यासोबत परमेश्वराच्या भवनातील मधुर सहभागितेचा मी आनंद घेतला होता.

  14. माझा जोडीदार आपल्याच मित्रांवर प्रहार करीत आहे; त्याने केलेला करार तोच मोडत आहे.

  15. त्याचे शब्द लोण्याप्रमाणे मृदू वाटतात, पण त्याच्या अंतःकरणात युद्ध सुरू आहे; त्याचे शब्द तेलापेक्षाही मऊ होते, पण उगारलेल्या तलवारींसारखे होते.

  16. जेव्हा परमेश्वर त्यांचा संहार करू लागले, तेव्हा ते त्यांच्या शोध घेऊ लागले; ते मनापासून पुन्हा त्यांच्याकडे वळले.

  17. परमेश्वर आपल्या आश्रयाचा खडक आहेत आपली सुटका करणारे देवाधिदेव आहेत याची त्यांना आठवण झाली;

  18. परंतु ते केवळ त्यांच्या मुखाने त्यांची खुशामत करीत; त्यांच्या जिभेने ते त्यांच्याशी लबाड बोलत;

  19. त्यांची हृदये त्यांच्याशी प्रामाणिक नव्हती; त्यांच्याशी केलेल्या कराराशी ते विश्वासू राहिले नाहीत.

  20. तेव्हा त्याला भेटण्यास एक स्त्री बाहेर आली, तिची वेशभूषा एखाद्या वेश्येसारखी असून ती धूर्त होती.

  21. (ती बेशिस्त आणि उर्मट आहे, तिचे पाय तिच्या घरात थांबत नाहीत;

  22. आता तर ती रस्त्यावर आहे, आता ती चौकांमध्ये आहे प्रत्येक कोपर्‍यावर ती लपून बसते.)

  23. तिने त्याला पकडले आणि त्याचे चुंबन घेतले, आणि निर्लज्ज चेहऱ्याने ती म्हणाली:

  24. आज मी माझी वचने पूर्ण केली आहेत, आणि माझ्या घरी शांत्यर्पण आहे.

  25. म्हणूनच मी तुला भेटण्यासाठी बाहेर आले; मी तुला शोधले आणि तू मला सापडलास!