मुख्य मजकुरावर जा

Humility बद्दल बायबलमधील वचने: General references

60 वचने · 43 पैलू

General references बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जर चंद्र सुद्धा परमेश्वरासमोर प्रकाशमान नाही आणि तारेही त्यांच्या नजरेत शुद्ध नाहीत,

  2. मग मानव तो काय, जो केवळ एक कीटक आहे— मानवप्राणी, तो तर केवळ अळीप्रमाणे आहे!”

  3. प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना. हे याहवेह, माझे हृदय गर्विष्ठ नाही, माझी नजर उन्मत्त नाही; मला समजत नाही अशा महान आणि अद्भुत गोष्टींपासून मी स्वतःला दूर ठेवतो.

  4. दूध तुटलेले मूल जसे आपल्या आईजवळ शांत व गप्प असते; दूध तुटलेल्या मुलासारखा मी आता तृप्त होय.

  5. राजाच्या समक्षतेत प्रौढी मिरवू करू नकोस, आणि त्याच्या प्रतिष्ठित व्यक्तीमध्ये स्थान ग्रहण करण्याचा दावा करू नकोस;

  6. त्याच्या प्रतिष्ठित लोकांसमोर त्याने तुझा अपमान करावा, यापेक्षा “इकडे वर ये” असे तुला बोलणे अधिक रास्त वाटेल. तुझ्या डोळ्यांनी जे काही पाहिले आहे

  7. त्या दिवशी तू यरुशलेमा, माझ्याविरुद्ध जे काही दुष्कृत्य केलेस, त्याबद्दल तू लज्जित केली जाणार नाही, तेव्हा तू माझ्याविरुद्ध बंड करणारी अशी राहणारच नाहीस. कारण मी तुझ्यातील सर्व गर्वाने उन्मत्त झालेली माणसे काढून टाकेन. माझ्या पवित्र पर्वतावर पुन्हा कधीही गर्विष्ठपणा केला जाणार नाही.

  8. मी तुझ्यामध्ये जे गरीब व दीन, असेच अवशिष्ट लोक ठेवेन. इस्राएलचे अवशिष्ट लोक असतील आणि ते याहवेहच्या नामात आश्रय घेतील.

  9. तेव्हा येशूंनी एका लहान लेकराला जवळ बोलाविले आणि त्या लेकराला त्यांच्यामध्ये उभे केले.

  10. मग येशू त्यांना म्हणाले, “मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, जोपर्यंत तुमच्यात बदल होऊन तुम्ही लहान बालकासारखे होत नाही तोपर्यंत स्वर्गाच्या राज्यात कधीही तुमचा प्रवेश होणार नाही.

  11. म्हणून जो कोणी स्वतःला या बालकासारखे नम्र करतो तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वश्रेष्ठ होईल.

  12. पण तुम्हामध्ये तसे नसावे. तुमच्यामध्ये जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो, त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे.

  13. आणि जो कोणी प्रथम होऊ पाहतो, त्याने तुमचा गुलाम व्हावे.

  14. मग ते कफर्णहूमात आले. घरात गेल्यानंतर येशूने त्यांना विचारले, “तुम्ही रस्त्यात कशाविषयी चर्चा करीत होता?”

  15. परंतु शिष्य शांत राहिले कारण मार्गावर असताना आपल्यापैकी सर्वात श्रेष्ठ कोण यासंबंधी शिष्यांचा वादविवाद सुरू झाला होता.

  16. ते खाली बसले, त्यांनी आपल्या बारा शिष्यांना बोलाविले आणि म्हणाले, “तुमच्यामध्ये जो कोणी प्रथम होऊ पाहतो, त्याने सर्वात शेवटचा, आणि सर्वांचा सेवक झाले पाहिजे.”

  17. मग त्यांनी एका लहान लेकराला त्यांच्यामध्ये ठेवले. मग त्या लेकराला कवेत उचलून घेत त्यांना म्हणाले,

  18. “जो कोणी माझ्या नावाने अशा लहान बालकाचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो, तो माझा नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याचा स्वीकार करतो.”

  19. पण तुम्हामध्ये तसे नसावे. तुमच्यामध्ये जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो, त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे.

  20. आणि जो कोणी प्रथम होऊ पाहतो, तो सर्वांचा गुलाम झाला पाहिजे.

  21. आपल्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण होईल, याबद्दल शिष्यांमध्ये वादविवाद सुरू झाला.

  22. पण येशूंनी, त्यांच्या मनातील विचार ओळखले आणि त्यांनी एका लहान बालकाला आपल्या बाजूला उभे करून,

  23. ते शिष्यांना म्हणाले, “जो कोणी या बालकाचा माझ्या नावाने स्वीकार करतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो, तो मला पाठविणार्‍याचा स्वीकार करतो. जो तुम्हामध्ये सर्वात कनिष्ठ आहे तोच थोर आहे.”

  24. परंतु जेव्हा तुम्हाला आमंत्रण दिलेले असेल तर खालच्या जागेवर जाऊन बसा, म्हणजे जेव्हा तुमचा यजमान येतो, तो तुम्हाला म्हणेल, ‘मित्रा, चांगल्या जागेवर ये.’ तेव्हा दुसर्‍या सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये तुमचा सन्मान होईल.

  25. कारण जे सर्व स्वतःला उच्च करतात, त्यांना नम्र केले जाईल आणि जे स्वतःला नम्र करतात, ते उंच केले जातील.”