- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Humility बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
नंतर दावीद राजा आत जाऊन याहवेहसमोर बसला आणि म्हणाले: “हे सार्वभौम याहवेह, मी कोण आहे आणि माझे कुटुंब काय आहे की तुम्ही मला येथवर आणावे?
आणि हे सार्वभौम याहवेह, जणू हे आपल्या दृष्टीने पुरेसे नव्हते म्हणून आपण आपल्या सेवकाच्या घराण्याच्या भविष्याबद्दलही अभिवचन दिले आहे आणि हे याहवेह परमेश्वरा हा करार केवळ एका मनुष्यासाठी आहे!
“मानव तो काय की तुम्ही त्याला इतके महत्त्व द्यावे, व आपले चित्त त्याच्यावर ठेवावे,
दररोज सकाळी त्याची परीक्षा घ्यावी आणि प्रत्येक क्षणाला त्याची पारख करावी?
“तर मी त्यांच्याशी कसा वाद घालणार? त्यांच्याशी वाद घालण्यास शब्द मी कसे शोधू?
मी जरी निर्दोष असलो, तरी मी त्यांना उत्तर देणार नाही; मी केवळ माझ्या न्यायाधीशाजवळ दयेची भीक मागेन.
जर चंद्र सुद्धा परमेश्वरासमोर प्रकाशमान नाही आणि तारेही त्यांच्या नजरेत शुद्ध नाहीत,
मग मानव तो काय, जो केवळ एक कीटक आहे— मानवप्राणी, तो तर केवळ अळीप्रमाणे आहे!”
“मी अयोग्य आहे; मी तुम्हाला काय उत्तर देणार? मी माझा हात माझ्या मुखावर ठेवतो.
मी एकदा बोललो, पण माझ्याकडे उत्तर नाही; दोनदा मी बोललो, पण मी पुन्हा बोलणार नाही.”
“तुम्ही म्हणाला, ‘आता ऐक आणि मी बोलणार; मी तुला प्रश्न करणार, आणि तू मला उत्तर देशील.’
माझ्या कानांनी तुमच्याविषयी ऐकले होते परंतु आता माझ्या डोळ्यांनी तुम्हाला पाहिले आहे.
म्हणून मी माझाच तिरस्कार करतो, आणि धूळ व राखेत बसून पश्चात्ताप करतो.”
जेव्हा तुमच्या बोटांची रचना असलेल्या आकाशाकडे बघून मी विचार करतो, चंद्र आणि तारे यथास्थानी स्थापित केलेले पाहतो,
मनुष्य तो काय की तुम्ही त्याची आठवण ठेवावी? मानवप्राणी तो काय की तुम्ही त्याची काळजी करावी?
प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना. हे याहवेह, माझे हृदय गर्विष्ठ नाही, माझी नजर उन्मत्त नाही; मला समजत नाही अशा महान आणि अद्भुत गोष्टींपासून मी स्वतःला दूर ठेवतो.
दूध तुटलेले मूल जसे आपल्या आईजवळ शांत व गप्प असते; दूध तुटलेल्या मुलासारखा मी आता तृप्त होय.
हे याहवेह, मानव तो काय की तुम्ही त्याची काळजी घ्यावी, नश्वर मानव तो काय की त्याचा तुम्ही विचार करावा?
कारण मानव केवळ श्वासवत आहे; सरणार्या सावलीप्रमाणे त्याचे आयुष्य आहे.
राजाच्या समक्षतेत प्रौढी मिरवू करू नकोस, आणि त्याच्या प्रतिष्ठित व्यक्तीमध्ये स्थान ग्रहण करण्याचा दावा करू नकोस;
त्याच्या प्रतिष्ठित लोकांसमोर त्याने तुझा अपमान करावा, यापेक्षा “इकडे वर ये” असे तुला बोलणे अधिक रास्त वाटेल. तुझ्या डोळ्यांनी जे काही पाहिले आहे
मी फक्त पशुतुल्य आहे, मनुष्य नाही; मला मानवी समज नाही.
मी सुज्ञता शिकलो नाही, तसेच मला पवित्र परमेश्वराचे ज्ञानही नाही.
याहवेह, मला माहीत आहे की मानवाचे जीवन त्यांच्या हातात नाही; ते स्वतःचे मार्गदर्शन करू शकत नाहीत.
हे याहवेह मला अनुशासित करा, परंतु ते रास्तपणे करा— रागाने करू नका, नाहीतर मी नाहीसा होईन.