Skip to content

Humility बद्दल बायबलमधील वचने: Exemplified

31 वचने · 43 पैलू

Exemplified बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नंतर दावीद राजा आत जाऊन याहवेहसमोर बसला आणि म्हणाले: “हे सार्वभौम याहवेह, मी कोण आहे आणि माझे कुटुंब काय आहे की तुम्ही मला येथवर आणावे?

  2. आणि हे सार्वभौम याहवेह, जणू हे आपल्या दृष्टीने पुरेसे नव्हते म्हणून आपण आपल्या सेवकाच्या घराण्याच्या भविष्याबद्दलही अभिवचन दिले आहे आणि हे याहवेह परमेश्वरा हा करार केवळ एका मनुष्यासाठी आहे!

  3. “मानव तो काय की तुम्ही त्याला इतके महत्त्व द्यावे, व आपले चित्त त्याच्यावर ठेवावे,

  4. दररोज सकाळी त्याची परीक्षा घ्यावी आणि प्रत्येक क्षणाला त्याची पारख करावी?

  5. “तर मी त्यांच्याशी कसा वाद घालणार? त्यांच्याशी वाद घालण्यास शब्द मी कसे शोधू?

  6. मी जरी निर्दोष असलो, तरी मी त्यांना उत्तर देणार नाही; मी केवळ माझ्या न्यायाधीशाजवळ दयेची भीक मागेन.

  7. “मी अयोग्य आहे; मी तुम्हाला काय उत्तर देणार? मी माझा हात माझ्या मुखावर ठेवतो.

  8. मी एकदा बोललो, पण माझ्याकडे उत्तर नाही; दोनदा मी बोललो, पण मी पुन्हा बोलणार नाही.”

  9. “तुम्ही म्हणाला, ‘आता ऐक आणि मी बोलणार; मी तुला प्रश्न करणार, आणि तू मला उत्तर देशील.’

  10. माझ्या कानांनी तुमच्याविषयी ऐकले होते परंतु आता माझ्या डोळ्यांनी तुम्हाला पाहिले आहे.

  11. म्हणून मी माझाच तिरस्कार करतो, आणि धूळ व राखेत बसून पश्चात्ताप करतो.”

  12. जेव्हा तुमच्या बोटांची रचना असलेल्या आकाशाकडे बघून मी विचार करतो, चंद्र आणि तारे यथास्थानी स्थापित केलेले पाहतो,

  13. मनुष्य तो काय की तुम्ही त्याची आठवण ठेवावी? मानवप्राणी तो काय की तुम्ही त्याची काळजी करावी?

  14. प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना. हे याहवेह, माझे हृदय गर्विष्ठ नाही, माझी नजर उन्मत्त नाही; मला समजत नाही अशा महान आणि अद्भुत गोष्टींपासून मी स्वतःला दूर ठेवतो.

  15. दूध तुटलेले मूल जसे आपल्या आईजवळ शांत व गप्प असते; दूध तुटलेल्या मुलासारखा मी आता तृप्त होय.

  16. हे याहवेह, मानव तो काय की तुम्ही त्याची काळजी घ्यावी, नश्वर मानव तो काय की त्याचा तुम्ही विचार करावा?

  17. कारण मानव केवळ श्वासवत आहे; सरणार्‍या सावलीप्रमाणे त्याचे आयुष्य आहे.

  18. मी फक्त पशुतुल्य आहे, मनुष्य नाही; मला मानवी समज नाही.

  19. मी सुज्ञता शिकलो नाही, तसेच मला पवित्र परमेश्वराचे ज्ञानही नाही.

  20. याहवेह, मला माहीत आहे की मानवाचे जीवन त्यांच्या हातात नाही; ते स्वतःचे मार्गदर्शन करू शकत नाहीत.

  21. हे याहवेह मला अनुशासित करा, परंतु ते रास्तपणे करा— रागाने करू नका, नाहीतर मी नाहीसा होईन.

  22. “त्यावेळी नीतिमान लोक त्याला म्हणतील, ‘प्रभूजी, तुम्ही भुकेले असताना आम्ही तुम्हाला केव्हा पाहिले आणि अन्न दिले आणि तहानलेले असताना तुम्हाला प्यावयाला दिले?

  23. तुम्ही परके असताना आम्ही तुम्हाला केव्हा पाहिले आणि घरात घेतले किंवा तुम्ही वस्त्रहीन असताना तुम्हाला वस्त्रे दिली?

  24. तुम्ही आजारी असताना किंवा तुरुंगात असताना, आम्ही केव्हा तुमच्या भेटीला आलो?’

  25. “मग राजा उत्तर देऊन म्हणेल, ‘मी तुम्हाला निश्चित सांगतो, जे काही या लहानातील माझ्या एकाही भावा-बहिणीसाठी तुम्ही केले ते तुम्ही माझ्यासाठी केले.’