- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Falsehood बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
त्रास देणारा आणि दुष्कर्मी मनुष्य, जो विपरीत गोष्टी बोलत फिरतो,
तो आपले डोळे मिचकावितो, आपल्या पायांनी इशारे करतो, आणि आपल्या हाताच्या बोटांनी खुणावतो.
याहवेह सहा गोष्टींचा द्वेष करतात, त्यांना सात गोष्टींचा तिटकारा वाटतो:
गर्विष्ठ नजर, खोटे बोलणारी जीभ, हात, जे निष्पाप व्यक्तीचा रक्तपात करतात,
हृदय, जे दुष्ट योजना करते पाय, जे दुष्कृत्य करण्यासाठी वेगाने धावतात.
खोटा साक्षीदार, जो असत्याचा वर्षाव करतो, आणि जो व्यक्ती समाजात कलह निर्माण करतो.
सात्विक व सरळ जीवन जगणारा निर्भयतेने चालतो, परंतु जो वाकड्या मार्गानी चालतो तो पकडला जाईल.
जो दुष्टतेने डोळे मिचकावितो तो दुःखाचे कारण होतो, परंतु मूर्खपणाची बडबड करणार्या नाश होतो.
सत्याची वाणी काळाच्या कसोटीला उतरते; लबाड जिव्हा ही क्षणिक आहे.
दुष्ट योजना करणार्यांच्या हृदयात कपट असते, पण शांतीची मसलत देणार्यांच्या हृदयात आनंद असतो.
जसा एखादा माथेफिरू मृत्यूचे जळते बाण फेकतो,
तो अशा मनुष्यासारखा आहे, जो त्याच्या शेजार्यांना फसवितो आणि म्हणतो, “मी तर गंमत करीत होतो!”
शत्रू त्यांच्या वाणीद्वारे स्वतःला लपवितात, परंतु कपटाला ते त्यांच्या मनात थारा देतात.
जरी त्यांचे भाषण प्रसन्न करणारे आहे, तरी त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, कारण सात प्रकारच्या वाईट गोष्टींनी त्यांचे अंतःकरण भरलेले असते.
त्यांचा द्वेषभाव लबाडीद्वारे लपविलेला असला तरी, त्यांचा दुष्टपणा सभेमध्ये उघड केला जाईल.
कारण तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत, तुमची बोटे दोषीपणाने बरबटलेली आहेत. तुमच्या ओठांनी असत्य बोललेले आहे, आणि तुमची जीभ दुष्टतेच्या गोष्टी पुटपुटते.
कोणी न्यायाने वागत नाही; कोणीही सत्याने खटला लढत नाही. ते निरर्थक वाद घालतात आणि खोटे शब्द उच्चारतात; ते क्षुब्धतेची गर्भधारण करतात आणि दुष्टतेस जन्म देतात.
कारण तुमच्या नजरेत आमचे अनेक अपराध आहेत, आणि आमची पापेच आमच्याविरुद्ध साक्ष देतात. आमचे अपराध सतत आमच्यासह असतात आमचे हे घोर अन्याय आम्ही कबूल करतो:
याहवेहच्या विरुद्ध केलेली बंडखोरी व लबाडी, परमेश्वराकडे फिरविलेली पाठ, बंडखोरी व छळवणूकीस प्रक्षुब्ध करणे, आमच्या अंतःकरणातून प्रसवलेले निखालस असत्य.
मित्र मित्रास फसवितो, आणि कोणीही सत्य बोलत नाही. त्यांनी त्यांच्या जिभेला खोटे बोलणे शिकविले आहे; अगदी दमून जाईपर्यंत ते पाप करीत राहतात.
तू फसवणुकीच्या मध्ये आपले निवास बनविले आहे; त्यांच्या या कपटामुळे ते माझे अस्तित्व नाकारतात,” असे याहवेह म्हणतात.
इस्राएली लोकहो, याहवेहचे वचन ऐका. या देशात राहणार्यांवर याहवेहचा आरोप आहे: या देशात विश्वासूपणा नाही, प्रीती नाही, परमेश्वराप्रती ज्ञान नाही.
या ठिकाणी फक्त शाप, खोटे बोलणे आणि खून, चोरी आणि व्यभिचार आहे; सर्व सीमाबंदी ते मोडून टाकतात, आणि रक्तपातानंतर रक्तपात होतो.
“ते सुद्धा असे उत्तर देतील, ‘प्रभूजी तुम्ही भुकेले, तहानलेले, परके, उघडे, आजारी किंवा तुरुंगात असताना आम्ही तुम्हाला केव्हा पाहिले आणि तुमची मदत केली नाही?’
“तो त्यांना उत्तर देईल, ‘खरोखर, या कनिष्ठांना करण्याचे तुम्ही नाकारले, तेव्हा तुम्ही माझ्यासाठी करण्याचे नाकारले.’