Skip to content

Falsehood बद्दल बायबलमधील वचने: General references

55 वचने · 1 पैलू

General references बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “जर कोणी त्याच्या शेजारच्या मनुष्यावर त्याने सोपविलेल्या काही गोष्टीबाबत फसवणूक करून किंवा त्याची काळजी न घेता किंवा काहीतरी चोरी करून किंवा त्यांच्या शेजार्‍याला फसवून याहवेहविरुद्ध विश्वासघात केला असेल, तर तो पाप करतो

  2. किंवा जर कोणाला हरवलेली वस्तू सापडली आणि त्याबद्दल ते खोटे बोलतील आणि तिच्याविषयी खोटी शपथ वाहतील किंवा जर लोकांनी केलेल्या अशा पापाबद्दल ते खोटे बोलतील,

  3. अशा कोणत्याही प्रकारे जर ते पाप करतील आणि त्यांच्या पापांची त्यांना जाणीव होईल, तेव्हा त्यांनी ती चोरलेली वस्तू किंवा बळजबरीने जे घेतले असेल ते किंवा जे काही त्यांच्यावर सोपविलेले असेल किंवा हरवलेली संपत्ती सापडल्यास ती परत करावी—

  4. किंवा अशा कोणत्याही गोष्टीबद्दल त्यांनी खोटी शपथ घेतली असेल तर, ज्या दिवशी दोषार्पण आणतील, त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या गुन्ह्याबद्दल वीस टक्के अधिक दंड म्हणून त्या वस्तूच्या मालकाला द्यावा.

  5. आणि दंड म्हणून त्यांनी याजकाकडे, म्हणजेच याहवेहसाठी, कळपातून एक निर्दोष व योग्य किमतीचा एक मेंढा दोषार्पण म्हणून आणावा.

  6. याप्रकारे त्यांच्यासाठी याजक याहवेहसमोर प्रायश्चित करेल आणि ज्या गोष्टींमुळे ते दोषी झाले असतील, त्याबद्दल त्यांना क्षमा केली जाईल.”

  7. “ ‘तुम्ही चोरी करू नये. “ ‘खोटे बोलू नये. “ ‘एकमेकांना फसवू नये.

  8. “ ‘तुम्ही माझ्या नावाने खोटी शपथ वाहू नये आणि तुमच्या परमेश्वराचे नाव अपवित्र करू नये. मी याहवेह आहे.

  9. “जर मी खोटेपणात चाललो आहे किंवा कपटाकडे माझा पाय घाईने उचलले;

  10. तर परमेश्वर सत्याच्या तराजूत मला तोलून पाहो आणि मी निरपराधी आहे हे त्यांना समजेल—

  11. प्रत्येकजण त्यांच्या शेजार्‍यांशी लबाड बोलतो, ते त्यांच्या ओठांनी खुशामत करतात परंतु त्यांच्या हृदयात कपट असते.

  12. खुशामत करणारे सर्व ओठ, आणि प्रत्येक गर्विष्ठ जीभ याहवेह कापून टाको.

  13. तुझी जीभ कपट रचते तुमच्या मुखातून ओंगळ भाषा बोलली जाते.

  14. तुम्ही बसून आपल्या भावाविरुद्ध साक्ष देता आणि आपल्या सख्ख्या भावाची निंदा करता.

  15. तू जो फसव्या कृतीत गुंतलेला आहे, दिवसभर तुझी जीभ तीक्ष्ण वस्तर्‍यासारखी विनाशाची योजना करीत असते.

  16. तुला चांगल्यापेक्षा दुष्टपणा, सत्य बोलण्यापेक्षा असत्य अधिक प्रिय आहे. सेला

  17. अगे कपटी जिभे, अपायकारक बोलणे तुला प्रिय आहे!

  18. परंतु परमेश्वर तुला शाश्वत विनाशाकडे आणतील; तुझ्या डेर्‍यातून तुला ओढून बाहेर काढतील आणि जिवंतांच्या भूमीतून समूळ नष्ट करून तुला दूर नेतील. सेला

  19. हे याहवेह, असत्य बोलणार्‍या ओठांपासून व कपटी जिव्हेपासून माझा बचाव करा.

  20. अगे कपटी जिभे, ते तुला काय करतील, आणखी तुला कशी वागणूक मिळेल?

  21. ते तुला योद्ध्यांच्या तीक्ष्ण बाणांनी, केरसुणीच्या लाकडांच्या निखार्‍यांनी दंड करतील.

  22. सुज्ञान तुला दुष्ट माणसांच्या मार्गापासून आणि शब्द विकृत करणार्‍या माणसांपासून दूर ठेवील.

  23. ज्यांनी अंधाराच्या मार्गाने जाण्यासाठी सरळपणाच्या वाटा सोडून दिल्या आहेत,

  24. ज्यांना दुष्कर्म करण्यात आनंद वाटतो आणि दुष्टांच्या कुटिलपणात जे उल्हासतात,

  25. ज्यांचे मार्ग विकृत आहेत आणि ज्यांच्या वाटा विपरीत आहेत!