Skip to content

Contracts बद्दल बायबलमधील वचने

56 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नंतर यहोशुआने त्यांनी जगावे यासाठी त्यांच्याबरोबर शांतीचा करार केला आणि मंडळीच्या पुढार्‍यांनी शपथेच्याद्वारे या गोष्टीला संमती दिली.

  2. त्यांनी गिबोनी लोकांबरोबर करार केल्याच्या तीन दिवसानंतर, इस्राएली लोकांनी जेव्हा ऐकले की ते त्यांचे शेजारी होते, त्यांच्या जवळच राहत होते.

  3. परंतु इस्राएली लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला नाही, कारण मंडळीच्या पुढार्‍यांनी याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या नावाने त्यांना तशी शपथ दिली होती. संपूर्ण सभेने पुढार्‍यांविरुद्ध कुरकुर केली,

  4. परंतु सर्व पुढार्‍यांनी उत्तर दिले, “आपण याहवेह इस्राएलच्या परमेश्वराद्वारे त्यांना शपथ दिली आहे आणि आता आपण त्यांना स्पर्श करू शकत नाही.

  5. आपण त्यांच्यासाठी असे करू या: आपण त्यांना जिवंत राहू देऊ, म्हणजे आपण त्यांना दिलेली शपथ मोडल्याबद्दल परमेश्वराचा क्रोध आपल्यावर येणार नाही.”

  6. ते पुढे म्हणाले, “त्यांना जगू द्या, परंतु त्यांनी संपूर्ण मंडळीच्या सेवेसाठी लाकूड तोडणारे आणि पाणी वाहणारे म्हणून राहावे.” अशाप्रकारे पुढार्‍यांनी त्यांना दिलेल्या वचनाचे पालन केले.

  7. नंतर यहोशुआने गिबोनी लोकांना बोलावून घेतले आणि त्यांना विचारले, “आम्ही दूरच्या देशात राहतो असे सांगून तुम्ही आमची फसवणूक का केली? खरे पाहिले तर तुम्ही आमच्या जवळच राहता.

  8. तुमच्यावर आता शाप आला आहे: तुम्हाला आता माझ्या परमेश्वराच्या घरासाठी लाकडे तोडणारे आणि पाणी वाहणारे या सेवेतून कधीही सोडविले जाणार नाही.”

  9. तेव्हा त्यांनी यहोशुआला उत्तर दिले, “कारण आम्हाला असे सांगण्यात आले होते की, याहवेह तुमच्या परमेश्वरांनी आपला सेवक मोशेला हा संपूर्ण प्रदेश जिंकून घेण्याची आणि त्यात राहणार्‍या सर्व लोकांना नष्ट करण्याची आज्ञा दिली होती. म्हणून तुमच्यामुळे आम्हाला आमच्या जिवाबद्दल भीती वाटू लागली; म्हणूनच आम्ही हे केले.

  10. आता आम्ही सर्वस्वी तुमच्या हाती आहोत. तुम्हाला चांगले व योग्य वाटेल त्याप्रमाणे आमचे करा.”

  11. तेव्हा यहोशुआने त्यांना इस्राएली लोकांपासून वाचविले व त्यांना जिवे मारू दिले नाही.

  12. यहोशुआने त्या दिवशी इस्राएली लोकांच्या सभेकरिता आणि याहवेह निवडतील त्या ठिकाणच्या वेदीसाठी त्यांना लाकूडतोडे व पाणके म्हणून नेमले. हीच व्यवस्था आजपर्यंत आहे.

  13. माझी माणसे ती लबानोनपासून भूमध्य समुद्रापर्यंत ओढून नेतील, मी त्यांचे ताफे बनवून जे ठिकाण आपण मला सांगाल तिथपर्यंत पोचते करेन. तिथे मी ते वेगळे करेन आणि मग आपण ते घेऊन जाऊ शकता. आणि माझ्या राजकीय घराण्याला आपण अन्न पुरवावे ही माझी इच्छा आपण पूर्ण करावी.”

  14. याप्रकारे हीरामाने शलोमोनला हवे तेवढ्या गंधसरू आणि देवदारू लाकडांचा पुरवठा केला.

  15. आणि शलोमोनने हीरामाला त्याच्या घराण्यासाठी अन्न म्हणून वीस हजार कोर गहू, त्याचबरोबर वीस हजार कोर दाबून काढलेले जैतुनाचे तेल दिले. याप्रकारे शलोमोन वर्षानुवर्षे ते पाठवित राहिला.

  16. “स्वर्गाचे राज्य एका जमीनदारासारखे आहे. तो आपल्या द्राक्षमळ्यातील हंगामाचे पीक कापण्याकरिता मजूर शोधण्यासाठी अगदी सकाळीच बाहेर पडला.

  17. एक दिवसासाठी एक दिनार देण्याचे कबूल करून, त्याने मजुरांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठविले.

  18. “सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो बाहेर गेला, तेव्हा बाजारपेठेत दुसरे काही मजूर रिकामे उभे असल्याचे त्याने पाहिले.

  19. त्याने त्यांना म्हटले, ‘तुम्ही जाऊन माझ्या द्राक्षमळ्यात काम करा आणि योग्य ती मजुरी मी तुम्हाला देईन.’

  20. म्हणून ते गेले. “तो पुन्हा दुपारच्या सुमारास बाहेर गेला. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारासही त्याने असेच केले.

  21. पाच वाजता तो बाहेर गेला असताना, काही लोक रिकामे उभे असलेले त्याने पाहिले. त्याने त्यांना विचारले, ‘तुम्ही येथे दिवसभर काही काम न करता का थांबला आहात?’

  22. “ ‘आम्हाला कोणी मजुरीवर लावले नाही,’ त्यांनी उत्तर दिले. “तो त्यांना म्हणाला, ‘मग तुम्ही सुद्धा जाऊन माझ्या द्राक्षमळ्यात काम करा.’

  23. “संध्याकाळी धन्याने आपल्या मुकादमाला सांगितले, ‘द्राक्षमळ्यामध्ये आलेल्या मजुरांना बोलवा आणि जे शेवटी आले होते त्यांच्यापासून आरंभ करून जे प्रथम आले होते त्या सर्वांना मजुरी द्या.’

  24. “तेव्हा संध्याकाळी पाच वाजता आलेल्या मजुरांना एक दिनार मजुरी मिळाली.

  25. त्यावरून आधी आलेल्या मजुरांना, आपल्याला अधिक मजुरी मिळेल, असे वाटले; परंतु त्यांनाही एका दिवसाचीच मजुरी मिळाली.