Skip to content

Contracts बद्दल बायबलमधील वचने

56 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पण लाबान त्याला म्हणाला, “माझ्यावर तुझी कृपादृष्टी असेल तर कृपया थांब. तुझ्यामुळे याहवेहने मला आशीर्वाद दिला आहे हे मला भविष्यकथनाने कळले आहे.

  2. तुला किती वेतन हवे ते मला सांग म्हणजे मी तुला तेवढे देईन.”

  3. याकोब त्याला म्हणाला, “मी तुमची चाकरी कशी केली आणि तुमची गुरे माझ्या देखरेखीखाली कशी राहिली हे तुम्हाला माहीत आहे.

  4. “मी तुला काय देऊ?” त्याने विचारले. “मला काहीही देऊ नका,” याकोबने उत्तर दिले. “पण जर तुम्ही माझ्यासाठी हे केले तर मी तुमच्या कळपांचे पालन करेन आणि त्यांचा सांभाळ करेन:

  5. आज मला तुमचे सर्व कळप बघून घेऊ द्या म्हणजे मी त्यातून डाग व ठिपके असलेली मेंढरे व बोकडे आणि गडद रंगाची मेंढरे वेगळी करेन व तेच माझे वेतन होईल.

  6. आणि जेव्हा तुम्ही मला दिलेले वेतन तपासाल तेव्हा भविष्यात माझा प्रामाणिकपणा माझ्यासाठी साक्ष देईल. म्हणजे माझ्या कळपात तुम्हाला एखादा डाग व ठिपके नसलेला बोकड किंवा मेंढा आढळला, तर मी तो तुमच्या कळपातून चोरून घेतला आहे, हे तुम्हाला समजेल.”

  7. लाबान म्हणाला, “ठीक आहे, तू म्हणतोस तसे होऊ दे.”

  8. “तुम्ही जर एखादा इब्री गुलाम विकत घेतला, तर त्याने तुमची सहा वर्षे सेवा करावी. परंतु सातव्या वर्षी तो काहीही भरपाई न घेता स्वतंत्र होईल.

  9. जर तो एकटाच आला, तर तो एकटाच स्वतंत्र जाईल; परंतु तो आपल्या पत्नीसोबत आला तर तीसुद्धा त्याच्याबरोबर जाईल.

  10. जर गुलाम असताना त्याच्या मालकाने त्याचे लग्न करून दिले आणि त्याला मुले व मुली झाले, तर ती स्त्री व तिची लेकरे त्या मालकाच्या हक्काची राहतील आणि तो मनुष्य एकटाच स्वतंत्र केला जाईल.

  11. “पण जर तो गुलाम जाहीर करतो की, मी माझ्या मालकावर, माझ्या पत्नीवर व माझ्या लेकरांवर प्रीती करतो आणि तुम्हाला सोडून जाण्याची माझी इच्छा नाही,

  12. तर त्याच्या मालकाने त्याला न्यायाधीशांसमोर आणावे. मग त्याने त्याला दरवाजाकडे किंवा दरवाजाच्या चौकटीजवळ आणावे व आरीने त्याचा कान टोचावा. यानंतर तो त्याचा जीवनभर गुलाम म्हणून राहील.

  13. याहवेह मोशेला म्हणाले:

  14. “जर कोणी त्याच्या शेजारच्या मनुष्यावर त्याने सोपविलेल्या काही गोष्टीबाबत फसवणूक करून किंवा त्याची काळजी न घेता किंवा काहीतरी चोरी करून किंवा त्यांच्या शेजार्‍याला फसवून याहवेहविरुद्ध विश्वासघात केला असेल, तर तो पाप करतो

  15. अशा कोणत्याही प्रकारे जर ते पाप करतील आणि त्यांच्या पापांची त्यांना जाणीव होईल, तेव्हा त्यांनी ती चोरलेली वस्तू किंवा बळजबरीने जे घेतले असेल ते किंवा जे काही त्यांच्यावर सोपविलेले असेल किंवा हरवलेली संपत्ती सापडल्यास ती परत करावी—

  16. किंवा अशा कोणत्याही गोष्टीबद्दल त्यांनी खोटी शपथ घेतली असेल तर, ज्या दिवशी दोषार्पण आणतील, त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या गुन्ह्याबद्दल वीस टक्के अधिक दंड म्हणून त्या वस्तूच्या मालकाला द्यावा.

  17. आणि दंड म्हणून त्यांनी याजकाकडे, म्हणजेच याहवेहसाठी, कळपातून एक निर्दोष व योग्य किमतीचा एक मेंढा दोषार्पण म्हणून आणावा.

  18. याप्रकारे त्यांच्यासाठी याजक याहवेहसमोर प्रायश्चित करेल आणि ज्या गोष्टींमुळे ते दोषी झाले असतील, त्याबद्दल त्यांना क्षमा केली जाईल.”

  19. तरीपण जेव्हा गिबोनाच्या लोकांनी ऐकले की यहोशुआने यरीहो आणि आय या शहरांचे काय केले,

  20. तेव्हा त्यांनी एका युक्तीचे अवलंबन केले: ते यहोशुआकडे प्रतिनिधी म्हणून गेले, गाढवांवर जुनी गोणपाटे आणि झिजलेले, फाटलेले, ठिगळे लावलेले द्राक्षारसाचे बुधले लादले.

  21. त्यांनी अंगात जीर्ण झालेले कपडे व पायात झिजलेले व ठिगळांचे जोडे घातले आणि त्यांच्या शिदोर्‍यांत शिळ्या वाळलेल्या व बुरशी लागलेल्या भाकरी होत्या.

  22. ते गिलगाल येथील छावणीत यहोशुआकडे आले. ते यहोशुआला आणि इस्राएली लोकांना म्हणाले, “आम्ही दूरच्या देशातून आलो आहोत; तुम्ही आमच्याबरोबर शांतीचा करार करा.”

  23. तेव्हा इस्राएली लोकांनी या हिव्वी लोकांस उत्तर दिले, “परंतु कदाचित तुम्ही आमच्या जवळपास राहत असाल, तेव्हा आम्ही तुमच्याशी शांतीचा करार कसा करू शकतो?”

  24. ते यहोशुआला म्हणाले, “आम्ही तुमचे दास आहोत.” परंतु यहोशुआने विचारले, “परंतु तुम्ही आहात तरी कोण आणि कुठून आला आहात?”

  25. त्यांनी उत्तर दिले, “तुमचे दास एका अतिशय दूर देशाहून आले आहेत, कारण आम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराची किर्ती आणि इजिप्तमध्ये त्यांनी तुमच्यासाठी जे सर्व केले त्याबद्दल ऐकले आहे.