- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Cities बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
शिनार प्रांतातील बाबिलोन, एरक, अक्काद व कालनेह ही त्याच्या राज्यातील प्रमुख शहरे होती.
शिनारपासून त्याने आपल्या राज्याचा विस्तार अश्शूरपर्यंत केला. त्याने निनवेह, रेहोबोथ ईर व कालह
व रेसन शहर, जे निनवेह व कालह यांच्या दरम्यान होते, ते वसविले. रेसन हे त्याच्या राज्यातील एक प्रमुख शहर होते.
म्हणजे त्यांना राहण्यासाठी नगरे व त्यांच्या मालकीची असणारी त्यांची गुरे मेंढरे व सर्व इतर जनावरांसाठी कुरणे असावीत.
“नगराभोवतालची जी कुरणे तुम्ही लेवी लोकांना देणार ती नगराच्या कुसापासून एक हजार हात असावी.
नगराबाहेर पूर्वेच्या दिशेने दोन हजार हात, दक्षिणेच्या दिशेने दोन हजार हात, पश्चिमेकडे दोन हजार हात व दोन हजार हात उत्तरेकडे मोजावे आणि नगर मध्यभागी असावे. हाच भाग त्यांच्या नगरांसाठी कुरण म्हणून असावा.”
तेव्हा यहोशुआ आणि सर्व सैन्य आय नगरावर हल्ला करण्यासाठी बाहेर पडले. त्याने सर्वोत्कृष्ट तीस हजार योद्धे निवडले आणि त्यांना रात्री पाठवून दिले,
त्यांना आज्ञा दिली: “लक्षपूर्वक ऐका. शहराच्या मागील बाजूस तुम्ही दबा धरून बसावे. त्या ठिकाणापासून फार दूर जाऊ नका. तुम्ही सर्वजण सावध असा.
मी आणि माझ्याबरोबर असलेले सर्वजण या नगरावर हल्ला करतील आणि जेव्हा त्यांनी आधी केल्याप्रमाणे ती माणसे बाहेर आमच्यावर चालून येतील तेव्हा आम्ही त्यांच्यापासून पळून जाऊ.
जोपर्यंत आम्ही त्यांना फसवून शहरापासून दूर घेऊन जाऊ, ते आमचा पाठलाग करतील. कारण ते म्हणतील, ‘आधी केले तसेच ते आमच्यापासून पळून जात आहेत.’ जेव्हा आम्ही त्यांच्यापासून पळून जाऊ,
तेव्हा तुम्ही दबा धरून बसलेले ठिकाण सोडून आय शहराचा ताबा घ्यावा. याहवेह तुमचे परमेश्वर ते शहर तुमच्या हाती देतील.
रेहोबोअम यरुशलेममध्ये राहिला आणि यहूदीयामध्ये त्याने संरक्षणासाठी या नगरांची बांधणी केली:
बेथलेहेम, एटाम, तकोवा,
बेथ-सूर, सोकोह, अदुल्लाम,
गथ, मारेशाह, जीफ,
अदोराईम, लाखीश, अजेकाह,
सोराह, अय्यालोन आणि हेब्रोन. ही तटबंदीची शहरे यहूदीया आणि बिन्यामीनमध्ये होती.
त्याने त्या नगरांची संरक्षणव्यवस्था मजबूत केली आणि त्यांच्यामध्ये सेनापती ठेवले आणि त्यांना अन्न, जैतुनाचे तेल आणि द्राक्षारसाचा पुरवठा केला.
त्याने तेथील प्रत्येक नगरात ढाली आणि भाले ठेवले आणि त्यांना फारच सामर्थ्यवान केले. म्हणून यहूदीया आणि बिन्यामीन त्याच्याकडेच राहिले.
त्याच्या शेजारी लेवी बानीचा पुत्र रहूमच्या देखरेखीखाली डागडुजी करीत होता. त्याच्या शेजारी कईलाह जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी हशब्याह होता. त्याने आपल्या जिल्ह्यांच्या वतीने डागडुजी केली.
त्याच्या शेजारी हेनादादचा पुत्र बिनुई च्या देखरेखीखाली लेव्याच्या वंशजांनी डागडुजी केली. हा बवई कईलाह जिल्ह्याच्या दुसर्या अर्ध्या भागाचा अधिकारी होता.
आम्ही इथे का बसलो आहोत? एकत्र होऊ या! आपण तटबंदीच्या शहरात पलायन करू आणि तिथेच मरू! कारण आमच्या याहवेह परमेश्वराने आमचा नाश होण्यासाठी आम्हाला टाकून दिले आहे आणि त्यांनी आम्हाला विषारी पाणी पिण्यासाठी दिले आहे, कारण आम्ही त्यांच्याविरुद्ध पाप केले आहे.
आम्ही शांतीची आशा करीत होतो, परंतु चांगले काही लाभलेच नाही, आरोग्य मिळण्याच्या वेळेची आशा करीत होतो, केवळ भयंकर दहशत मिळाली.
दान इथून शत्रूच्या घोड्यांचा फुरफुरण्याचा आवाज येतो; घोड्यांच्या मोठ्या किंकाळण्यांनी सर्व भूमीवर थरकाप उडाला आहे. ते भूमी आणि त्यात जे काही आहे, हे नगर आणि जे सर्व इथे राहतात, ते सर्वनाश करण्यासाठी आले आहेत.