मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लूक १६:२५सुमारे इ.स. ३३

    “परंतु अब्राहामाने उत्तर दिले, ‘मुला, तुझ्या आयुष्यात तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या, पण लाजराला वाईट गोष्टी मिळाल्या, म्हणून तो आता सांत्वन पावत आहे आणि तू क्लेश भोगीत आहेस.

  2. लूक १६:२६सुमारे इ.स. ३३

    आणि याव्यतिरिक्त, आमच्या आणि तुमच्यामध्ये एक मोठी दरी स्थापलेली आहे, जे येथून तुझ्याकडे जाण्याची इच्छा करतात ते जाऊ शकत नाहीत किंवा तिथून आम्हापर्यंत ती दरी ओलांडून कोणीही येऊ शकत नाही.’

  3. लूक १६:२७सुमारे इ.स. ३३

    “तो म्हणाला, ‘मग हे पित्या, मी तुम्हाला विनवितो की, लाजाराला माझ्या कुटुंबाकडे पाठवा.

  4. लूक १६:२८सुमारे इ.स. ३३

    कारण मला पाच भाऊ आहेत. ते सुद्धा या यातना स्थळी येऊ नयेत, म्हणून त्याने त्यांना सावध करावे.’

  5. लूक १६:२९सुमारे इ.स. ३३

    “पण अब्राहामाने उत्तर दिले, ‘त्यांच्याजवळ मोशे आणि संदेष्टे आहेत त्यांचे त्यांनी ऐकावे.’

  6. लूक १६:३०सुमारे इ.स. ३३

    “ ‘हे पित्या अब्राहामा, असे नाही. परंतु मृतातून त्यांच्याकडे कोणी गेले तर, ते पश्चात्ताप करतील.’

  7. लूक १६:३१सुमारे इ.स. ३३

    “अब्राहाम त्याला म्हणाला, ‘ते मोशे किंवा संदेष्ट्यांचे ऐकत नाहीत, तर मृतातून जिवंत होऊन कोणी गेला, तरी ते निश्चितच ऐकणार नाहीत.’ ”

  8. लूक १७:१सुमारे इ.स. ३३

    येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “लोकांना अडखळण होतील अशा गोष्टी निश्चितच येतीलच, परंतु ज्याच्याद्वारे अडखळण येईल, त्याचा धिक्कार असो.

  9. लूक १७:२सुमारे इ.स. ३३

    जो कोणी या लहानातील एकालाही अडखळण करतो, त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात फेकून द्यावे हे त्याच्या अधिक हिताचे ठरेल.

  10. लूक १७:३सुमारे इ.स. ३३

    म्हणूनच तुम्ही स्वतःला सांभाळा. “तुझ्या भावाने किंवा बहिणीने पाप केले, तर त्यांचा निषेध कर आणि त्यांनी पश्चात्ताप केला, तर त्यांना क्षमा कर.

  11. लूक १७:४सुमारे इ.स. ३३

    त्याने दिवसातून सात वेळा तुझ्याविरुद्ध पाप केले आणि सात वेळा परत क्षमेची याचना करून म्हटले ‘मी पश्चात्ताप केला आहे,’ तर तू त्याला क्षमा कर.”

  12. लूक १७:५सुमारे इ.स. ३३

    एके दिवशी शिष्य प्रभूला म्हणाले, “आमचा विश्वास वाढवा.”

  13. लूक १७:६सुमारे इ.स. ३३

    प्रभू येशूंनी उत्तर दिले, “तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा जरी विश्वास असला, तरी या तुतीच्या झाडाला म्हणाल की ‘तू उपटून समुद्रात लावला जा,’ तरी ते तुमची आज्ञा पाळील.

  14. लूक १७:७सुमारे इ.स. ३३

    “समजा, तुमच्यापैकी एकाजवळ शेत नांगरण्यासाठी किंवा मेंढरे राखण्यासाठी एक नोकर आहे. आपला नोकर शेतावरून आल्यानंतर, ‘ये, भोजनास बस,’ असे त्याचा धनी त्याला म्हणेल काय?

  15. लूक १७:८सुमारे इ.स. ३३

    याउलट तो असे म्हणणार नाही का, ‘माझे भोजन तयार कर, स्वतः तयार हो आणि मी खात आणि पीत असताना माझी सेवा कर, त्यानंतर तू खा आणि पी’?

  16. लूक १७:९सुमारे इ.स. ३३

    सांगितलेले काम केल्याबद्दल तो आपल्या दासाचे आभार मानेल काय?

  17. लूक १७:१०सुमारे इ.स. ३३

    अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला सांगितलेले सर्व काम केल्यानंतर, ‘आम्ही अपात्र दास आहोत, आम्ही फक्त आमचे कर्तव्य बजावले आहे, असे म्हणा.’ ”

  18. लूक १७:११सुमारे इ.स. ३३

    यरुशलेमकडे वाटचाल करत येशू प्रवास करीत गालील प्रांत आणि शोमरोनच्या हद्दीवर आले.

  19. लूक १७:१२सुमारे इ.स. ३३

    ते गावात जात असताना, काही अंतरावर उभे असलेले दहा कुष्ठरोगी त्यांना भेटले.

  20. लूक १७:१३सुमारे इ.स. ३३

    हे कुष्ठरोगी येशूंना मोठ्याने हाक मारून म्हणत होते, “येशू महाराज, आमच्यावर दया करा!”

  21. लूक १७:१४सुमारे इ.स. ३३

    त्यांना पाहून येशू म्हणाले, “तुम्ही याजकाकडे जा आणि त्याला दाखवा.” आणि ते वाटेत जात असतानाच त्यांचा कुष्ठरोग नाहीसा झाला.

  22. लूक १७:१५सुमारे इ.स. ३३

    त्यांच्यापैकी एकाने आपण शुद्ध झालो आहोत असे पाहिले, तेव्हा तो उच्चस्वराने परमेश्वराची स्तुती करीत परत आला.

  23. लूक १७:१६सुमारे इ.स. ३३

    तो येशूंच्या पायाजवळ पालथा पडला आणि त्याने त्यांचे आभार मानले—तो एक शोमरोनी होता.

  24. लूक १७:१७सुमारे इ.स. ३३

    येशूंनी विचारले, “मी दहा लोकांना शुद्ध केले ना? मग बाकीचे नऊ कुठे आहेत?

  25. लूक १७:१८सुमारे इ.स. ३३

    परमेश्वराचे गौरव करण्यासाठी हा एकटाच आणि तोही परकीय मनुष्य आला काय?”