मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लूक १७:१९सुमारे इ.स. ३३

    मग येशू त्याला म्हणाले, “ऊठ आणि जा; तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”

  2. लूक १७:२०सुमारे इ.स. ३३

    काही परूश्यांनी विचारले, “परमेश्वराचे राज्य केव्हा येईल?” तेव्हा येशूंनी उत्तर दिले, “दृश्य रूपाने नजरेस पडेल अशा रीतीने परमेश्वराचे राज्य येत नाही,

  3. लूक १७:२१सुमारे इ.स. ३३

    परमेश्वराचे राज्य, ‘ते येथे’ किंवा ‘ते तिथे’ आहे, असे लोक म्हणणार नाहीत, कारण परमेश्वराचे राज्य तुम्हामध्ये आहे.”

  4. लूक १७:२२सुमारे इ.स. ३३

    ते शिष्यांना म्हणाले, “अशी वेळ येत आहे की, मानवपुत्राच्या राज्याचा एक दिवस पाहावा अशी तुम्हाला उत्कंठा लागेल, परंतु तुम्हाला ते दिसणार नाही.

  5. लूक १७:२३सुमारे इ.स. ३३

    लोक तुम्हाला सांगतील, ‘तो येथे आहे’ किंवा ‘तो तिथे आहे’ त्यांच्यामागे धावत इकडे तिकडे जाऊ नका.

  6. लूक १७:२४सुमारे इ.स. ३३

    कारण वीज चमकली म्हणजे आकाशाच्या एका सीमेपासून दुसर्‍या सीमेपर्यंत प्रकाशते, तशाच प्रकारे मानवपुत्राच्या दिवसात होईल.

  7. लूक १७:२५सुमारे इ.स. ३३

    परंतु प्रथम त्याने अनेक दुःखे सोसणे आणि या पिढीकडून नाकारले जाणे आवश्यक आहे.

  8. लूक १७:२६सुमारे इ.स. ३३

    “जसे नोआहच्या दिवसात घडत होते, तसेच मानवपुत्र येण्याच्या दिवसात होईल.

  9. लूक १७:२७सुमारे इ.स. ३३

    नोआह प्रत्यक्ष तारवात गेला, त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. नंतर जलप्रलय आला व त्या सर्वांचा नाश झाला.

  10. लूक १७:२८सुमारे इ.स. ३३

    “त्याचप्रमाणे लोटाच्या दिवसातही असेच झाले. लोक खातपीत होते, विकत घेत होते, विकत देत होते, पेरणी करीत होते, घरे बांधत होते.

  11. लूक १७:२९सुमारे इ.स. ३३

    ज्या दिवशी लोटाने सदोम शहर सोडले, त्याच दिवशी अग्नी आणि गंधकाचा स्वर्गातून वर्षाव झाला आणि त्या सर्वांचा नाश झाला.

  12. लूक १७:३०सुमारे इ.स. ३३

    “मानवपुत्र प्रकट होईल त्या दिवशीही हे अशाच प्रकारे असेल.

  13. लूक १७:३१सुमारे इ.स. ३३

    त्या दिवशी जो कोणी घराच्या छपरावर असेल, त्याने सामान घेण्यासाठी घरात जाऊ नये. त्याचप्रमाणे शेतात काम करणार्‍याने कशासाठीही परत जाऊ नये.

  14. लूक १७:३२सुमारे इ.स. ३३

    लोटाच्या पत्नीची आठवण ठेवा!

  15. लूक १७:३३सुमारे इ.स. ३३

    जो कोणी आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करेल तो आपल्या जीवाला मुकेल, पण जो कोणी आपल्या जीवाला गमावेल, तो त्याचा जीव वाचवेल.

  16. लूक १७:३४सुमारे इ.स. ३३

    मी तुम्हाला सांगतो की, त्या रात्री दोघेजण एका अंथरुणात झोपलेले असतील; एक घेतला जाईल व दुसरा ठेवला जाईल.

  17. लूक १७:३५सुमारे इ.स. ३३

    जात्यावर एकत्र धान्य दळीत बसलेल्या दोन स्त्रियांपैकी एकीला घेतले जाईल व दुसरीला ठेवले जाईल.

  18. लूक १७:३६सुमारे इ.स. ३३

    दोघेजण शेतात असतील; एकाला घेतले जाईल व दुसर्‍याला ठेवले जाईल.”

  19. लूक १७:३७सुमारे इ.स. ३३

    यावर शिष्यांनी त्यांना विचारले, “गुरुजी, त्यांना कुठे नेण्यात येईल?” येशूंनी उत्तर दिले, “जिथे मृतदेह आहे, तिथे गिधाडे जमतील.”

  20. लूक १८:१सुमारे इ.स. ३३

    नंतर येशूंनी आपल्या शिष्यांना सतत प्रार्थना करावी व ती ही चिकाटीने करावी यासाठी एक दाखला सांगितला.

  21. लूक १८:२सुमारे इ.स. ३३

    येशू म्हणाले, “एका शहरात परमेश्वराचे भय न बाळगणारा आणि कोणाची पर्वा न करणारा एक न्यायाधीश होता.

  22. लूक १८:३सुमारे इ.स. ३३

    त्या शहरातील एक विधवा आपली विनंती घेऊन वारंवार त्या न्यायाधीशाकडे येऊन म्हणत असे, ‘माझ्या शत्रूपासून मला न्याय द्या.’

  23. लूक १८:४सुमारे इ.स. ३३

    “त्याने काही काळ लक्ष दिले नाही, परंतु शेवटी तो स्वतःशीच म्हणाला, ‘मी परमेश्वराला भीत नाही किंवा लोक काय म्हणतील याची काळजी करीत नाही,

  24. लूक १८:५सुमारे इ.स. ३३

    पण ही विधवा मला एकसारखी त्रास देत आहे. म्हणून तिला न्याय मिळाला पाहिजे, कारण ती सारखी येऊन मला त्रास करीत आहे!’ ”

  25. लूक १८:६सुमारे इ.स. ३३

    नंतर प्रभू म्हणाले, “अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका.