मुख्य मजकुरावर जा

Moab

149 verses · 3 known names

हे नावानेही ओळखले जाते: Moabites, Moabitish

31.4900, 35.7800 गूगल नकाशावर पाहा

Moab चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि कैदी, लूट, जनावरे यांना मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनेकडील छावणीत मोशे, एलअज़ार याजक आणि इतर इस्राएलच्या मंडळीसमोर आणले.

  2. त्यांनी ओबोथ सोडले व मोआबच्या सीमेवरील ईये-अबारीम येथे तळ दिला.

  3. मग त्यांनी अबारीम डोंगर सोडून मोआबाच्या मैदानात यार्देन नदीजवळ यरीहो समोर तळ दिला.

  4. तिथे मोआबाच्या मैदानात यार्देनजवळ बेथ-यशिमोथापासून आबेल-शित्तीमपर्यंत तळ दिला.

  5. मोआबाच्या मैदानात यार्देनजवळ यरीहोजवळ याहवेह मोशेला म्हणाले,

  6. यरीहो समोर मोआबाच्या मैदानात यार्देनजवळ याहवेह मोशेला म्हणाले,

  7. मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनकडे मोशेद्वारे याहवेहने इस्राएली लोकांसाठी ज्या आज्ञा व नियम लावून दिले ते हेच आहेत.

  8. यार्देनच्या पूर्वेकडील मोआब प्रदेशात मोशे इस्राएली लोकांशी नियमांसंबंधी बोलला. तो म्हणाला:

  9. म्हणून आम्ही सेईर येथे राहणाऱ्या एसावाच्या वंशातील भाऊबंदांच्या देशाला वळसा घालून दक्षिणेकडे एलाथ व एजिओन-गेबेरकडे जाणारा अराबाचा रस्ता पार करून उत्तरेकडे प्रवास करीत मोआब वाळवंटाकडे निघालो.

  10. तेव्हा याहवेह आम्हाला म्हणाले, “मोआबी लोकांना उपद्रव किंवा लढाईसाठी प्रवृत करू नका, कारण मी त्यांच्या देशाचा कोणताही भाग वतन म्हणून तुम्हाला देणार नाही. मी लोटाच्या वंशजांना आर प्रदेश वतन म्हणून दिला आहे.”

  11. “आज तुम्हाला आर येथे मोआबाची सीमा ओलांडून जायचे आहे.

  12. याहवेहने मोआब देशात इस्राएली लोकांबरोबर जो करार करण्याची मोशेला आज्ञा दिली होती त्याच्या या अटी आहेत, त्यांनी होरेब पर्वतावर जो करार केला होता तो विस्तारित असा आहे.

  13. “तू मोआब देशात यरीहो पलीकडे असलेल्या अबारीम पर्वतातील नबो शिखराकडे जा, त्याच्यावर चढून समोर पसरलेला जो देश मी इस्राएली लोकांना त्यांचे स्वतःचे वतन म्हणून देणार आहे, त्या कनान देशाकडे नजर टाक.

  14. नंतर मोशे मोआबाच्या सपाट मैदानातून यरीहोच्या समोरील नबो पर्वताच्या पिसगा नामक शिखरावर चढून गेला. तिथून सभोवार—गिलआदापासून दानपर्यंतचा—सर्व प्रदेश याहवेहने त्याला दाखविला,

  15. आणि याहवेहने सांगितल्याप्रमाणे, याहवेहचा सेवक मोशे मोआब देशात मरण पावला.

  16. याहवेहने त्याला मोआब देशातील बेथ-पौरजवळील खोर्‍यात पुरले, पण आजपर्यंत त्याला पुरले ते ठिकाण नक्की कुठे आहे हे कोणालाही ठाऊक नाही.

  17. इस्राएली लोकांनी मोआबाच्या मैदानात मोशेसाठी विलाप करण्याचे तीस दिवस पूर्ण होईपर्यंत शोक केला.

  18. यरीहोजवळ यार्देनेच्या पूर्वेस मोआबाच्या मैदानात मोशेने वरील वतने दिली.

  19. जेव्हा सिप्पोरचा पुत्र, मोआबाचा राजा बालाकाने इस्राएलविरुद्ध युद्धाची तयारी केली आणि तुम्हाला शाप देण्यासाठी बौराचा पुत्र बलामाला पाठविले.

  20. एकदा पुन्हा इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले आणि म्हणून याहवेहने मोआबाचा राजा एग्लोनला इस्राएलावर वर्चस्व करण्यास दिले.

  21. इस्राएली लोक अठरा वर्षे मोआबचा राजा एग्लोनचे गुलाम होते.

  22. इस्राएलांनी पुन्हा याहवेहचा धावा केला आणि त्यांनी त्यांना एक सोडविणारा—बिन्यामीन गेराचा पुत्र एहूद दिला, जो डाव्या हाताचा मनुष्य होता. इस्राएली लोकांनी त्याला मोआबाचा राजा एग्लोनकडे नजराणा देऊन पाठविले.

  23. त्याने मोआबच्या राजा एग्लोनाच्या समोर रसद सादर केली, जो खूप गलेलठ्ठ मनुष्य होता.

  24. त्या दिवशी मोआबी लोक इस्राएली लोकांच्या अधीन आले आणि त्यानंतर देशाला ऐंशी वर्षे शांतता लाभली.

  25. इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने पुन्हा वाईट कृत्य केले. ते बआल व अष्टारोथ या दैवतांच्या मूर्तीची आणि अरामाचे दैवत, सीदोनाचे दैवत, मोआबाचे दैवत, अम्मोनाचे दैवत व पलिष्टीच्या दैवतांची उपासना व सेवा करू लागले. इस्राएली लोक याहवेहला विसरले आणि त्यांची सेवा करणे सोडले.