Jesus
हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ
Jesus चा उल्लेख असलेली वचने
“हे पित्या, जगाची उत्पत्ती होण्यापूर्वी तुम्ही मजवर प्रीती करून मला गौरव दिले. आता त्यांना माझे गौरव पाहता यावे म्हणून तुम्ही जे लोक मला दिले, त्यांनी जिथे मी आहे, तिथे माझ्याजवळ असावे अशी माझी इच्छा आहे.
“हे नीतिमान पित्या, जग तुम्हाला ओळखत नाही, परंतु मी तुम्हाला ओळखतो आणि तुम्ही मला पाठविले हे त्यांना समजले आहे.
मी तुमच्या नाव त्यांच्यासमोर प्रकट केले आहे, मी तुम्हाला प्रकट करीतच राहीन, जेणे करून जी तुमची प्रीती मजवर आहे ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.”
त्यांची प्रार्थना आटोपल्यावर, येशू आपल्या शिष्यांसह किद्रोन ओहोळाच्या पलीकडे गेले. दुसर्या बाजूला एक बाग होती, ते व त्यांचे शिष्य तिथे गेले.
आता यहूदा, ज्याने त्यांचा विश्वासघात केला, त्याला ही जागा माहीत होती, कारण येशू आपल्या शिष्यांना बर्याच वेळा तिथे भेटत होते.
येशू, जे सर्व आपल्यासोबत घडणार होते ते पूर्णपणे जाणून होते, त्यांनी बाहेर जाऊन त्यांना विचारले, “तुम्हाला कोण हवे आहे?”
त्यावर त्यांनी उत्तर दिले, “नासरेथकर येशू.” तेव्हा येशू म्हणाले, “तो मी आहे,” आणि विश्वासघात करणारा यहूदाही त्यांच्याबरोबर तिथे उभा होता.
जेव्हा येशूने म्हटले, “मी तो आहे,” तेव्हा ते मागे सरकून भूमीवर पडले.
त्यांना पुन्हा विचारले, “तुम्हाला कोण हवे आहे?” त्यांनी म्हटले, “नासरेथकर येशू.”
येशू म्हणाले, “तो मी आहे असे मी तुम्हाला सांगितले आहेच, आणि जर तुम्ही मला शोधत आहात, तर या माणसांना जाऊ द्यावे.
जे तुम्ही मला दिले आहेत त्यातून मी एकही हरविला नाही,” हे शब्द त्यांनी सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.
येशूंनी पेत्रास आज्ञा केली, “तुझी तलवार म्यानात घाल! पित्याने मला दिलेल्या प्याल्यातून मी पिऊ नये काय?”
मग यहूदी अधिकार्यांनी, सैनिकांनी व त्यांच्या सेनापतींनी येशूंना अटक केली. त्यांना बंदी बनविले.
प्रथम त्यांनी येशूंना त्या वर्षाचा महायाजक कयफाचा सासरा हन्नाकडे नेले.
शिमोन पेत्र आणि आणखी एक शिष्य येशूंच्या मागे आले. कारण हा शिष्य महायाजकाच्या ओळखीचा असल्यामुळे, त्याने येशूंबरोबर महायाजकाच्या अंगणात प्रवेश केला.
मग त्या दासीने पेत्राला विचारले, “तू खात्रीने या माणसाच्या शिष्यांपैकी एक नाहीस ना?” त्याने उत्तर दिले, “मी नाही.”
दरम्यान, महायाजकाने येशूंना त्यांच्या शिष्यांविषयी आणि त्यांचे शिक्षण त्याविषयी प्रश्न विचारले.
येशूने त्याला उत्तर दिले, “मी जगापुढे उघडपणे बोलतो, कारण मी सभागृहांमध्ये व मंदिरात जिथे सर्व यहूदी एकत्रित येतात तिथे नियमितपणे शिक्षण दिले आहे. मी गुप्तपणे काहीही बोललो नाही.
मला का विचारता? ज्यांनी माझे ऐकले त्यांना विचारा. मी काय बोललो ते त्यांना माहीतच असेल.”
येशूने असे म्हटल्यावर, जवळ असणार्या अधिकार्यांपैकी एकाने येशूंच्या तोंडावर चापट मारली व “अशा रीतीने तू महायाजकाला उत्तर देतो काय?” त्याने दरडावून मागणी केली.
येशूने उत्तर दिले, “मी जर काही चुकीचे बोललो असेल तर तसे सिद्ध करा. परंतु मी सत्य बोललो असेन, तर तुम्ही मला का मारले?”
मग हन्नाने येशूंना बांधलेल्या अवस्थेतच महायाजक कयफा याजकडे पाठविले.
दरम्यान, इकडे शिमोन पेत्र अजूनही शेकोटीजवळ शेकत उभा असताना त्यांनी त्याला विचारले, “तू खरोखर त्यांच्या शिष्यांपैकीच एक नाहीस का आहेस ना?” पेत्र नाकारून म्हणाला, “मी तो नाही.”
परंतु ज्याचा कान पेत्राने कापून टाकला होता, त्याचा एक नातलग, महायाजकाच्या दासांपैकी एक होता. त्याने पेत्राला विचारले, “मी तुला येशूंबरोबर बागेत पाहिले नाही का?”
मग यहूदी पुढार्यांनी येशूंना कयफाकडून रोमी राज्यपालाच्या राजवाड्यात नेले. तोपर्यंत पहाट झाली होती आणि आपण नियमशास्त्रानुसार अशुद्ध होऊ नये आणि आपल्याला वल्हांडणाचे भोजन करता यावे म्हणून ते स्वतः राजवाड्यात गेले नाहीत.