मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर, प्याला घेतला व म्हणाले, “हा प्याला माझ्या रक्ताने केलेला नवा करार आहे; ज्या ज्यावेळी तुम्ही हा प्याल, त्यावेळी हे माझ्या स्मरणार्थ करा.”

  2. कारण ज्यावेळी तुम्ही ही भाकर खाता आणि हा प्याला पिता, तेव्हा प्रत्येक वेळी त्यांचे पुनरागमन होईपर्यंत प्रभूच्या मृत्यूची घोषणा करता.

  3. आणि म्हणून, जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खातो किंवा प्रभूचा प्याला पितो, तो प्रभूचे शरीर आणि रक्त याविरुद्ध पाप करतो.

  4. जरी आपला न्याय प्रभूने अशा रीतीने केला, तरी तुम्हाला शिस्त लागावी, यासाठी की शेवटी जगाबरोबर आपणही दोषी ठरविले जाऊ नये.

  5. याच कारणासाठी तुम्हाला हे समजावे की परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने बोलणारा कोणीही “येशू शापित असो” असे म्हणणार नाही आणि कोणी मनुष्य पवित्र आत्म्याशिवाय, “येशू प्रभू आहे” असेही म्हणणार नाही.

  6. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, पण प्रभू एकच आहे.

  7. ही सर्व कार्ये एक आणि एकच आत्मा करतो आणि आपल्या निर्धारानुसार प्रत्येकाला वाटून देतो.

  8. जसे शरीर एक असून, अनेक अवयव आहेत, तरी हे सर्व अवयव मिळून एकच शरीर होते, तसेच ख्रिस्ताविषयीही आहे.

  9. आता आपण ख्रिस्ताचे शरीर आहोत आणि आपण प्रत्येकजण त्याचे भाग आहोत,

  10. नियमशास्त्रात आपल्याला सांगितले आहे: “अन्य भाषा बोलणारे परक्यांच्या ओठांद्वारे मी या लोकांशी बोलेल, परंतु तरीही हे लोक माझे ऐकणार नाहीत. असे प्रभू म्हणतात.”

  11. आपल्याला पवित्र आत्म्याकडून संदेश देण्याचे किंवा दुसरे दान मिळाले आहे, असे वाटणार्‍यांनी हे ओळखावे, की मी जे लिहित आहे ती प्रभूची आज्ञा आहे.

  12. प्रथम महत्त्वाचे म्हणजे जे मी स्वीकारले तेच तुम्हाला सांगत आलो आहे आणि ते म्हणजे वचनांनुसार: ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावले.

  13. त्यांना पुरण्यात आले आणि तीन दिवसानंतर त्यांना शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे कबरेतून पुन्हा उठविण्यात आले,

  14. आणि केफाला त्यांचे पहिल्यांदा दर्शन घडले, आणि नंतर बारा शिष्यांना.

  15. त्यानंतर पाचशेपेक्षा अधिक बंधू व भगिनींना एकाच वेळी त्यांचे दर्शन घडले, त्यातील बहुतेक आजही जिवंत असले, तरी काहीजण मरण पावले आहेत.

  16. याकोबाला आणि नंतर सर्व प्रेषितांना त्यांचे दर्शन झाले.

  17. सर्वात शेवटी, एखाद्या अवेळी जन्मलेल्यासारखे मला त्यांचे दर्शन झाले.

  18. परंतु जर ख्रिस्त मरणातून पुन्हा उठविले गेले असा आम्ही प्रचार करतो, तर मग मेलेल्यांचे पुनरुत्थान होणार नाही, असे तुमच्यापैकी काहीजण का म्हणतात?

  19. जर मेलेल्यांचे पुनरुत्थान होत नाही, तर ख्रिस्तही अजून उठविले गेले नाही.

  20. आणि ख्रिस्त अजून उठविले गेले नाही, तर आमचा प्रचार आणि तुमचा विश्वासही व्यर्थ आहे.

  21. यापेक्षा अधिक, म्हणजे आम्ही परमेश्वराविषयी खोटी साक्ष देणारे आढळलो, कारण परमेश्वराने ख्रिस्ताला मृतांतून उठविले अशी साक्ष आम्ही देतो. मृत झालेले पुन्हा उठविले जाणार नाहीत, तर त्यांनी त्याला मृतांतून उठविलेच नाही.

  22. जर मेलेले जिवंत होत नाही, तर मग ख्रिस्तही अजून जिवंत झालेले नाही;

  23. आणि ख्रिस्त मरणातून जिवंत झाले नाही, तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे. तुम्ही अजूनही तुमच्या पापातच आहात.

  24. आणि तर जे ख्रिस्तामध्ये मरण पावले आहेत, त्यांचाही नाश झाला आहे.

  25. जर ख्रिस्तामध्ये आपली आशा फक्त या पृथ्वीवरील जीवनासाठी असेल, तर सर्व मनुष्यांमध्ये आपली स्थिती अधिक दयनीय ठरेल.