मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुमच्यातील एकजण हजारांना पळवून लावतो, कारण याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिलेल्या अभिवचनाप्रमाणे, याहवेह तुमच्यासाठी लढतात,

  2. म्हणून याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती करण्याबाबत फार सावध असा.

  3. तर खचित हे जाणून घ्या की, याहवेह तुमचे परमेश्वर या राष्ट्रांना तुमच्या समोरून आणखी घालवून देणार नाही. परंतु हा चांगला देश, जो याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिला आहे, त्यातून तुमचा नाश होईपर्यंत, ती राष्ट्रे तुमच्यासाठी पाश व सापळा अशी होतील, तुमच्या पाठीवर चाबूक आणि तुमच्या डोळ्यात काटे असतील.

  4. “आता मी लवकरच सर्व जग जाते त्या वाटेने जाणार आहे. तुम्हाला तुमच्या सर्व हृदयाने व जिवाने माहीत आहे की, याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिलेल्या सर्व चांगल्या अभिवचनातील एकही निष्फळ झाले नाही. प्रत्येक अभिवचन पूर्ण झाले आहे; एकही निष्फळ झाले नाही.

  5. तर याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला अभिवचन दिल्याप्रमाणे सर्व चांगल्या गोष्टी दिल्या आहेत, त्याच प्रकारे याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला चेतावणी दिल्याप्रमाणे तुम्हाला दिलेल्या या चांगल्या देशातून तुमचा समूळ नाश होईपर्यंत प्रत्येक वाईट गोष्ट याहवेह तुमच्यावर आणतील.

  6. याहवेह तुमच्या परमेश्वरांनी जो करार तुम्हास आज्ञापिला आहे त्याचे जर तुम्ही उल्लंघन केले, आणि जाऊन इतर दैवतांची सेवा केली आणि त्यांना नमन केले, तर याहवेहचा क्रोध तुमच्याविरुद्ध भडकेल आणि या चांगल्या प्रदेशातून जो त्यांनी तुम्हाला दिला आहे त्यातून तुमचा लवकरच नाश होईल.”

  7. नंतर यहोशुआने इस्राएलांच्या सर्व गोत्रांना शेखेम येथे एकत्र केले. त्याने इस्राएलचे वडीलजन, पुढारी, न्यायाधीश व सर्व अधिकाऱ्यांना बोलाविले आणि त्या सर्वांनी स्वतःस परमेश्वरासमोर सादर केले.

  8. यहोशुआ सर्व लोकांना म्हणाला, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘फार पूर्वी तुमचे पूर्वज, अब्राहाम व नाहोराचा पिता तेरह, फरात नदीच्या पलीकडे राहत होते आणि ते इतर दैवतांची भक्ती करीत होते.

  9. परंतु तुमचा पिता अब्राहामाला मी फरात नदीपलीकडील देशातून आणले व कनान देशात सर्वत्र फिरविले व त्याला अनेक वंशज दिले, मी त्याला इसहाक दिला,

  10. आणि इसहाकाला याकोब आणि एसाव हे दिले. एसावाला मी सेईरचा डोंगराळ प्रदेश वतन करून दिला, परंतु याकोब आणि त्याचे कुटुंब इजिप्त देशास गेले.

  11. “ ‘नंतर मी मोशे आणि अहरोनला पाठविले आणि मी तिथे जे केले त्यामुळे इजिप्तच्या लोकांवर पीडा आल्या आणि मी तुम्हाला बाहेर आणले.

  12. जेव्हा मी तुमच्या लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणले, तेव्हा तुम्ही समुद्राजवळ आला आणि इजिप्तच्या लोकांनी रथ आणि घोडेस्वार घेऊन तांबड्या समुद्रापर्यंत तुमचा पाठलाग केला.

  13. त्यांनी साहाय्यासाठी याहवेहचा (म्हणजे माझा) धावा केला आणि मी तुमच्या व इजिप्तच्या लोकांमध्ये अंधार केला, समुद्र इजिप्तच्या लोकांवर आणला आणि त्यात त्यांना बुडवून टाकले. मी इजिप्तच्या लोकांचे काय केले ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्यानंतर तुम्ही पुष्कळ काळ अरण्यात राहिला.

  14. “ ‘यार्देनेच्या पूर्वेकडे राहणार्‍या अमोर्‍यांच्या देशात मी तुम्हाला आणले. ते तुमच्याविरुद्ध लढले, परंतु मी त्यांना तुमच्या हाती दिले. तुमच्यापुढे त्यांचा नाश केला आणि तुम्ही त्यांच्या देशाचा ताबा घेतला.

  15. परंतु मी बलामाचे ऐकले नाही आणि त्याने तुम्हाला पुन्हा आणि पुन्हा आशीर्वाद दिला आणि मी तुम्हाला त्याच्या हातातून सोडविले.

  16. “ ‘नंतर तुम्ही यार्देन नदी ओलांडून यरीहोकडे आला. यरीहोचे रहिवासी तुमच्याविरुद्ध लढले, तसेच अमोरी, परिज्जी, कनानी, हिथी, गिर्गाशी, हिव्वी आणि यबूसी हे सुद्धा लढले, परंतु मी त्यांना तुमच्या हाती दिले.

  17. मी तुमच्यापुढे गांधीलमाशा पाठविल्या व त्यांनी त्यांना व दोन अमोरी राजांना तुमच्यापुढून घालवून दिले. हे तुमच्या तलवारीने आणि धनुष्य बाणांनी केले नाही.

  18. म्हणून ज्या भूमीवर तुम्ही कष्ट केले नाहीत अशी भूमी आणि जी शहरे तुम्ही बांधली नाहीत ती मी तुम्हाला दिली; आणि तुम्ही त्यात राहता आणि जे तुम्ही लावले नाही त्या द्राक्षमळ्यातून व जैतुनाच्या बागेतून फळे खाता.’

  19. “तर आता याहवेहचे भय धरा आणि संपूर्ण विश्वासूपणाने त्यांची सेवा करा. तुमचे पूर्वज फरात नदीच्या पलीकडे आणि इजिप्तमध्ये राहत असताना ज्या देवतांची उपासना करीत होते, त्या टाकून द्या आणि याहवेहची सेवा करा.

  20. परंतु याहवेहची सेवा करणे तुम्हाला अप्रिय वाटत असेल, तर तुम्ही कोणाची सेवा करणार ते आजच ठरवा, फरात नदीच्या पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या दैवतांची सेवा केली ती की ज्या अमोरी लोकांच्या देशात तुम्ही राहता त्यांच्या दैवतांची? परंतु मी आणि माझे घराणे, आम्ही याहवेहची सेवा करणार.”

  21. तेव्हा लोकांनी उत्तर दिले, “आम्ही आमच्या याहवेहचा त्याग करून इतर दैवतांची सेवा करणे असे आमच्या हातून कधी न घडो!

  22. याहवेह आमच्या परमेश्वरांनी आम्हाला व आमच्या पूर्वजांना इजिप्तमधून, त्या गुलामगिरीच्या देशातून बाहेर काढले आणि आमच्या डोळ्यांपुढे ते महान चमत्कार केले. आमच्या संपूर्ण प्रवासात आणि ज्या प्रदेशातून आम्ही प्रवास केला त्या सर्व प्रवासात आमचे संरक्षण केले.

  23. आणि याहवेहने जे अमोरी लोक त्या देशात राहत होते त्यांच्यासहित सर्व राष्ट्रांना आमच्या समोरून बाहेर घालवून दिले. आम्हीही याहवेहचीच सेवा करणार, कारण ते आमचे परमेश्वर आहेत.”

  24. यहोशुआ लोकांना म्हणाला, “तुमच्याने याहवेहची सेवा करविणार नाही. ते पवित्र परमेश्वर आहे; ते ईर्ष्यावान परमेश्वर आहेत. ते तुमच्या बंडाची आणि तुमच्या पातकांची क्षमा करणार नाही.

  25. जर तुम्ही याहवेहचा त्याग कराल आणि परदेशी दैवताची सेवा कराल, जरी इतका काळ ते तुमच्याबरोबर चांगले राहिले आहेत, तरी ते उलटून तुमच्यावर संकट आणून तुमचा अंत करतील.”