God
God चा उल्लेख असलेली वचने
याहवेह आपल्या लोकांचा न्याय करतील, आणि त्यांच्या सेवकांसाठी त्यांच्या मनाला पाझर फुटेल जेव्हा त्यांच्यातील सर्व शक्ती संपून जाईल, आणि दास किंवा स्वतंत्र असे कोणीही उरणार नाहीत.
मग ते विचारतील: “आता त्यांची दैवते कुठे आहेत, त्यांचे आश्रयाचे खडक कुठे आहेत?
“आता पाहा मीच एकमेव आहे तो आहे! माझ्याशिवाय इतर कोणताही ईश्वर नाही. माझ्या आदेशानेच मृत्यू येतो आणि जीवनही मीच प्रदान करतो. मी जखम केली आणि मी ती बरीही करेन, माझ्या हातून सोडविणारा कोणीही नाही.
मी माझा हात स्वर्गाकडे उंचावतो आणि म्हणतो: शपथ माझ्या जीवनाची,
जेव्हा मी माझी लखलखणारी तलवार पाजळेन आणि न्याय देण्यासाठी ती माझ्या हातात घेईन, मी माझ्या शत्रूचा सूड घेईन, आणि जे माझा तिरस्कार करतात त्यांची परतफेड करेन.
वधलेल्या व कैद केलेल्यांच्या रक्ताने, शत्रूंच्या सरदारांच्या मस्तकाच्या रक्ताने मी माझे बाण मदमस्त करेन, आणि माझी तलवार मांस गिळून टाकेल.”
अहो राष्ट्रांनो, त्यांच्या लोकांबरोबर जयजयकार करा, कारण आपल्या सेवकांच्या रक्तपाताचा ते सूड उगवतील; आणि शत्रूंचा प्रतिशोध घेतील, आणि आपला देश आणि आपले लोक यांच्याकरिता प्रायश्चित करतील.
त्याच दिवशी याहवेह मोशेला म्हणाले,
“तू मोआब देशात यरीहो पलीकडे असलेल्या अबारीम पर्वतातील नबो शिखराकडे जा, त्याच्यावर चढून समोर पसरलेला जो देश मी इस्राएली लोकांना त्यांचे स्वतःचे वतन म्हणून देणार आहे, त्या कनान देशाकडे नजर टाक.
कारण सीनच्या अरण्यात कादेशच्या मरीबाह नावाच्या झर्याजवळ इस्राएली लोकांसमक्ष तू आणि अहरोनाने माझा विश्वासघात करून माझ्या पवित्रतेला आदर दिला नाही.
तर तो देश तू दुरून पाहशील; पण मी जो देश इस्राएली लोकांना देणार आहे, त्यात तू प्रवेश करणार नाहीस.”
परमेश्वराचा मनुष्य मोशेने आपल्या मरणापूर्वी इस्राएली लोकांना आशीर्वाद जाहीर केले.
तो म्हणाला: “याहवेह सीनाय पर्वतावरून आले आणि सेईरावर ते सूर्याप्रमाणे उदय पावले; पारान पर्वतावरून ते प्रकाशले. असंख्य पवित्र जनांचा समुदाय त्यांच्याबरोबर होता. दक्षिण दिशेने, त्यांच्या पर्वत उतरणीवरून ते खाली आले.
निश्चित तुम्हीच आपल्या लोकांवर प्रीती करता; सर्व पवित्रजन तुमच्या अधीन आहेत. ते तुमच्या चरणाशी नमन करतात, आणि तुमच्याकडून ते आज्ञा स्वीकारतात,
इस्राएलच्या गोत्रांबरोबर जेव्हा इस्राएलच्या लोकांचे पुढारी एकत्र जमले, तेव्हा याहवेह यशुरून लोकांचे राज्यकर्ता झाले.
आणि तो यहूदाहबद्दल असे म्हणाला: “हे याहवेह, यहूदाहचा धावा ऐका; आणि त्याला आपल्या लोकांजवळ आणा. स्वतःच्या हाताने ते त्याचे संरक्षण करतात, तुम्हीच त्याच्यासाठी त्याच्या शत्रूविरुद्ध साहाय्य व्हा!”
मग तो लेवी विषयी म्हणाला: “तुमचे उरीम व थुम्मीम, तुमच्या विश्वसनीय लोकांच्या अधिकारात कायम राहोत. ज्यांची तुम्ही मस्सा येथे परीक्षा घेतली; आणि मरीबाहच्या झर्याजवळ तुम्ही त्यांच्याशी झुंज दिली.
आपले आई आणि वडील यांच्याबद्दल त्याने म्हटले, ‘ते माझे कोणीही नाहीत.’ त्याने आपल्या बांधवांना ओळखले नाही, किंवा आपल्या संततीस ओळखले नाही, परंतु त्याने तुमच्या आज्ञांचे पालन केले, आणि तुमच्या कराराशी ते प्रामाणिक राहिले.
ते तुमचे विधी याकोबाला, आणि तुमचे नियमशास्त्र इस्राएली लोकांना शिकवतील. धूपाच्या वेदीवर ते धूप जाळतील, व तुमच्या वेदीवर संपूर्ण होमबली अर्पितील.
हे याहवेह, त्यांचे सर्व कौशल्य आशीर्वादित करा, आणि त्यांची हस्तकृती तुम्हाला प्रसन्न करो. त्यांच्याविरुद्ध जे उठतात त्यांना चिरडून टाका, आणि ते पुन्हा उठणार नाहीत, असे करा.”
मोशे बिन्यामीनाबद्दल म्हणाला: “याहवेहचा लाडका त्यांच्याजवळ सुरक्षित राहो, कारण दिवसभर याहवेह त्याची ढाल होऊन त्याला आपली सुरक्षा प्रदान करतात, आणि जो याहवेहला प्रिय आहे तो त्यांच्या दोन्ही खांद्यामध्ये सुरक्षित आहे.”
तो योसेफाबद्दल म्हणाला: “याहवेह स्वर्गातील मौल्यवान दवाने, आणि पृथ्वीच्या खोलात असलेल्या जलाने त्याच्या भूमीला आशीर्वादित करोत;
जी पृथ्वीच्या विपुलतेची सर्वोत्तम भेट, आणि जळत्या झुडूपातून बोलणार्या त्या प्रभूच्या कृपादृष्टीने तो समृद्ध होवो. योसेफाच्या व त्याच्या वंशजाच्या मस्तकावर हे सर्व आशीर्वाद येवोत, जो आपल्या भाऊबंदांत प्रमुख होता.
त्याने स्वतःसाठी सर्वाेत्तम अशी भूमी निवडली आहे; पुढार्यासाठी राखून ठेवलेली जमीन त्याला मिळाली आहे. वंशपित्यांच्या सभेत त्याने इस्राएलाकरिता याहवेहच्या नीतिपर इच्छेचे आणि याहवेहच्या न्यायाचे पालन केले.”
नफताली विषयी तो म्हणाला: “नफताली याहवेहच्या सर्व आशीर्वादांनी तृप्त आहे आणि त्यांच्या कृपेत परिपूर्ण आहे; तो सागरापर्यंतचा दक्षिण भाग वतन करून घेईल.”