God
God चा उल्लेख असलेली वचने
“तुम्ही नियमशास्त्राचा हा ग्रंथ घ्या आणि याहवेह तुमच्या परमेश्वराच्या कराराच्या कोशाजवळ नेऊन ठेवा. तिथे हा तुमच्याविरुद्ध साक्ष म्हणून राहील.
कारण तुम्ही किती बंडखोर आणि ताठ मानेचे आहात हे मला माहीत आहे. मी तुम्हाबरोबर असताना, तुम्ही जर याहवेहविरुद्ध बंडखोरी करीत आहात, तर माझ्या मृत्यूनंतर तुम्ही किती अधिक बंडखोरी कराल!
कारण मला माहीत आहे की, माझ्या मृत्यूनंतर तुम्ही स्वतःला पूर्णपणे भ्रष्ट कराल आणि मी दिलेल्या आज्ञांपासून बहकून दूर जाल. भविष्यकाळात तुमच्यावर संकटे येतील, कारण याहवेहच्या दृष्टीने वाईट ते कराल व तुमच्या हस्तकृतीने त्यांना अतिशय संतप्त कराल.”
मी याहवेहचे नाव जाहीर करेन. आपल्या परमेश्वराच्या महानतेची स्तुती गा!
तेच आमचे खडक आहेत, त्यांचे कार्य परिपूर्ण आहे. आणि त्यांचे सर्व मार्ग न्याय्य असतात. विश्वासयोग्य परमेश्वर, जे कधीच चूक करीत नाही, ते न्यायी आणि सत्यनिष्ठ आहेत.
ती आता त्यांची लेकरे राहिली नाहीत, कारण ती भ्रष्ट झाली आहेत; त्यांना लाज वाटेल की ते एक विकृत आणि कुटिल पिढी आहेत.
अहो मूर्ख आणि मतिमंद लोकांनो, याहवेहची परतफेड करण्याची ही रीत आहे काय? ते तुमचे जनक, तुमचे पिता नाहीत काय? त्यांनीच तुम्हाला बनविले व घडविले नाही काय?
जेव्हा सर्वोच्चांनी पृथ्वीवरील राष्ट्रांना त्यांचे वतन दिले, तेव्हा त्यांनी सर्व मानवजातीची विभागणी केली, इस्राएलाच्या पुत्रांच्या संख्येनुसार त्यांच्या सीमारेषा आखून दिल्या.
कारण याहवेहची प्रजाच त्यांची संपत्ती होती, याकोब हे त्यांचे वैयक्तिक वतन आहे.
एका मरुभूमीत त्यांना ते भेटले ते घोर व भयाण अरण्य होते. त्यांनी त्याचे जतन व संरक्षण केले; त्यांच्या डोळ्यातील बाहुलीसारखे त्याचे रक्षण केले,
तसे फक्त याहवेहच याकोबाला चालवित होते; इतर कोणतेही परदेशी दैवत त्याच्यासोबत नव्हते.
लवकरच यशुरून स्वस्थ झाला आणि लाथा झाडू लागला; खाऊन पिऊन धष्टपुष्ट व आकर्षक झाला. उन्मत्त होऊन त्याने त्याच्या निर्माणकर्त्या परमेश्वराचा तिरस्कार केला, आणि आपल्या तारणदुर्गाचा त्याग केला.
त्यांनी परदेशी दैवतांच्या नादी लागून याहवेहला ईर्षेस पेटविले आणि घृणित मूर्तींमुळे अतिशय संतप्त केले.
जे परमेश्वर नाहीत अशा खोट्या दैवतांना अर्पणे वाहिली— जी दैवते अनोळखी होती, जी दैवते नवीनच अस्तित्वात आली होती, ज्या दैवतांचे तुमच्या पूर्वजांना कधीच भय वाटले नाही.
ज्या खडकाने तुम्हाला जन्म दिला, त्याचाच तुम्ही त्याग केला; ज्या परमेश्वराने तुम्हाला निर्माण केले, त्यांनाच तुम्ही विसरला.
हे याहवेहने बघितले आणि त्यांनी त्यांना नाकारले कारण त्यांच्या पुत्र व कन्यांच्या द्वारे ते संतप्त झाले.
तेव्हा ते म्हणाले, “मी त्यांच्यापासून माझे मुख लपवेन, आणि मग त्यांचा कसा अंत होतो ते पाहीन; कारण ही विकृत पिढी आहे, जी विश्वासयोग्य संतती नाही.
जे देव नाहीत त्याद्वारे त्यांनी मला ईर्षेस पेटविले आहे आणि त्यांच्या तुच्छ मूर्तींनी मला संताप आणला आहे. जे लोक नाहीत त्यांच्याद्वारे मी त्यांना ईर्षेस आणेन; ज्या राष्ट्राला समज नाही त्याद्वारे मी त्यांना क्रोधास आणेन;
“मी त्यांच्यावर संकटांची रास रचेन, माझ्या बाणांनी त्यांच्यावर प्रहार करेन.
मी पाठविलेल्या दुष्काळाने ते दुर्बल होतील, महामारी व घातक रोग त्यांच्यावर येतील; आपल्या दातांनी त्यांना फाडून खाणारी हिंस्त्र श्वापदे मी त्यांच्यावर पाठवेन, मातीत सरपटणारे विषारी सर्पही त्यांच्यावर पाठवेन.
मी असे म्हटले असते, मी त्यांना दूरच्या देशात पांगविणार आणि त्यांची आठवणसुद्धा मानवी स्मरणातून पुसली जाईल,
पण मला शत्रूच्या फुशारक्यांची धास्ती वाटली, ते कदाचित गैरसमज करतील, आणि म्हणतील, ‘आम्ही आमच्या बाहुबलानेच विजय मिळविला आहे; याहवेहने यातील काहीही केले नाही.’ ”
हे कसे शक्य आहे, केवळ एक मनुष्य हजार लोकांचा, किंवा दोन लोक दहा हजार लोकांचा पाठलाग करू शकतात, जर इस्राएलांच्या खडकाने त्यांना विकून टाकले नसते, जर याहवेहने त्यांना टाकले नसते, तरच असे होऊ शकले असते?
“यांना मी राखून ठेवलेले नाही काय, आणि यांना माझ्या तिजोरीत सुरक्षित ठेवले नाही काय?
सूड घेणे मजकडे आहे; मी परतफेड करेन. ठरल्या वेळेवर त्यांचे पाय घसरतील; त्यांच्या नाशाचा दिवस जवळ आलेला आहे, आणि त्यांचा सर्वनाश वेगाने त्यांच्या दिशेने सरसावत आहे.”