मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि पुन्हा, “मी त्याच्यावर माझा भरवसा ठेवेन.” आणि आणखी ते म्हणाले, “पाहा, मी आणि परमेश्वराने मला दिलेली लेकरेही येथे आहेत.”

  2. या कारणासाठी त्यांना आपल्यासारखे म्हणजे बंधूसारखे होणे व पूर्ण मानव होणे अगत्याचे होते, कारण त्यामुळेच त्यांना परमेश्वरासमोर आपला कृपाळू व विश्वासू याजक होता आले आणि मनुष्याच्या पापांबद्दल प्रायश्चित करता आले.

  3. कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते, परंतु सर्वकाही बांधणारे परमेश्वर आहे.

  4. आणि म्हणून त्या पिढीवर मी फार संतापलो; मी म्हणालो, ‘त्यांची हृदये माझ्यापासून नेहमीच दूर जात आहेत, आणि त्यांना माझे मार्ग कळलेच नाही.

  5. मी रागाने शपथ घेतली की, ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.’ ”

  6. बंधू आणि भगिनींनो, आपले हृदय पापमय आणि अविश्वासू होऊन आपल्यापैकी कोणीही जिवंत परमेश्वराला सोडून जाणार नाही म्हणून जपा.

  7. ज्यांनी विश्वास ठेवला त्यांनाच विसाव्यात जाता येते, जसे परमेश्वराने म्हटले, “मी रागाने शपथ घेतली की, ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.” जरी जगाच्या स्थापनेपासून परमेश्वर त्यांना स्वीकारावयास सिद्ध आहेत व त्यांची वाट पाहत आहेत.

  8. कारण सातव्या दिवसाबद्दल असे कुठेतरी लिहिले आहे, “परमेश्वराने सातव्या दिवशी त्यांच्या सर्व कामापासून विश्रांती घेतली.”

  9. तेव्हा परमेश्वराच्या लोकांसाठी शब्बाथाचा विसावा राहिला आहे.

  10. जो कोणी परमेश्वराच्या विसाव्यात प्रवेश करतो, त्याने जसा परमेश्वराने त्यांच्या कृत्यांपासून विसावा घेतला तसा आपल्या कृत्यांपासून सुद्धा विसावा घेतला आहे.

  11. कारण परमेश्वराचे वचन जिवंत व सक्रिय आहे. ते कोणत्याही दुधारी तलवारीहून अधिक तीक्ष्ण असून जीव आणि आत्मा, सांधे आणि मज्जा यांना खोलवर भेदून जाणारे व अंतःकरणातील विचार आणि वृत्ती यांचा न्याय करणारे आहे.

  12. यास्तव, स्वर्गमंडलातून पार गेलेले परमेश्वराचे पुत्र येशू महान महायाजक आपणास आहेत, म्हणून आम्ही विश्वासाचा पत्कर केलेला आहे तो दृढ धरून ठेऊ या.

  13. प्रत्येक महायाजक परमेश्वर विषयक गोष्टींबाबत लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी व पापांसाठी देणग्या आणि यज्ञे अर्पण करण्यासाठी निवडला जातो.

  14. आणि कोणीही हा सन्मान स्वतःहून घेऊ शकत नाही, ज्यांना परमेश्वराने अहरोनासारखे पाचारण केले आहे त्यांनाच तो प्राप्त होतो.

  15. त्याच प्रकारे ख्रिस्तानेही स्वतःला महायाजक होण्यासाठी गौरविले नाही. परंतु परमेश्वर त्याला म्हणाले, “तू माझा पुत्र आहे; आज मी तुझा पिता झालो आहे.”

  16. आणि परमेश्वराद्वारे मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे महायाजक म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

  17. वास्तविक आतापर्यंत तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होते, पण त्याऐवजी कोणीतरी तुम्हालाच परमेश्वराच्या वचनांची मूलतत्वे परत शिकविण्याची गरज आहे. तुम्हाला दूध हवे, जड अन्न नव्हे!

  18. यास्तव आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन व्यर्थ प्रथांबद्धल पश्चात्ताप आणि परमेश्वरावरील विश्वास यात परिपक्व होऊ या.

  19. आणि परमेश्वर परवानगी देतील, तर आपण तसे करू.

  20. ज्यांनी परमेश्वराच्या उत्तम वचनांची रुची घेतली आणि येणार्‍या जगाच्या महान सामर्थ्याचा अनुभव घेतला,

  21. जर त्यांचे पतन झाले तर त्यांना परत पश्चात्तापाकडे आणणे अशक्य आहे. ते परमेश्वराच्या पुत्राला पुन्हा एकदा क्रूसावर खिळतात आणि त्यांची सार्वजनिक नामुष्की करतात, यात त्यांचे नुकसान आहे.

  22. जी भूमी तिच्यावर वारंवार पडलेल्या पावसाचे सेवन करते आणि ज्यांनी लागवड केली आहे त्यांना ती उपयोगी पीक देते, तिला परमेश्वराचा आशीर्वाद मिळतो.

  23. कारण परमेश्वर अन्यायी नाहीत. तुमची कृत्ये आणि त्यांच्या नावावर जी प्रीती तुम्ही त्यांच्या लोकांची मदत करून आणि अजूनही मदत करून दाखविता ती ते विसरणार नाहीत.

  24. जेव्हा परमेश्वराने अब्राहामाला त्यांचे वचन दिले, तेव्हा त्यांना शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा मोठा कोणी नसल्यामुळे ते स्वतःचीच शपथ वाहून,

  25. म्हणाले, “मी तुला निश्चितच आशीर्वादित करेन आणि तुला अनेक वंशज देईन.”