मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे सेवा करण्यासाठी घालावयाच्या झग्याच्या घेराच्या काठावर घंट्या व डाळिंबे एक सोडून एक असे आळीपाळीने लावले.

  2. कातलेल्या रेशमी तागाचा आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे भरतकाम केलेला कमरबंद होता; जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते.

  3. त्यांनी शुद्ध सोन्याची पवित्र मुद्रेची पाटी बनविली आणि तिच्यावर मुद्रा कोरावी तसे हे कोरले: याहवेहसाठी पवित्र.

  4. ती जोडता यावी म्हणून त्यांनी ती निळ्या फेट्याला दोरीने बांधली, जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते.

  5. याप्रकारे निवासमंडप व सभामंडप यांचे काम समाप्त झाले. इस्राएली लोकांनी जे काही याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याप्रमाणेच केले.

  6. याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणेच इस्राएल लोकांनी सर्व कामे केली होती.

  7. मोशेने कामाचे परीक्षण केले व पाहिले की त्यांनी याहवेहने आज्ञापिल्याप्रमाणेच केले होते. म्हणून मोशेने त्यांना आशीर्वाद दिला.

  8. मग याहवेह मोशेला म्हणाले:

  9. मग अहरोनाला पवित्र वस्त्रे घालावीत. त्याने याजक म्हणून माझी सेवा करावी, यासाठी त्याला अभिषेक करून पवित्र करावे.

  10. जसा त्यांच्या पित्याला अभिषेक केला, तसाच त्यांनाही अभिषेक करावा, म्हणजे याजक म्हणून ते माझी सेवा करतील. त्यांचा हा याजकपणाचा अभिषेक पिढ्यान् पिढ्या चालू राहील.”

  11. जसे याहवेहने आज्ञापिले होते, मोशेने सर्वकाही तसेच केले.

  12. मग मोशेने निवासमंडपावरून तंबू पसरला आणि तंबूवर आच्छादन टाकले, जसे याहवेहने त्याला आज्ञापिले होते.

  13. मग मोशेने कोश निवासमंडपात आणला आणि पडदे अडकविले आणि याहवेहने त्याला आज्ञापिल्याप्रमाणे कराराच्या नियमाचा कोश झाकून घेतला.

  14. व मोशेने त्यावर याहवेहसमोर भाकर ठेवली, जसे याहवेहने त्याला आज्ञापिले होते.

  15. आणि याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे याहवेहसमोर दिवे लावले.

  16. व याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे वेदीवर सुगंधी धूप जाळला.

  17. मग मोशेने निवासमंडपाच्या, सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ होमार्पणाची वेदी ठेवली व त्यावर होमार्पण व अन्नार्पण केले, जसे याहवेहने त्याला आज्ञापिले होते.

  18. जेव्हा ते सभामंडपात प्रवेश करीत किंवा वेदीजवळ जात, तेव्हा ते आपले हात व पाय धूत असत, जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते.

  19. मग मेघाने सभामंडप झाकले आणि याहवेहच्या तेजाने निवासमंडप भरून गेला.

  20. मोशे सभामंडपात प्रवेश करू शकत नव्हता कारण त्यावर मेघ होता आणि याहवेहच्या तेजाने निवासमंडप भरून गेला होता.

  21. त्यांच्या संपूर्ण प्रवासात निवासमंडपावर दिवसा याहवेहचा मेघ, तर रात्री त्या मेघात अग्नी, असे इस्राएलने पाहिले.

  22. याहवेहनी मोशेला बोलाविले आणि सभामंडपातून त्याच्याशी बोलणे केले. ते म्हणाले,

  23. “इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग: ‘जेव्हा तुमच्यामधील कोणी याहवेहसाठी अर्पण आणतील, तेव्हा तुमच्या गुरांमधील किंवा कळपातील प्राण्यांचे अर्पण आणावे.

  24. “ ‘जर हे होमार्पण गुरांमधून करावयाचे असेल, तर निर्दोष असलेला नरगोर्‍हा तुम्ही अर्पण करावा. तुम्ही ते सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ आणावे, म्हणजे ते याहवेहद्वारे मान्य केले जाईल.

  25. तुम्ही याहवेहसमोर त्या गोर्‍ह्याचा वध करावा आणि नंतर अहरोनाचे जे पुत्र याजक आहेत, ते त्याचे रक्त आणतील आणि सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या वेदीभोवती शिंपडतील.