मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा मोशे आपल्या हातात कराराच्या नियमाच्या दोन दगडी पाट्या घेऊन सीनाय पर्वतावरून खाली उतरून आला, तेव्हा याहवेहबरोबर बोलल्यामुळे त्याचा चेहरा तेजस्वी झाला होता, हे त्याच्या लक्षात आले नाही.

  2. यानंतर सर्व इस्राएली लोक त्याच्याजवळ आले आणि मोशेने त्यांना त्या सर्व आज्ञा दिल्या, ज्या याहवेहने सीनाय पर्वतावर त्याला दिल्या होत्या.

  3. पण जेव्हा मोशे याहवेहबरोबर बोलण्यासाठी त्यांच्या समक्षतेत जात असे, बाहेर जाईपर्यंत तो पडदा काढत असे. जेव्हा तो बाहेर येई व त्याला जे काही आज्ञापिले गेले आहे ते तो इस्राएली लोकांना सांगत असे,

  4. इस्राएली लोकांनी पाहिले की मोशेचा चेहरा तेजस्वी होता. मग मोशे याहवेहबरोबर बोलावयास जाईपर्यंत आपल्या चेहर्‍यावर पडदा परत घालत असे.

  5. मग मोशेने इस्राएली लोकांच्या संपूर्ण समुदायाला बोलाविले व त्यांना म्हटले, “ज्यागोष्टी तुम्ही कराव्या अशी याहवेहनी आज्ञा दिली आहे, त्या या आहेत:

  6. सहा दिवस तुम्ही काम करावे, परंतु सातवा दिवस तुमचा पवित्र दिवस असेल, हा याहवेहप्रीत्यर्थ शब्बाथ विसाव्याचा दिवस असावा. जो कोणी या दिवशी काम करेल, त्याला जिवे मारावे.

  7. मोशे सर्व इस्राएल समुदायाला म्हणाला, “याहवेहने जे आज्ञापिले आहे ते हे:

  8. तुमच्याजवळ जे काही आहे, त्यातून याहवेहसाठी अर्पण घ्या. ज्या कोणास याहवेहसाठी अर्पण आणावे अशी इच्छा आहे, त्यांनी हे अर्पण आणावे: “सोने चांदी आणि कास्य,

  9. “तुमच्यामध्ये जे सर्व कुशल कारागीर आहेत, त्यांनी येऊन जे सर्वकाही याहवेहने आज्ञापिले आहे ते तयार करावे:

  10. आणि ज्यांची इच्छा असेल व ज्यांच्या हृदयाला स्फूर्ती मिळाली त्यांनी सभामंडपाच्या कामासाठी व त्याच्या सेवेसाठी आणि पवित्र वस्त्रांची अर्पणे याहवेहसाठी आणली.

  11. ज्या कोणाला इच्छा झाली, त्या स्त्री आणि पुरुषांनी येऊन सर्वप्रकारचे सोन्याचे दागिने, रत्नखचित पीना, कानातील डूल, अंगठ्या आणि दागिने आणले. त्या सर्वांनी आपले सोने याहवेहसाठी ओवाळणीचे अर्पण म्हणून दिले.

  12. चांदी किंवा कास्याची अर्पणे आणणार्‍यांनी ती याहवेहसाठी आणली आणि ज्या कोणाकडे बाभळीचे लाकूड होते, ते त्यांनी बांधकामाच्या कोणत्याही भागात उपयोगी पडेल असे म्हणून आणले.

  13. याहवेहने मोशेद्वारे जे काम आज्ञापिले होते त्यासाठी इस्राएली लोकांमधील सर्व इच्छुक पुरुष व स्त्रियांनी याहवेहकरिता स्वखुशीने अर्पणे आणली.

  14. मग मोशे इस्राएली लोकांना म्हणाला, “पाहा, याहवेहने यहूदाहच्या गोत्रातील, हूराचा पुत्र, उरी याचा पुत्र बसालेल याला निवडले आहे,

  15. आणि याहवेहने त्याला परमेश्वराचा आत्मा, ज्ञान, समज, बुद्धी आणि सर्वप्रकारच्या कुशलतेने भरले आहे—

  16. आणि याहवेहने त्याला व दान गोत्रातील अहीसामाक याचा पुत्र ओहोलियाब या दोघांना इतरांनाही शिकविण्याची क्षमता दिली आहे.

  17. याहवेहने त्यांना सर्वप्रकारचे कोरीव काम, कारागिरीचे काम, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सुती व रेशमी तागावर भरतकाम, विणकाम; अशा सर्वप्रकारच्या विणकरांना कारागिरीचे—कौशल्याचे—काम करण्याच्या दानांनी भरले आहे.

  18. मग बसालेल, ओहोलियाब आणि सर्व निपुण व्यक्ती, ज्यांना याहवेहने कुशलता व पवित्रस्थानाचे बांधकाम करण्याचे कौशल्य आणि क्षमता दिली आहे, त्यांनी याहवेहने आज्ञापिल्याप्रमाणेच काम करावे.”

  19. मग बसालेल व ओहोलियाब व ज्यांना याहवेहने क्षमता दिली होती आणि ज्यांना येऊन काम करण्याची इच्छा होती त्यांना मोशेने बोलाविले.

  20. व मोशेला म्हणाले, “याहवेहने आज्ञापिलेल्या कामासाठी आवश्यक आहे त्यापेक्षा अधिक सामुग्री लोक आणत आहेत.”

  21. याहवेहने मोशेला जे सर्व आज्ञापिले होते ते यहूदाह वंशातील हूराचा पुत्र उरी याचा पुत्र बसालेल याने तयार केले;

  22. पवित्रस्थानातील सेवेसाठी त्यांनी निळे, जांभळे व किरमिजी रंगाच्या सुताची विणलेली वस्त्रे बनविली. याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे अहरोनासाठी सुद्धा त्यांनी पवित्र वस्त्रे बनविली.

  23. कुशलतेने विणलेला कमरबंद त्याच्यासारखाच होता; एफोदाशी अखंड असा तो सोन्याचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या रेशमी तागाचा, याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे तो बनविला होता.

  24. मग त्यांनी इस्राएलच्या पुत्रांचे स्मारक म्हणून ती रत्ने एफोदाच्या दोन खांदेपट्ट्यांवर लावली, याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे त्यांनी हे केले.

  25. त्यांनी त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळ्या दोरीने कमरबंदाला अशा बांधाव्या की ऊरपट एफोदावरून सरकणार नाही; हे त्यांनी याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे केले.