मुख्य मजकुरावर जा

Esther

46 वचने · 1 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Hadassah

Esther चा उल्लेख असलेली वचने

  1. एस्तेर उत्तरली, “माझी याचना आणि माझी मागणी ही आहे:

  2. मग हामान पुढे म्हणाला, “आणि एवढेच नव्हे, एस्तेर राणीने आज राजाबरोबर केवळ मलाच तिने तयार केलेल्या मेजवानीला बोलाविले होते आणि उद्याही पुन्हा आम्हाला तिच्या मेजवानीचे आमंत्रण आहे!”

  3. ते त्याच्याबरोबर ही चर्चा करीत असतानाच, राजाचे खोजा आले व एस्तेरने तयार केलेल्या मेजवानीस हामानाला घाईघाईने घेऊन गेले.

  4. मग राजा व हामान एस्तेर राणीच्या मेजवानीला गेले.

  5. दुसऱ्या दिवशी ते मद्य पीत असताना, राजाने परत एस्तेरला विचारले, “एस्तेर राणी, तुझी विनंती काय आहे? ती तुला देण्यात येईल. तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्याची असली तरी, पूर्ण करण्यात येईल.”

  6. तेव्हा एस्तेर राणीने उत्तर दिले, “महाराज, जर मी तुमची कृपा संपादन केली असेन, आणि महाराजांच्या मर्जीला येत असेन, तर माझे प्राण वाचवा—हीच माझी विनंती आहे, आणि माझ्या लोकांचे—ही माझी मागणी आहे.

  7. तेव्हा अहश्वेरोश राजाने एस्तेर राणीला विचारले, “तो कोण आहे? कुठे आहे तो—जो असे काही करण्याचे धाडस करेल?”

  8. त्यावर उत्तर देत एस्तेर म्हणाली, “हा वैरी व शत्रू! हा दुष्ट हामान!” तेव्हा राजा आणि राणी यांच्यापुढे हामान अत्यंत भयभीत झाला.

  9. हे ऐकताच राजा तीव्र संतापाने एकदम उठला आणि त्याचे मद्य सोडून बाहेर राजवाड्याच्या बागेत गेला. इकडे हामान, राजाने आता आपले भवितव्य ठरविले आहे, हे ओळखून आपले प्राण वाचवावे म्हणून एस्तेर राणीजवळ विनवणी करण्यासाठी तिथेच थांबला.

  10. एस्तेर राणी ज्या आसनावर रेलून बसली होती, त्या आसनावर हामान वाकलेला होता आणि नेमक्या त्याच क्षणी राजवाड्याच्या बागेत गेलेला राजा परतला. तेव्हा संतापाने राजा ओरडला, “अरे, ती माझ्यासह इथे घरात असताना देखील हा राणीवर बलात्कार करू पाहतो काय?” राजाच्या मुखातून हे शब्द बाहेर पडताक्षणी राजसेवकांनी हामानाचा चेहरा झाकून टाकला.

  11. त्याच दिवशी अहश्वेरोश राजाने यहूद्यांचा शत्रू हामानची मालमत्ता एस्तेर राणीला दिली. नंतर मर्दखयाला राजापुढे आणण्यात आले, कारण एस्तेरने मर्दखया कसा आपला नातेवाईक आहे राजाला सांगितले होते.

  12. तेव्हा राजाने हामानापासून परत घेतलेली आपली मुद्रा मर्दखयाला दिली. व एस्तेरने त्याला हामानाच्या मालमत्तेचा कारभारी नेमले.

  13. आता पुन्हा एकदा एस्तेर राजाच्या पायांवर पडून व अश्रू ढाळून तिने राजाजवळ विनवणी केली. यहूद्यांच्या विरुद्ध अगागी हामानाने केलेली दुष्ट योजना स्थगित करावी, अशी तिची मागणी होती.

  14. राजाने पुन्हा आपली सोनेरी राजदंड एस्तेरपुढे धरला, तेव्हा ती उठली आणि त्याच्यासमोर उभी राहिली.

  15. मग अहश्वेरोश राजा एस्तेर राणीला आणि यहूदी मर्दखयाला म्हणाला, “कारण हामानाने यहूद्यांवर हल्ला केला, म्हणून मी हामानाची संपत्ती एस्तेरला दिली आहे आणि त्याला त्यानेच उभ्या केलेल्या फासावर लटकावले.

  16. तेव्हा त्याने एस्तेर राणीला बोलाविले व तो म्हणाला, “शूशन राजधानीतच यहूद्यांनी पाचशे लोक ठार केले आहेत आणि हामानाच्या दहा पुत्रांचाही संहार केला आहे. तर राज्याच्या इतर प्रांतात त्यांनी काय केले असेल? आता तुझी काय मागणी आहे? ते तुला दिले जाईल. तुझी काय विनंती आहे? ते देखील करण्यात येईल.”

  17. तेव्हा एस्तेर म्हणाली, “महाराजांच्या मर्जीस येत असेल तर, येथे शूशन शहरातील यहूद्यांना उद्याही राजाज्ञेप्रमाणे करण्याची परवानगी द्यावी आणि हामानाच्या दहा पुत्रांची प्रेते खांबावर टांगण्यात यावी.”

  18. या कटाचे प्रकरण राजापुढे आले, तेव्हा राजाने फर्मान काढले की यहूदी लोकांविरुद्ध रचलेला हामानाचा कट त्याच्याच डोक्यावर उलटविण्यात यावा आणि मग हामान व त्याचे पुत्र यांना फासावर लटकविण्यात यावे.

  19. दरम्यानच्या काळात, अबीहाईलची कन्या एस्तेर राणीने व यहूदी मर्दखयासह आपल्या पूर्ण अधिकाराने पुरीमची सूचना देण्यासाठी दुसरे पत्र लिहिले.

  20. एस्तेर राणी व यहूदी मर्दखयाने यांनी पुरस्कृत केलेल्या पुरीम सणाचे हे दोन दिवस वार्षिक सण म्हणून साजरे करण्याचे फर्मान काढले, ज्याप्रकारे राष्ट्रीय उपासाचा आणि प्रार्थनेचा सण पाळल्या जातो, त्याच प्रकारे पुरीमचा सणही पाळण्यात यावा.

  21. अशा रीतीने एस्तेरच्या आज्ञेने या दोन दिवसांच्या तारखा निश्चित करण्यात झाल्या आणि ग्रंथात त्यांची नोंद झाली.