मुख्य मजकुरावर जा

Ephraim

160 वचने · 9 कुटुंब सदस्य

Ephraim चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. एफ्राईम बढाई मारतो, “मी फार धनवान आहे; मी श्रीमंत झालो आहे. माझ्या सर्व संपत्तीसह त्यांना माझ्यामध्ये कोणताही अपराध किंवा पाप आढळणार नाही.”

  2. पण एफ्राईमने त्यांचा कोप भयंकर चेतविला आहे; त्याचे प्रभू त्याच्या रक्ताचा दोष त्याच्यावरच राहू देतील आणि त्याला त्याच्या अपमानाची भरपाई देतील.

  3. जेव्हा एफ्राईम बोलत असे, तेव्हा लोक थरथर कापत असत; कारण तो इस्राएलाचा अधिपती होता. पण तो बआल मूर्तीच्या उपासनेचा दोषी झाला आणि मरण पावला.

  4. एफ्राईमची पातके जमा केली आहेत, त्याची पापे साठवून ठेवली आहेत.

  5. हे एफ्राईमा, आता माझा या मूर्तीशी काय संबंध आहे? मी त्याला उत्तर देईन आणि त्याची काळजी घेईन. मी सदाहरित गंधसरू वृक्षासारखा आहे; तुमचे फलवंत होणे माझ्यामुळे येते.”

  6. एसावाचा पर्वत दक्षिणेतील लोक ताब्यात घेतील, आणि पलिष्टी लोकांच्या देशाला डोंगराच्या पायथ्याशी राहणारे आपल्या ताब्यात घेतील. ते एफ्राईम आणि शोमरोनच्या भूमीचा ताबा घेतील आणि बिन्यामीन गिलआद प्रांत व्यापून घेतील.

  7. मी एफ्राईमचे रथ आणि यरुशलेमचे युद्धाचे अश्व काढून घेईन, आणि युद्धाचे धनुष्य मोडून टाकले जातील. आणि तो राष्ट्रांमध्ये शांतीची घोषणा करेल. त्याच्या राज्याचा विस्तार एका समुद्रापासून दुसर्‍या समुद्रापर्यंत आणि फरात नदीपासून पृथ्वीच्या दिगंतापर्यंत असेल.

  8. यहूदाहास मी असे वाकवेन, जसे माझे धनुष्य वाकवितो आणि एफ्राईमने ते बाणासारखे भरेन. अगे, सीयोना, मी तुझ्या पुत्रांना हे ग्रीस देशा, तुझ्या पुत्रां विरुद्ध प्रोत्साहित करेन, आणि तुला योद्ध्याच्या तलवारीसारखे करेन.

  9. एफ्राईमी योद्ध्यांसारखे होतील, द्राक्षारसाने व्हावे तसे त्यांचे हृदय आनंदित होईल. त्यांची मुलेसुद्धा हे पाहतील आणि उल्लास पावतील; त्यांची हृदये याहवेहच्या ठायी आनंदित होतील.

  10. यामुळे येशू यहूदीया प्रांताच्या लोकांमध्ये उघडपणे फिरले नाहीत. तर त्याऐवजी ते अरण्याच्या जवळ असलेल्या एफ्राईम नावाच्या एका गावी आपल्या शिष्यांसह जाऊन राहिले.