मुख्य मजकुरावर जा

Ephraim

160 वचने · 9 कुटुंब सदस्य

Ephraim चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. गिलआद माझा आहे. मनश्शेह माझा आहे; एफ्राईम माझे शिरस्त्राण आहे, यहूदाह माझा राजदंड आहे.

  2. आता दावीदाच्या वंशजांना असे सांगण्यात आले, “अरामने एफ्राईमशी युती केली आहे;” तेव्हा जंगलातील झाडे जशी वाऱ्याने हादरली जातात तशीच आहाज आणि त्याच्या लोकांची मने हादरली.

  3. अराम, एफ्राईम आणि रमाल्याहच्या पुत्राने असे म्हणून तुमच्या नाशाचा कट रचला आहे,

  4. कारण दिमिष्क हे अरामाचे मस्तक आहे, आणि दिमिष्क हे केवळ रसीनचे मस्तक. पासष्ट वर्षांच्या आतच एफ्राईम असे हादरून जाईल की ते सर्व एककूळ म्हणून राहू शकणार नाहीत.

  5. एफ्राईमचे मस्तक शोमरोन आहे, आणि शोमरोनचा प्रमुख केवळ रमाल्याहचा पुत्र आहे. जर तुम्ही तुमच्या विश्वासामध्ये स्थिर राहिला नाही तर तुम्ही उभे राहणारच नाही.’ ”

  6. एफ्राईम आणि यहूदीया विभक्त झाले त्या वेळेपासून अशी वेळ आली नव्हती, तशी वेळ याहवेह तुमच्यावर आणि तुमच्या लोकांवर आणि तुमच्या पित्याच्या घराण्यावर आणतील—ते अश्शूरच्या राजाला आणतील.”

  7. सर्व लोकांना ते माहीत होईल— एफ्राईम आणि शोमरोन येथील नागरिक— जे अभिमानाने आणि अंतःकरणाच्या उद्धटपणाने असे म्हणतात,

  8. मनश्शेह एफ्राईमला आणि एफ्राईम मनश्शेहला खाऊन टाकेल; ते एकत्र मिळून यहूदीयाच्या विरोधात जातील. हे सर्व करूनही त्यांचा संताप अजून शमला नाही, त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे.

  9. एफ्राईमचा मत्सर नाहीसा होईल, आणि यहूदीयाच्या शत्रूंचा नाश होईल; एफ्राईमला यहूदाहचा मत्सर वाटणार नाही, किंवा यहूदाह एफ्राईमबरोबर शतृत्व करणार नाही.

  10. तटबंदी केलेले शहर एफ्राईमपासून नाहीसे होईल, आणि दिमिष्कमधून शाही सामर्थ्य नाहीसे होईल; अराम नगरातील अवशिष्ट इस्राएली लोकांच्या वैभवासारखे असतील,” असे सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात.

  11. त्या मुकुटाला धिक्कार असो, जो एफ्राईमच्या दारुड्यांचा अभिमान आहे, त्या फिके पडणार्‍या फुलाला, त्याच्या तेजस्वी सौंदर्याला, सुपीक खोऱ्याच्या टोकावर बसविलेल्या— त्या नगराला, जो मद्याने क्षीण झालेल्यांचा अभिमान आहे!

  12. तो मुकुट, एफ्राईमच्या मद्यपींचा अभिमान, पायाखाली तुडविला जाईल.

  13. दान येथून एक उंच वाणी घोषणा करू लागली, एफ्राईम पर्वतावरून नाश जाहीर करण्यात आला आहे.

  14. मी तुम्हाला माझ्या उपस्थितीतून दूर लोटेन, जसे तुमचे इस्राएली भाऊबंद, म्हणजे एफ्राईमच्या लोकांना केले तसे करेन.’

  15. ‘चला, उठा, आपण सीयोनकडे जाऊ, आपले परमेश्वर याहवेहकडे, जाऊ या.’ ” पहारेकरी एफ्राईमच्या टेकड्यांवरून अशी आरोळी मारण्याचा दिवस येत आहे,

  16. ते आनंदाश्रू ढाळतील. मी त्यांना परत आणतांना ते प्रार्थना करतील. मी त्यांना जलप्रवाहाच्या बाजूने चालवेन समतल भूमीवरून ते न अडखळता चालतील, कारण मी इस्राएलचा पिता आहे, आणि एफ्राईम माझा ज्येष्ठपुत्र आहे.

  17. “मी एफ्राईमचे आक्रंदन निश्चितच ऐकले: ‘तुम्ही मला अनावर वासराला लावावी तशी शिस्त लावली आहे, आणि मी ही शिस्त ग्रहण केली आहे. मला पुन्हा माझ्या पूर्वस्थितीत आणा, म्हणजे मी पूर्ववत होईन, कारण तुम्ही याहवेह, माझे परमेश्वर आहात.

  18. हा एफ्राईम माझा लाडका पुत्र नाही का, जे माझे लेकरू, मला अत्यंत सुखदायक? जरी मी बरेचदा त्याच्याविरुद्ध बोललो, तरी मला आताही त्याची आठवण येते. म्हणून माझ्या मनाला त्याची ओढ लागली आहे; मला त्याची अत्यंत दया येते.” असे याहवेह जाहीर करतात.

  19. पण मी इस्राएलला त्यांच्या स्वतःच्या कुरणात परत आणेन, ते कर्मेल व बाशान येथे चरतील; एफ्राईम व गिलआदच्या डोंगरावर ते खाऊन तृप्त होतील.

  20. “मानवपुत्रा, लाकडाची एक काठी घे आणि त्यावर लिही, ‘यहूदाह व त्याच्या सोबतीच्या इस्राएली लोकांचे.’ मग लाकडाची आणखी एक काठी घे आणि त्यावर लिही, ‘योसेफ (म्हणजेच एफ्राईम) आणि त्याच्या सोबतीच्या सर्व इस्राएली लोकांचे.’

  21. त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: योसेफाची काठी; जी एफ्राईमच्या हातात आहे तिला व इस्राएलचे जे लोक त्याचे सोबती आहेत, त्यांना मी घेऊन यहूदीयाच्या काठीशी जोडीन. मी त्यांना लाकडाची एक काठी करेन आणि ते माझ्या हातात एक होतील.’

  22. मनश्शेहच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत एफ्राईमचा एक भाग असेल.

  23. एफ्राईमच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत रऊबेनचा एक भाग असेल.

  24. एफ्राईम मूर्तीबरोबर जोडले गेले आहे, त्याला एकटे सोडून द्या!

  25. एफ्राईमाबद्दल मला सर्वकाही माहीत आहे; इस्राएल माझ्यापासून लपलेले नाही. हे एफ्राईमा, तू आता वेश्याव्यवसायाकडे वळला आहेस; इस्राएल भ्रष्ट झालेला आहे.