मुख्य मजकुरावर जा

Ephraim

160 वचने · 9 कुटुंब सदस्य

Ephraim चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. सातव्या महिन्याचा सातवा सेनापती हेलेस होता, तो एफ्राईमी असून पलोन येथील होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.

  2. अकराव्या महिन्याचा अकरावा सेनापती पिराथोनचा एफ्राईमी बेनाइयाह होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.

  3. एफ्राईमच्या गोत्रावर: अजज्याहचा पुत्र होशेय; मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रावर: पदायाहचा पुत्र योएल;

  4. अबीयाह एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील सेमाराईम पर्वतावर उभा राहिला आणि म्हणाला, “यरोबोअम आणि सर्व इस्राएल लोकांनो, माझे ऐका!

  5. जेव्हा आसाने हे शब्द आणि ओदेद संदेष्ट्याचा पुत्र अजऱ्याहची भविष्यवाणी ऐकली तेव्हा त्याला धीर आला. त्याने यहूदाह आणि बिन्यामीनच्या संपूर्ण देशातील आणि त्याने ताब्यात घेतलेल्या एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील गावांमधील अमंगळ मूर्ती काढून टाकल्या. त्याने याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशमंडपासमोर याहवेहची जी वेदी होती, तिची दुरुस्ती केली.

  6. नंतर त्याने सर्व यहूदीया आणि बिन्यामीन आणि एफ्राईम, मनश्शेह आणि शिमओन येथील लोकांना जमविले, जे त्यांच्यामध्ये स्थायिक झाले होते, कारण त्याचे परमेश्वर याहवेह त्याच्याबरोबर आहेत हे पाहून इस्राएलमधून मोठ्या संख्येने लोक त्याच्याकडे आले होते.

  7. त्याने यहूदीयाच्या सर्व तटबंदीच्या शहरांमध्ये सैन्याचा तळ दिला आणि त्याचा पिता आसाने काबीज केलेल्या यहूदीया आणि एफ्राईमच्या नगरांमध्ये सैन्यांच्या छावण्या टाकल्या.

  8. यहोशाफाट यरुशलेममध्ये राहिला आणि तो पुन्हा बेअर-शेबा पासून एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील लोकांमध्ये गेला आणि त्यांना त्यांच्या याहवेह पूर्वजांच्या परमेश्वराकडे वळविले.

  9. परंतु परमेश्वराचा एक मनुष्य त्याच्याकडे आला आणि म्हणाला, “महाराज, इस्राएलकडून आलेल्या या सैन्याने तुमच्याबरोबर जाऊ नये, कारण याहवेह इस्राएलबरोबर नाहीत; एफ्राईमच्या कोणत्याही लोकांबरोबर नाहीत.

  10. तेव्हा अमस्याहने एफ्राईमहून त्याच्याकडे जे सैन्य आले होते त्यांना काढून त्यांच्या घरी परत पाठविले. ते यहूदीयावर खूप रागावले आणि संतापाने घरी निघून गेले.

  11. इस्राएलाचा राजा यहोआशने यहोआहाजचा पुत्र, योआशाचा पुत्र यहूदीयाचा राजा अमस्याहला बेथ-शेमेश येथे कैद केले. नंतर योआशाने त्याला यरुशलेमास आणले आणि यरुशलेमची एफ्राईमच्या दरवाजापासून कोपर्‍याच्या दरवाजापर्यंत भिंत त्याने पाडून टाकली; जी चारशे हात लांब होती.

  12. एफ्राईम येथील योद्धा जिक्रीने राजाचा पुत्र मासेयाह, राजवाड्याचा प्रभारी अधिकारी अज्रीकाम आणि राजाच्या नंतरचा सर्वात उच्चाधिकारी एलकानाह यांना ठार मारले.

  13. नंतर एफ्राईममधील काही पुढारी—यहोहानानचा पुत्र अजर्‍याह, मेशिल्लेमोथचा पुत्र बेरेख्याह, शल्लूमचा पुत्र यहिज्कीयाह आणि हदलैचा पुत्र अमासा—यांनी जे युद्धातून परत येत होते त्यांचा सामना केला.

  14. हिज्कीयाहने सर्व इस्राएल आणि यहूदीया या ठिकाणी संदेश पाठविला आणि एफ्राईम व मनश्शेह यांनाही पत्र लिहून आमंत्रण दिले की, त्यांनी यरुशलेममधील याहवेहच्या मंदिरात यावे आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेहसाठी वल्हांडण सण साजरा करावा.

  15. संदेशवाहक एफ्राईम आणि मनश्शेह येथील गावोगाव तसेच जबुलूनपर्यंत गेले, परंतु लोकांनी त्यांचा तिरस्कार केला आणि त्यांची थट्टा केली.

  16. एफ्राईम, मनश्शेह, इस्साखार आणि जबुलून येथून आलेल्या पुष्कळ लोकांपैकी बहुतेक लोकांनी स्वतःला शुद्ध केलेले नव्हते, तरीही जे लिहिलेले होते त्याविरुद्ध जाऊन त्यांनी वल्हांडण सणाचे अन्न खाल्ले. परंतु हिज्कीयाहने त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि म्हणाला, “याहवेह, जे चांगले आहेत, त्यांनी प्रत्येकांना क्षमा करावी.

  17. जेव्हा हे सर्व समाप्त झाले, तेव्हा तिथे असलेले इस्राएली लोक बाहेर पडून यहूदीयाच्या नगरांमध्ये गेले व त्यांनी पूजास्तंभ फोडून टाकले, अशेराचे स्तंभ नष्ट करून टाकले. त्यांनी यहूदीया, बिन्यामीन आणि एफ्राईम व मनश्शेह येथील उच्च स्थाने आणि वेद्या नष्ट केल्या. त्यांनी ते सर्व नष्ट केल्यानंतर, इस्राएली लोक स्वतःच्या गावी आणि स्वतःच्या वतनाकडे परत आले.

  18. मनश्शेह, एफ्राईम आणि शिमओन या गोत्रांच्या नगरांमध्ये, नफतालीपर्यंत आणि त्यांच्या सभोवतालच्या भग्नावशेषांमध्ये,

  19. ते मुख्य याजक हिल्कियाहकडे गेले व परमेश्वराच्या मंदिरात आलेले पैसे, जे लेव्यांनी व द्वारपालांनी मनश्शेह, एफ्राईम आणि इस्राएलच्या अवशिष्ट लोकांकडून आणि यहूदाह व बिन्यामीनच्या लोकांकडून, तसेच यरुशलेमच्या रहिवाशांकडून गोळा केले होते ते राजाला दिले.

  20. तेव्हा लोक बाहेर पडले आणि डाहळ्या तोडून आपल्या घरांच्या धाब्यांवर, आपल्या अंगणात, परमेश्वराच्या भवनाच्या अंगणात, जल वेशीच्या जवळील चौकात आणि एफ्राईम वेशींच्या चौकात त्यांनी तात्पुरते मांडव घातले.

  21. नंतर एफ्राईम वेशीपासून येशनाह वेस, मत्स्य वेस आणि हनानेल मनोरा पार करून शंभराचा बुरूजावरून आम्ही मेंढेवेशीपर्यंत गेलो आणि तिथून पुढे द्वारपालाच्या वेशीजवळ जाऊन थांबलो.

  22. गिलआद माझा आहे. मनश्शेह माझा आहे. एफ्राईम माझे शिरस्त्राण आहे. यहूदाह माझा राजदंड आहे.

  23. सर्व शस्त्रांनिशी धनुर्धारी असतानाही एफ्राईमच्या वंशजांनी ऐन लढाईच्या दिवशी मागे फिरून पलायन केले.

  24. परंतु त्यांनी योसेफाचा डेरा वर्ज्य केला; एफ्राईमचे गोत्र पसंत केले नाही.

  25. एफ्राईम, बिन्यामीन व मनश्शेहच्या समोर आपली प्रतापी शक्ती जागृत होऊ द्या; या व आमचे तारण करा.