मुख्य मजकुरावर जा

Abraham

277 वचने · 14 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Abram

Abraham चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ‘कारण त्यांनी पूर्ण अंतःकरणाने मला अनुसरले नाही, म्हणून इजिप्तमधून बाहेर येताना ज्यांचे वय वीस वर्षे व त्याहून अधिक होते त्यातील एकही, जो देश मी अब्राहाम, इसहाक व याकोबाला शपथ घेऊन देऊ केला तो पाहणार नाही;

  2. पाहा, मी हा सर्व प्रदेश तुम्हाला देत आहे. तुम्ही जा व तो प्रदेश हस्तगत करा. कारण याहवेहने तो प्रदेश अब्राहाम, इसहाक व याकोब या तुमच्या पूर्वजास व त्यांच्या वंशजास दिलेला वचनदत्त देश आहे.”

  3. जो देश देण्याचे वचन याहवेह तुमच्या परमेश्वराने तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोबाला दिले होते, त्या देशात जेव्हा ते तुम्हाला घेऊन जातील व जी तुम्ही स्वतः वसविलेली नाहीत—अशी मोठी व सुंदर शहरे तुम्हाला देतील,

  4. तुम्ही नीतिमान आणि सरळ मनाचे लोक आहात म्हणून याहवेह तुम्हाला त्यांचा देश ताब्यात देतील असे मुळीच नाही; मी पुन्हा सांगतो की याहवेह तुमचे परमेश्वर हे केवळ त्या राष्ट्रांच्या दुष्टपणामुळेच व त्यांनी तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब यांना जी शपथ दिली होती, ती पूर्ण करण्यासाठीच ते त्या राष्ट्रांना तुमच्यापुढून घालवून देतील.

  5. तुमचे सेवक अब्राहाम, इसहाक व याकोब यांची आठवण करा. या लोकांचा हट्टीपणा, त्यांच्या दुष्टपणाकडे व त्यांच्या पापाकडे लक्ष देऊ नका.

  6. तुम्ही त्यांचे लोक आहात आणि तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब यांना प्रतिज्ञापूर्वक वचन दिल्याप्रमाणे याहवेहच तुमचे परमेश्वर आहेत याची आज तुम्हाला खात्री करून द्यावयाची आहे.

  7. आणि तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती करावी, त्यांची वाणी ऐकावी आणि त्यांना बिलगून राहावे. कारण याहवेहच तुमचे जीवन आहेत आणि अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना वचन दिलेल्या देशात तेच तुम्हाला दीर्घायुष्य देतील.

  8. मग याहवेह त्याला म्हणाले, “हाच तो वचनदत्त देश होय, ज्याचे मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना शपथपूर्वक वचन देऊन मी म्हटले होते, ‘मी हा देश त्यांच्या वंशजांना देईन.’ आता त्याला तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहेस, परंतु तू त्यात प्रवेश करणार नाहीस.”

  9. यहोशुआ सर्व लोकांना म्हणाला, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘फार पूर्वी तुमचे पूर्वज, अब्राहाम व नाहोराचा पिता तेरह, फरात नदीच्या पलीकडे राहत होते आणि ते इतर दैवतांची भक्ती करीत होते.

  10. परंतु तुमचा पिता अब्राहामाला मी फरात नदीपलीकडील देशातून आणले व कनान देशात सर्वत्र फिरविले व त्याला अनेक वंशज दिले, मी त्याला इसहाक दिला,

  11. यज्ञाच्या वेळी, एलीयाह संदेष्टा पुढे आला आणि त्याने प्रार्थना केली: “हे याहवेह, अब्राहाम, इसहाक आणि इस्राएलच्या परमेश्वरा, आज हे जाहीर होवो की इस्राएलमध्ये केवळ तुम्हीच परमेश्वर आहात आणि मी तुमचा सेवक असून या सर्व गोष्टी मी आपल्या आज्ञेनुसार केल्या आहेत.

  12. परंतु याहवेहची कृपा इस्राएली लोकांवर होती आणि अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याशी केलेल्या करारामुळे त्यांनी त्यांच्यावर दया केली आणि त्यांची काळजी घेतली. आजपर्यंत त्यांचा नाश करण्याची किंवा त्यांना त्यांच्या उपस्थितीतून घालवून देण्याची त्यांची इच्छा नव्हती.

  13. व अब्राम (अर्थात् अब्राहाम).

  14. अब्राहामाचे पुत्र: इसहाक व इश्माएल.

  15. अब्राहामाची उपपत्नी केटूराह हिला जन्मलेले पुत्र: जिम्रान, योक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूआह. योक्षानचे पुत्र: शबा आणि ददान.

  16. अब्राहामास इसहाक झाला. इसहाकाचे पुत्र: एसाव व इस्राएल.

  17. हा करार त्यांनी अब्राहामाशी केला, आणि इसहाकाशी शपथ वाहिली,

  18. हे याहवेह, आमच्या पित्या अब्राहाम, इसहाक आणि इस्राएल यांच्या परमेश्वरा, तुमच्या लोकांच्या मनात या इच्छा कायम राखा आणि त्यांचे अंतःकरण तुमच्याशी एकनिष्ठ राहू द्या.

  19. आमच्या परमेश्वरा, या प्रदेशातील रहिवाशांना तुम्ही तुमच्या इस्राएली लोकांपुढून घालवून दिले आणि तो प्रदेश तुमचे मित्र अब्राहामच्या वंशजांना कायमचा दिला नाही का?

  20. राजाज्ञेनुसार, राजा आणि त्याच्या अधिकार्‍यांकडून पत्रे घेऊन संदेशवाहक संपूर्ण इस्राएल आणि यहूदीयामध्ये गेले, ज्यात लिहिले होते: “अहो, इस्राएलचे लोकहो, अब्राहाम, इसहाक आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेहकडे परत या, म्हणजे, अश्शूरी राजांच्या हातातून जे निसटले आहेत त्यांच्याकडे ते परत येतील.

  21. “याहवेह तुम्हीच परमेश्वर आहात, ज्यांनी अब्रामाला निवडले आणि त्याला खाल्डियनांच्या ऊर शहरातून बाहेर काढून अब्राहाम असे नाव दिले.

  22. जगातील लोकांचे अधिपती, अब्राहामाच्या परमेश्वराचे लोक म्हणून एकत्र जमले आहेत; पृथ्वीवरील राजे वास्तविक परमेश्वराचेच आहेत, ते अत्यंत थोर आहेत.

  23. अहो त्यांचे सेवक, अब्राहामाच्या वंशजांनो, त्यांच्या निवडलेल्या लोकांनो, याकोबाच्या संतानांनो, स्मरण करा.

  24. हा करार त्यांनी अब्राहामाशी केला, आणि इसहाकाशी शपथ वाहिली,

  25. कारण आपला सेवक अब्राहाम याला दिलेल्या पवित्र अभिवचनाची त्यांना आठवण होती.