मुख्य मजकुरावर जा

Abraham

277 वचने · 14 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Abram

Abraham चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “ ‘हे पित्या अब्राहामा, असे नाही. परंतु मृतातून त्यांच्याकडे कोणी गेले तर, ते पश्चात्ताप करतील.’

  2. येशू त्याला म्हणाले, “आज या घरात तारणाने प्रवेश केला आहे, हा मनुष्य अब्राहामाचा पुत्र आहे.

  3. मोशेच्या जळत्या झुडूपांच्या निवेदनात, तो प्रभूला ‘अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोब यांचा परमेश्वर आहे’ असे म्हणतो यावरून त्याने हेच दर्शविले आहे की, मेलेले उठविले जातात.

  4. त्यांनी उत्तर दिले, “आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो. तर आम्हाला स्वतंत्र करण्यात येईल, असे तुम्ही कसे म्हणता?”

  5. मला माहीत आहे की तुम्ही अब्राहामाचे वंशज आहात आणि असे असतानाही तुम्ही मला जिवे मारण्याचा मार्ग शोधत आहात, कारण माझ्या वचनांना तुमच्यामध्ये स्थान नाही.

  6. त्यांनी उत्तर दिले, “अब्राहाम आमचा पिता आहे.” येशू म्हणाला, “जर तुम्ही अब्राहामाची लेकरे असता तर तुम्ही अब्राहामाची कृत्ये केली असती.

  7. परंतु त्याऐवजी परमेश्वराकडून ऐकलेले सत्य मी तुम्हाला सांगितले, म्हणून तुम्ही मला जिवे मारण्याचा प्रयत्न करीत आहात, अब्राहामाने असे कृत्य कधीही केले नव्हते.

  8. यावर त्यांनी उद्गार काढले, “आता आमची खात्री झाली की, तुला भूत लागले आहे! प्रत्यक्ष अब्राहाम व संदेष्टेही मरण पावले आणि तरी तू म्हणतो की तुझी वचने पाळणार्‍यांना मृत्यूचा अनुभव कधीही येणार नाही.

  9. आमचा पिता अब्राहाम त्यापेक्षा तू थोर आहेस काय? तो मरण पावला आणि संदेष्टेही. तू कोण आहेस असे तुला वाटते?”

  10. तुमचा पिता अब्राहाम माझा दिवस पाहण्याच्या विचाराने उत्सुक झाला होता; व तो पाहून त्याला आनंद झाला.”

  11. तेव्हा यहूदी पुढारी त्याला म्हणाले, “तुझे वय पन्नास वर्षाचे देखील नाही आणि तू अब्राहामाला पाहिले!”

  12. येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की अब्राहाम जन्मला नव्हता, त्यापूर्वी मी आहे!”

  13. अब्राहाम, इसहाक आणि याकोबाचे परमेश्वर, जे आपल्या पूर्वजांचे परमेश्वर आहेत, त्यांनी त्यांचा सेवक येशूंना गौरविले आहे. त्याच येशूंना मारून टाकले जावे यासाठी तुम्ही त्यांना धरून दिले आणि पिलातासमोर तुम्ही त्यांना नाकारले. जरी पिलाताने त्यांना सोडून देण्याचा निश्चय केला होता,

  14. तुम्ही संदेष्ट्यांचे वारसदार आहात आणि परमेश्वराने तुमच्या पूर्वजांशी केलेल्या कराराचे भागीदार आहात. ते अब्राहामाला म्हणाले, ‘तुझ्या संततीद्वारे पृथ्वीवरील सर्व लोक आशीर्वादित होतील.’

  15. स्तेफनाने त्यावर असे उत्तर दिले: “बंधुजनहो व वडिलांनो, माझे ऐका! आपला पिता अब्राहाम हारानात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपोटामिया देशात असताना गौरवशाली परमेश्वर त्याला प्रकट झाले.

  16. नंतर परमेश्वराने अब्राहामाला, सुंतेचा करार दिला आणि अब्राहाम इसहाकाचा पिता झाला आणि तो आठ दिवसांचा असतानाच त्याची सुंता झाली. पुढे इसहाक हा याकोबाचा पिता झाला आणि याकोब हा बारा पूर्वजांचा पिता झाला.

  17. त्यांचे मृतदेह शेखेमात आणण्यात आले व अब्राहामाने हमोराच्या पुत्रांना पैसे देऊन विकत घेतलेल्या कबरेत पुरण्यात आले.

  18. “अब्राहामाला दिलेले परमेश्वराचे वचन पूर्ण करण्याचा काळ जवळ आला, त्यावेळेस इजिप्तमध्ये आपल्या लोकांची संख्या खूपच झपाट्याने वाढलेली होती.

  19. ‘मी तुझ्या पूर्वजांचा म्हणजे अब्राहाम, इसहाक आणि याकोबाचा परमेश्वर आहे.’ हे ऐकताच मोशे भीतीने कापू लागला आणि त्याला तिथे पाहण्याचे धैर्य झाले नाही.

  20. “अब्राहामाची संतान, माझ्या प्रिय भावांनो आणि परमेश्वराचे भय धरणार्‍या गैरयहूदीयांनो, तारणाचा संदेश आपल्या सर्वांसाठी दिलेला आहे.

  21. आपण याबाबतीत काय म्हणावे, शारीरिक दृष्टीने आपला पूर्वज अब्राहामाला काय अनुभवयास मिळाले?

  22. अब्राहाम जर कृत्यांमुळे नीतिमान ठरला असता तर त्याला बढाई मिरविण्यास काही कारण असते; परंतु परमेश्वरासमोर नाही.

  23. शास्त्रलेख काय म्हणतो? “अब्राहामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला, आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले.”

  24. हा आशीर्वाद केवळ सुंता झालेल्यांसाठी आहे की सुंता न झालेल्यांसाठी सुद्धा आहे? आपण म्हणतो की अब्राहामाचा विश्वास त्याला नीतिमत्व असे गणण्यात आला.

  25. आणि तो सुंता झालेल्याचाही पिता आहे, पण ज्यांची केवळ सुंताच झाली नाही तर जो विश्वास आपला पिता अब्राहामामध्ये सुंता होण्यापूर्वी होता त्या विश्वासावर पाऊल ठेऊन चालतात त्यांचाही पिता आहे.