circa 1010–970 BC
The Reign of David
David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.
या कालखंडातील वचने
- 2 शमुवेल ४:३सुमारे इ.स.पू. १०४८
कारण बैरोथ येथील लोक गित्ताइमला पळून गेले आणि आजपर्यंत परदेशी म्हणून तिथेच निवासी झाले आहेत.
- 2 शमुवेल ४:४सुमारे इ.स.पू. १०४८
(शौलाचा पुत्र योनाथानचा एक पुत्र होता तो दोन्ही पायांनी अधू होता. येज्रील येथून शौल आणि योनाथान यांच्याविषयी वर्तमान आले, तेव्हा तो पाच वर्षाचा होता. त्याची दाई त्याला घेऊन पळाली, परंतु ती निघण्याच्या घाईत असताना तो पडला आणि अपंग झाला. त्याचे नाव मेफीबोशेथ असे होते.)
- 2 शमुवेल ४:५सुमारे इ.स.पू. १०४८
आता बैरोथ येथील रिम्मोनचे पुत्र रेखाब आणि बाअनाह हे प्रवासाला निघाले आणि इश-बोशेथ मध्यानाच्या वेळी, दुपारची विश्रांती घेत होता, तेव्हा हे त्याच्या घरी आले.
- 2 शमुवेल ४:६सुमारे इ.स.पू. १०४८
गहू घेत आहेत असे दाखवित ते घराच्या आतील भागात गेले आणि त्यांनी त्याच्या पोटावर वार केला. नंतर रेखाब आणि त्याचा भाऊ बाअनाह तिथून निसटून गेले.
- 2 शमुवेल ४:७सुमारे इ.स.पू. १०४८
ते जेव्हा घरामध्ये गेले होते त्यावेळेस तो त्याच्या झोपण्याच्या खोलीत पलंगावर विश्रांती घेत होता. तेव्हा त्यांनी त्याच्यावर वार करून त्याला जिवे मारले, त्यांनी त्याचे डोके कापले व ते घेऊन रात्रभर अराबाहच्या मार्गाने प्रवास करीत गेले.
- 2 शमुवेल ४:८सुमारे इ.स.पू. १०४८
त्यांनी इश-बोशेथचे डोके हेब्रोनात दावीदाकडे आणले आणि राजाला म्हणाले, “हे पाहा, तुमचा शत्रू शौल ज्याने तुम्हाला जिवे मारावयास पाहिले, त्याचा पुत्र इश-बोशेथ याचे शिर. आज याहवेहने माझ्या धनीराजाच्या विरुद्ध शौल आणि त्याच्या संतानाचा सूड घेतला आहे.”
- 2 शमुवेल ४:९सुमारे इ.स.पू. १०४८
दावीदाने रिम्मोन बैरोथ याचे पुत्र रेखाब आणि बाअनाह यांना उत्तर दिले, “ज्यांनी मला प्रत्येक संकटातून सोडविले आहे, त्या याहवेहची शपथ,
- 2 शमुवेल ४:१०सुमारे इ.स.पू. १०४८
आपण चांगले वर्तमान आणले आहे हे समजून मला एका व्यक्तीने सांगितले, ‘शौल मेला आहे’ तेव्हा मी त्याला सिकलाग येथे धरून मारून टाकले. त्याने आणलेल्या वर्तमानासाठी त्याला मी हे प्रतिफळ दिले!
- 2 शमुवेल ४:११सुमारे इ.स.पू. १०४८
तर आता दुष्ट पुरुषांनी एका निर्दोष व्यक्तीला त्याच्या घरात, त्याच्याच पलंगावर जिवे मारले आहे; मी किती विशेषकरून तुमच्या हातून त्याच्या रक्ताचा जाब घ्यावा आणि तुम्हाला या पृथ्वीतून नष्ट करावे!”
- 2 शमुवेल ४:१२सुमारे इ.स.पू. १०४८
तेव्हा दावीदाने त्याच्या माणसांना आज्ञा दिली आणि त्यांनी त्यांना जिवे मारले. त्यांनी त्यांचे हात आणि पाय तोडून टाकले आणि त्यांची शरीरे हेब्रोन येथील तळ्याजवळ टांगली. परंतु त्यांनी इश-बोशेथचे डोके घेतले आणि ते हेब्रोन येथे अबनेरच्या कबरेत पुरले.
- 2 शमुवेल ५:१सुमारे इ.स.पू. १०४८
इस्राएलच्या सर्व गोत्रांचे लोक हेब्रोन येथे दावीदाकडे आले आणि म्हणाले, “आम्ही तर तुमचेच मांस आणि रक्त आहोत.
- 2 शमुवेल ५:२सुमारे इ.स.पू. १०४८
मागील काळात, जेव्हा शौल आमचा राजा होता, तेव्हा इस्राएलला त्यांच्या युद्धात चालविणारे तुम्हीच तर होता. आणि याहवेहने तुम्हाला म्हटले, ‘माझ्या इस्राएल लोकांचा मेंढपाळ व त्यांचा अधिकारी तू होशील.’ ”
- 2 शमुवेल ५:३सुमारे इ.स.पू. १०४८
जेव्हा इस्राएलचे सर्व वडील लोक हेब्रोनात दावीद राजाकडे आले, तेव्हा राजाने त्यांच्याशी याहवेहसमोर हेब्रोन येथे एक करार केला आणि त्यांनी दावीदाला इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला.
- 2 शमुवेल ५:४सुमारे इ.स.पू. १०४८
दावीद तीस वर्षाचा असताना राजा झाला आणि त्याने चाळीस वर्षे राज्य केले.
- 2 शमुवेल ५:५सुमारे इ.स.पू. १०४८
त्याने हेब्रोन येथून यहूदीयावर सात वर्षे आणि सहा महिने राज्य केले आणि सर्व इस्राएल व यहूदाह यांच्यावर यरुशलेमात तेहतीस वर्षे राज्य केले.
- 2 शमुवेल ५:६सुमारे इ.स.पू. १०४८
राजा आणि त्यांची माणसे यरुशलेममध्ये राहत असलेल्या यबूसी लोकांवर हल्ला करण्यासाठी निघाले. यबूसी लोक दावीदाला म्हणाले, “तू या शहरात प्रवेश करू शकणार नाही; येथील आंधळे आणि लंगडेही तुम्हाला बाहेर हाकलून लावतील.” त्यांना वाटले, “दावीद येथे आत येऊ शकणार नाही.”
- 2 शमुवेल ५:७सुमारे इ.स.पू. १०४८
तरीही, दावीदाने सीयोन गड हस्तगत केला; हेच दावीदाचे शहर आहे.
- 2 शमुवेल ५:८सुमारे इ.स.पू. १०४८
त्या दिवशी दावीदाने म्हटले होते, “जो कोणी यबूसी लोकांवर विजय मिळवील त्याने पाण्याच्या झोताकडून जाऊन ‘आंधळे व लंगडे’ अशा दावीदाच्या शत्रूंवर हल्ला करावा म्हणूनच असे म्हटले जाते, ‘आंधळे आणि लंगडे’ राजवाड्यात प्रवेश करणार नाहीत.”
- 2 शमुवेल ५:९सुमारे इ.स.पू. १०४८
दावीदाने त्या गडामध्ये आपला निवास केला आणि त्याला दावीदाचे शहर असे म्हटले. त्याने बुरुजापासून आतील भागापर्यंत तट बांधले.
- 2 शमुवेल ५:१०सुमारे इ.स.पू. १०४८
आणि दावीद अधिकाधिक शक्तिशाली बनत गेला, कारण याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर त्याच्याबरोबर होते.
- 2 शमुवेल ५:११सुमारे इ.स.पू. १०४८
आता सोरचा राजा हीरामाने दावीदाकडे दूत पाठविले, त्यांच्याबरोबर देवदारू लाकडे व सुतार आणि गवंडी पाठवले आणि त्यांनी दावीदासाठी एक राजवाडा बांधला.
- 2 शमुवेल ५:१२सुमारे इ.स.पू. १०४८
तेव्हा दावीदाने जाणले की, याहवेहने आपल्याला इस्राएलवर राजा म्हणून स्थापित केले आहे आणि आपल्या इस्राएली लोकांसाठी त्याचे राज्य उंच केले आहे.
- 2 शमुवेल ५:१३सुमारे इ.स.पू. १०४८
दावीदाने हेब्रोन सोडल्यानंतर यरुशलेमात आणखी उपपत्नी आणि पत्नी केल्या आणि त्याला आणखी पुत्र आणि कन्या झाल्या.
- 2 शमुवेल ५:१४सुमारे इ.स.पू. १०४८
यरुशलेममध्ये जन्मलेल्या त्याच्या मुलांची नावे ही: शम्मुआ, शोबाब, नाथान, शलोमोन,
- 2 शमुवेल ५:१५सुमारे इ.स.पू. १०४८
इभार, एलीशुआ, नेफेग, याफीय,