मुख्य मजकुरावर जा

Young Men बद्दल बायबलमधील वचने

347 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दिवसाच्या संधिप्रकाशात, संध्याकाळच्या अंधारात होता.

  2. तेव्हा त्याला भेटण्यास एक स्त्री बाहेर आली, तिची वेशभूषा एखाद्या वेश्येसारखी असून ती धूर्त होती.

  3. (ती बेशिस्त आणि उर्मट आहे, तिचे पाय तिच्या घरात थांबत नाहीत;

  4. आता तर ती रस्त्यावर आहे, आता ती चौकांमध्ये आहे प्रत्येक कोपर्‍यावर ती लपून बसते.)

  5. तिने त्याला पकडले आणि त्याचे चुंबन घेतले, आणि निर्लज्ज चेहऱ्याने ती म्हणाली:

  6. आज मी माझी वचने पूर्ण केली आहेत, आणि माझ्या घरी शांत्यर्पण आहे.

  7. म्हणूनच मी तुला भेटण्यासाठी बाहेर आले; मी तुला शोधले आणि तू मला सापडलास!

  8. मी माझा पलंग इजिप्त येथील सुताच्या रंगीबेरंगी चादरींनी सजविला आहे.

  9. ऊद, जटामांसी व दालचिनी यांनी मी माझी शय्या सुवासिक केली आहे.

  10. चल, पहाटेपर्यंत आपण प्रीतीत यथेच्छ रमून जाऊ; आपण एकमेकांना प्रीतीचा आनंद देऊ!

  11. कारण माझे पती घरी नाहीत; ते दूर प्रवासाला गेले आहेत;

  12. त्याने त्याची पैशाची थैली भरून घेतली आहे, आणि पौर्णिमेपर्यंत ते घरी परत येणार नाहीत.

  13. तिच्या मोहक शब्दांनी वश करून तिने त्याला चुकीच्या मार्गाने नेले; गोड बोलून तिने त्याला मोहात पाडले.

  14. जसा बैल कापणार्‍याकडे जातो, तसा क्षणातच तो तिच्यामागे गेला, हरिण जसे दोर्‍यांच्या फासात पाय टाकते

  15. तोपर्यंत बाण त्याच्या पोटात घुसतो, ज्याप्रमाणे पक्षी वेगाने पाशात अडकतो, त्याला माहीत नसते की ते त्याच्यासाठी प्राणघातक आहे.

  16. तर आता माझ्या मुलांनो, माझे ऐका, मी काय बोलतो त्याकडे लक्ष द्या.

  17. तुमचे मन तिच्या मार्गाकडे जाऊ देऊ नका किंवा बहकून जाऊन तिच्या वाटेने जाऊ नका.

  18. कारण तिने अनेकांना घायाळ करून पाडले आहे; होय, अनेक बलवान पुरुषांना तिने ठार केले आहे.

  19. तिचे घर हा नरकाकडे जाणारा महामार्ग, आणि खाली मृत्यूच्या खोल्यांकडे नेणारा मार्ग आहे.

  20. शलोमोनाची नीतिसूत्रे: शहाणा मुलगा त्याच्या पित्याला सुखी करतो, परंतु मूर्ख मुलगा त्याच्या आईला दुःख देतो.

  21. सुज्ञ पुत्र आपल्या पित्याच्या शिक्षणाकडे काळजीपूर्वक लक्ष देतो, परंतु उपहास करणारा पुत्र फटकारास प्रतिसाद देत नाही.

  22. मूर्ख पुत्र आपल्या आईवडिलांचा सल्ला तुच्छ मानतो, पण जो सुधारणा अंमलात आणतो, तो सुज्ञपणा दाखवितो.

  23. समंजस पुत्र आपल्या वडिलांना आनंद देतो, परंतु मूर्ख मनुष्य आईला तुच्छ लेखतो.

  24. सुज्ञ गुलाम आपल्या धन्याच्या लज्जास्पद मुलावर सत्ता गाजवील, आणि कुटुंब सभासदाप्रमाणे मालमत्तेत वाटा मिळवील.

  25. मूर्ख मुलगा आपल्या वडिलांच्या दुःखास कारणीभूत होतो, आणि ज्या आईने त्याला जन्म दिला तिला क्लेश देतो.